माझ्या आरंभशूर स्वभावाला अनुसरून हा उपक्रमही मी किती काळ चालवीन ते माहीत नाही, याची कबुली सुरुवातीलाच देऊन टाकते. (हुश्श!)
----
मध्यंतरी मी काही भाषांतरं केली. इंग्रजीतून मराठीत. लालित्यपूर्ण वा साहित्यिक नव्हेत. रोख-ठोक-चोख. पण ती करताना पुष्कळ शब्दांची / संकल्पनांची भाषांतरं करताना अडायला झालं. एक तर हाताशी फक्त सोहोनींचा इंग्रजी-इंग्रजी-मराठी कोश होता. इतर कोणतेही पारिभाषिक कोश नव्हते. सोहोनींच्या कोशात बरेचदा क्रियापदाचा अर्थ सापडतो. त्याच क्रियापदापासून तयार झालेलं नाम, विशेषण, क्रियाविशेषण इत्यादींच्या शब्दजातीचा उल्लेख असतो, पण अर्थ दिलेला नसतो. शिवाय (निदान सोहोनींच्या कोशात तरी) एका इंग्रजी शब्दाला एक प्रतिशब्द सापडण्यापेक्षा अनेक शब्दांच्या समूहानं अर्थ स्पष्ट केलेला बरेचदा दिसतो. अर्थातच याला अपवाद आहेत. पण असे प्रतिशब्द नेमक्या कुठल्या संदर्भात वापरले तर योग्य ठरतील, त्याची माहिती उपलब्ध नाही.
उदाहरणार्थ: अॅक्सेसिबल या शब्दाला सुसाध्य आणि सुगम असे दोन प्रतिशब्द आहेत, आणि खेरीज अर्थही आहे. पण सुगम हा प्रतिशब्द अर्थातच सगळ्या ठिकाणी वापरून चालणार नाही. ’अॅक्सेसिबल ट्यूमर’ या संकल्पनेचं भाषांतर करताना एकच एक प्रतिशब्द हवा, असा हट्ट धरून किंवा सुगम हाच एक प्रतिशब्द वापरून चालणारच नाही. ’ज्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य असेल अशी ट्यूमरची गाठ’ असं भलं मोठं भाषांतर करणं भाग आहे.
हाताशी पारिभाषिक कोशांची फौज असली, तरी अशा अडचणी येतच राहतील, असं वाटतं. कारण अजून तरी मराठीत प्रतिशब्दांबद्दल तितकासा नेमकेपणा, एकवाक्यता, अर्थनिर्णयन झालेलं दिसत नाही. शिवाय पुष्कळसे पारिभाषिक प्रतिशब्द निव्वळ कोशातच राहिलेले दिसतात. ज्यांच्यासाठी भाषांतर होत असतं, त्यांनी इंग्रजी शब्दावर मराठीचे संस्कार करून त्याच्याशी जुळवूनही घेतलेलं असतं. पण त्याचा काहीही विचार न करता, कुणीही कुठेही काहीही शब्द वापरत सुटलेलं असतं. वृत्तपत्रं आणि खरं तर सगळीच माध्यमं या एकवाक्यतेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात - बजावत असतात. पण मटामधल्या बातम्या वाचल्यावर हे या ताकदीकडे किती अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे, हे लक्षात येतं.
तर मी एखाद्या उतार्याचं (बातमी / लेख / विश्लेषण) मराठीत केलेलं भाषांतर आणि मूळ उतार्याचा दुवा इथे देणार आहे. [मूळ उतारा कुठून घेतला त्याचा उल्लेख असणार आहे. तरीही हे संस्थळाच्या धोरणात बसत नसेल, तर धागा जरूर उडवावा. ] त्यात शक्यतोवर साहित्यिक असं काही नसावं, असा माझा प्रयत्न / सध्या तरी बेत आहे. योग्य ते बदल / सुचवण्या / योग्यायोग्याची चर्चा / पर्याय सुचवावेत अशी अपेक्षा आहे. पाहू काय निघतं ते.
----
१९९७पासून जवळ जवळ २ लाख शेतकर्यांच्या आत्महत्या
या ’आत्महत्या पट्ट्या’मधला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांचा लक्षणीय [हे विशेषण फक्त स्पृहणीय गोष्टींसाठीच वापरतात काय? की ते इथेही चालू शकेल?] वाटा आहे; देशातील शेतकर्यांच्या एकूण आत्महत्यांपैकी दोन तृतीयांश आत्महत्या या राज्यांतील आहेत. - पी. साईनाथ.
२५ जानेवारी २०१० - २००८ साली भारतात निदान (’अॅट लीस्ट’चं भाषांतर काय होईल इथे?) १६, १९६ शेतकर्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली; ज्यासह (या उभयान्वयी अव्ययाचा वापर अमराठी छाया दर्शवतो काय?) १९९७ सालापासून झालेल्या एकूण आत्महत्यांचा आकडा १९९,१३२ वर पोहोचला असल्याचे ’राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’कडून (National Crime Records Bureau (NCRB)) कळते.
-----
मूळ बातमीचा / लेखाचा दुवा: http://indiatogether.org/2010/jan/psa-suicides.htm
वाचने
18779
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही सूचना/पर्याय
मेघना,
हॅहॅहॅ!
In reply to मेघना, by ३_१४ विक्षिप्त अदिती
चांगला उपक्रम
भाषांतरातील काही अडचणी... !!
हे
In reply to भाषांतरातील काही अडचणी... !! by इन्द्र्राज पवार
वग तर
In reply to हे by तिमा
सहमत
मेघना,
उत्तम
In reply to मेघना, by श्रावण मोडक
ललित साहित्यात
In reply to मेघना, by श्रावण मोडक
चांगला
माझा प्रयत्न
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
"कॉन्टेम्प्लेट" शब्दाच्या संदर्भानुसार वेगवेगळ्या छटा
In reply to उत्तम by नंदन
'मग्न' हा
In reply to "कॉन्टेम्प्लेट" शब्दाच्या संदर्भानुसार वेगवेगळ्या छटा by धनंजय
आणखी गुंतागुंत
In reply to 'मग्न' हा by मेघना भुस्कुटे
तंद्री!
In reply to आणखी गुंतागुंत by धनंजय
’अॅक्सेसिबल ट्यूमर’ या संकल्पनेचं भाषांतर करताना
ट्यूमरची
In reply to ’अॅक्सेसिबल ट्यूमर’ या संकल्पनेचं भाषांतर करताना by बहुगुणी
सहज
In reply to ट्यूमरची by मेघना भुस्कुटे
भाषांतर आणि रूपांतर
छान
तुमच्या
सोर्स
In reply to तुमच्या by मेघना भुस्कुटे
श्रोत आणि गोट
In reply to सोर्स by श्रावण मोडक
उगम?
In reply to श्रोत आणि गोट by आनंद घारे
दूरदर्शनव
In reply to सोर्स by श्रावण मोडक
बदल
In reply to दूरदर्शनव by मेघना भुस्कुटे
बदल
In reply to दूरदर्शनव by मेघना भुस्कुटे
Suicide belt ला आत्महत्याक्षेत्र हा शब्द चपखल वाटतो
ह्यॅ:!
In reply to Suicide belt ला आत्महत्याक्षेत्र हा शब्द चपखल वाटतो by सुधीर काळे