छोटा डॉन नेहमी मिपावर लेख लिहितो. पण त्याने हा लेख मिपावर का लिहीला नाही, काही कल्पना नाही.
॥विकास॥, हे आहे हे असं आहे, पटलं तर रहा नाहीतर (स्वत:च्याच) चपला घेऊन चालू पडा.
बाकी डॉनरावांच्या अभिनंदनाचा आणखी धागा आणि सकाळ, स्टार माझाबद्दलची चर्चा इथे आहे.
अदिती
श्री. || विकास ||
तुमचा प्रतिसाद खोडसाळ वाटला. कारण स्पष्टपणे असे.... जे काही घडले / घडते आहे त्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे. आपण स्वतःला माहितीबाबतीत अपटुडेट ठेवता असे माझे निरीक्षण आहे. मी चुकतही असेन, तसे असल्यास कृपया क्षमा करणे.
पण सध्या तरी आपला प्रतिसाद खोडसाळच वाटतो आहे कारण माहिती असूनही असे वाक्य आपण लिहिले.... त्यामुळे आपण आपल्या नावातील चार अक्षरे सार्थ केलीत असे वाटते. त्याऐवजी अन्य ३ अक्षरे सार्थ होतील तो सुदिन. असो.
बिपिन कार्यकर्ते
बिपिनशेटच्या शब्दाशब्दाशी प्रचंड सहमत.
बाकी डान्रावांचे अभिनंदन आम्ही सगळीकडे केलेच आहे, इथेही करण्यात आम्हाला आनंदच वाटत आहे. असो.
मालक, संपादकांची मर्जी असेल तर हा प्रतिसाद टिकेल नाही तर हरी हरी !!!!!
--अवलिया
अलिकडेच कुठेतरी श्री. ॥विकास॥ यांनी एका प्रतिसादात काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं. आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या लेखनासाठी श्री, ॥विकास॥ तरसायला लागले ... खोडसाळपणाच वाटतो, नै का?
पटकन तो प्रतिसाद मिळाला तर लिंकही देतेच!!
अदिती
अलिकडेच कुठेतरी श्री. ॥विकास॥ यांनी एका प्रतिसादात काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं. आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या..
॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?
तात्या.
माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे लिहीलं आहेच, पुन्हा एकदा लिहीते:
काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं.
कधी तर्काला सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणतात तर दुसर्या बाजूला झोपेचं सोंग घेणार्याला उठवता येत नाही अशीही म्हण आहे.
अदिती
माझ्या आधीच्या प्रतिक्रियेत मी स्पष्टपणे लिहीलं आहेच, पुन्हा एकदा लिहीते:
काही लोकं मिपावरून गायब झाल्यामुळे कशी आबादीआबाद झाली आहे याचं वर्णन केलं होतं.
हो, परंतु त्याच्या पुढल्याच ओळीत आपण 'आज अचानक त्याच लोकांपैकी छोटा डॉन यांच्या..' असेही लिहिले आहे..
म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित..
तात्या.
बहुसंख्य लोकांच्या मते ॥ विकास ॥ यांच्या खोडसाळ प्रतिसादाच्या अनुषंगाने चाललेल्या चर्चेत माझ्या नावाचा उल्लेख होतो हे पाहुन ४ शब्द खरडतो ...
>>म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
असो.
॥ विकास ॥ ह्यांच्या प्रतिसादात ज्यांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता त्यात मी आणि माझे काही जवळचे मित्र होतो / आहे. आता सदर मंडळी मिपावरुन का गायब झाली ( किंवा पहिल्याएवढी का मिपाची नाहीत राहिली ) ह्याचे कारण सर्वांना माहित आहे, उगाच पुन्हा त्याचा उहापोह करण्यात काही अर्थ नाही.
( अर्थात " कुठली कारणे ?" असा प्रश्न येऊ शकतो ही शक्यता गॄहीत धरुन आम्ही परस्पर आमचे आणि आमच्या काही मित्रांचे गायब झालेले जुने लेख / प्रतिसाद पहावेत असा सल्ला देतो ) ;)
बाकी राहता राहिला प्रश्न तो आमचे नाव घेण्याचा.
अहो तसे झाले असते तर आम्ही त्याची 'धिंड' नसती का काढली ?
बाकी तुमच्या ॥ विकास ॥ ह्यांना पाठीशी घालुन आम्हाला काही माहित / कळाले नाही हा अॅटिट्युड दाखवण्यात जर मिपाचे काही भले होत असेल तर त्यात आम्हालाही आनंद आहे. एक मात्र वाईट असे वाटते की ह्यासर्व प्रकरणात तुम्ही बिका, अदिती, रंगाशेठ सारख्या वरिष्ठ आणि जाणकार लोकांना "बिनबुडाचे" प्रश्न विचारत आहात ...
असो.
बाकी तुम्ही ".. येथे लेखन करणार्यांचा मी आभारी आहे, आणि न करणार्यांनाही घाऊक धन्यवाद! " असे म्हटलेच आहे.
सो, धन्यवाद !
स्वगत : कशाला लिहलास एवढा प्रतिसाद ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
म्हणून त्यावर मी असे विचारले की '॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
मिपाच्या (जवळजवळ) सगळ्या संपादकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सांगते, जर त्याने ते नाव घेतलं असतं तर (डॉन्या म्हणतो त्याप्रमाणे धिंड निघाली असतीच, पण त्याच्या जोडीला) संपादकांनी व्यक्तीगत हल्ल्याचा भाग प्रतिसादातून काढून टाकला असता.
बाकी तुमच्या आदर असण्याबद्दल मला पूर्ण आदर आहे.
अदिती
जर त्याने ते नाव घेतलं असतं तर...संपादकांनी व्यक्तीगत हल्ल्याचा भाग प्रतिसादातून काढून टाकला असता.
जर..तर च्या भाषेला अंत नसतो..
माझा प्रश्न होता आणि आहे,
॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
जमल्यास उत्तर द्या..
धन्यवाद..
तात्या.
न सोचा न समझा न सिखा न जाना,
मुझे आ गया खुदबखुद दिल लगाना
जरा देखकर अपना जल्वा दिखाना ...
सिमट कर यहीं आ न जाए जमाना !
जुबां पर लगी है 'वफाओं' की मुहरें ,
खामोशी उसकी कह र ही हैं फसाना
गुलों तक लगाई तो आसां है लेकीन ,
है दुश्वार कांटोंसे दामन बचाना !
करो लाख तुम मातम ऐ नौ जवानों
पर 'मिर' अब नहीं आएगा वो जमाना !!
- मीर तकि मीर
~ वाहीदा
श्री. तात्यासाहेब, सांगतो.
गेल्या काही महिन्यांपासून, मिपावरील काही सदस्य काही कारणांमुळे इथे येत नाहीत. इथे लेखन करत नाहीत अथवा प्रतिसाद देत नाहीत. यामागचे कारण अथवा सगळेच डिटेल्स आपल्यालाही माहित आहेत आणि मलाही. तरीही, शक्यतो याची जाहिर चर्चा ना तुम्ही केलीत ना अजून कोणी. शेवटी, हे आपले सर्वांचे संस्थळ आहे आणि त्याची केवळ किर्ती वाढावी, अपकिर्ती नव्हे हे समान सूत्र आपणा सर्वांना बांधून ठेवते.
श्री. || विकास || हे मिपा तथा मिपाबाह्य व्यासपीठांवरून मराठी आंतरजालावरील सदस्यांशी संवाद साधतात. ते या जालिय घटनांची माहिती साधारणपणे ठेवतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अशा परिस्थितीत, श्री. छोटा डॉन यांनी आपले लेखन मिपावर करणे / न करणे हा एक थोडासा संवेदनाक्षम मुद्दा आहे हे कोणासही कळेल. असे सगळे असताना, अभिनंदन करताना मुद्दाम अशी एखादी ओळ लिहिणे हे माझ्या मते अनावश्यक आणि काहीही कारण नसताना मिपावर थोडा गदारोळ माजावा असे काहीसे ठरते. या आधीही काही शेरेबाजी त्यांनी केली होती पण ती बहुधा खरडवह्यांमधून असावी असे स्मरते म्हणून मौन धारण केले होते. आज एका धाग्यावर हे आले, कारण नसताना आणि त्यामुळे मिपावर काहीसे नकोसे घडू शकते म्हणून मी तसा प्रतिसाद लिहिला जेणेकरून सदर सदस्यमहोदयांना मिपावरील जबाबदार व्यक्तींचे मत कळावे. त्यांच्या प्रतिसादात, काहीही अश्लील अथवा वैयक्तिक रोखाचा मजकूर नसल्याने तो संपादित केला नाही. शक्य तितक्या सभ्य आणि सर्वमान्य होतील अशा शब्दात मी माझे म्हणणे मांडले. सुदैवाने श्री. चतुरंग यांनीही माझे समर्थन केले.
सदर सदस्याबद्दल या आधीही आपले काही मत-आदानप्रदान झाले आहे. मी स्वतः त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. माझा प्रतिसाद माझ्या आजवरच्या एकंदर आकलनावरून आलेला आहे. माझे माणूसपण आड येऊन माझे काही चुकत असल्यास मला माफ करावे असेही मी तिथे नमूद केले आहे.
आपण आपुलकीने विचारले म्हणून सांगितले. असो.
बिपिन कार्यकर्ते
गेल्या काही महिन्यांपासून, मिपावरील काही सदस्य काही कारणांमुळे इथे येत नाहीत. इथे लेखन करत नाहीत अथवा प्रतिसाद देत नाहीत. यामागचे कारण अथवा सगळेच डिटेल्स आपल्यालाही माहित आहेत आणि मलाही.
मला यातील खरेच काही माहीत नाही.. ज्यांना यायचे असेल ते येतील, न यायचे असेल ते नाही येणार हेच माझे प्रथमपासूनचे धोरण आहे.. जी मंडळी इथे येत नाहीत ती त्यांची वैयक्तिक मर्जी.. मी कुणालाही 'जा' असे सांगत नाही आणि 'रहा' असेही सांगत नाही.. ज्या काही सभासदांनी मुद्दामून मिपाविरुद्ध खोडसाळपणा केला त्यांचे सभासदत्व मी स्वत:हून गोठवले आहे/रद्द केले आहे..
तरीही, शक्यतो याची जाहिर चर्चा ना तुम्ही केलीत ना अजून कोणी.
तशी गरजही नाही.. मुळात हा जाहीर चर्चेचा विषयच नाही. ज्यांना मिपावर यावे/लिहावे असे वाटते, ते तसे करतात, ज्यांना तसे वाटत नाही ते येथे येत नाहीत आणि त्यांनी येऊही नये!
अशा परिस्थितीत, श्री. छोटा डॉन यांनी आपले लेखन मिपावर करणे / न करणे हा एक थोडासा संवेदनाक्षम मुद्दा आहे हे कोणासही कळेल.
यात माझ्या मते तरी संवेदनाक्षम असे काही नाही.. येथे लेखन करणार्यांचा मी आभारी आहे, आणि न करणार्यांनाही घाऊक धन्यवाद! :)
असे सगळे असताना, अभिनंदन करताना मुद्दाम अशी एखादी ओळ लिहिणे हे माझ्या मते अनावश्यक आणि काहीही कारण नसताना मिपावर थोडा गदारोळ माजावा असे काहीसे ठरते. या आधीही काही शेरेबाजी त्यांनी केली होती पण ती बहुधा खरडवह्यांमधून असावी असे स्मरते म्हणून मौन धारण केले होते. आज एका धाग्यावर हे आले, कारण नसताना आणि त्यामुळे मिपावर काहीसे नकोसे घडू शकते म्हणून मी तसा प्रतिसाद लिहिला जेणेकरून सदर सदस्यमहोदयांना मिपावरील जबाबदार व्यक्तींचे मत कळावे.
आमचे रा.को. डॉनराव यांनी उत्तर दिलेले आहे, ते जसेच्या तसे:
नमस्कार,
आवर्जुन आमच्या लेखाची दखल घेऊन अभिनंदनाचा धागा काढल्याबद्दल व त्यावर मनमोकळे ४ शब्द लिहल्याबद्दल धन्यवाद.
बाकी श्री. ॥ विकास ॥ ह्यांना उत्तर असे की आम्ही इथे 'न येण्याने व लिहण्याने' बरीच मंडळी सुखात आहेत व त्यामुळे बरेच चांगले साहित्य निर्माण होते असे आपल्याच प्रतिसादातुन वाचले होते.
सबब, ह्या चांगल्या वातावरणाला उगाच डिस्टर्ब नको म्हणुन आमचे लेखन इथे टाकले नाही.
पुर्वी इथे आम्ही भरभरुन लिहीत होतो पण आजकाल का बंद केले आहे ह्याची कारणे आमच्या इथल्या 'हितचिंतकांना' विचारावीत, त्यांच्याच इच्छेनुसार आम्हाला सदर निर्णय घ्यावा लागला.
असो.
हाच लेख दुसर्याच कोणीतरी इथे आपल्या नावाने खपवला होते असेही काही हितचिंतकांकडुन समजले होते. असो,कसेही का असेना, रसिकांपर्यंत साहित्य पोहचल्याशी मतलब !
मात्र तत्वांना अनसरुन त्यावर योग्य अॅक्शन घेणार्या 'जागरुक आणि तत्वप्रिय' संपादकांचेही इथे आम्ही आभार मानतो.
असो, तुर्तास एवढेच.
- ( आभारी ) छोटा डॉन
श्री डॉन यांचे मत येथे पोचवायचे काम केल्या बद्दल आदिती यांना धन्यवाद देतो
बाकी श्री. ॥ विकास ॥ ह्यांना उत्तर असे की आम्ही इथे 'न येण्याने व लिहण्याने' बरीच मंडळी सुखात आहेत व त्यामुळे बरेच चांगले साहित्य निर्माण होते असे आपल्याच प्रतिसादातुन वाचले होते.
सबब, ह्या चांगल्या वातावरणाला उगाच डिस्टर्ब नको म्हणुन आमचे लेखन इथे टाकले नाही.
छोटा डॉन इथुन गेल्यामुळे कोणाला आंनद झाला असेल, असे मला तरी व्यक्तीशः वाटत नाही.
असो, पुन्हा एकदा अभिनंदन
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विदोही संकेतस्थळांना खास सुट.
योग्य बोली सह संपर्क करावा.
पण हे ईसकाळ वाले पण काय बावळट आहेत
वरती
मुळ अनामिक लेखकाच्या विनोदबुद्धीला आमचा सलाम... अन खाली
फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा.
असे लिहले आहे .
लेखक अनामिक कसा ? छोटा डॉन' चे नाव माहीत नसेल तर विचारून तरी घ्यावे, ईसकाळ वाल्यांनी .
त्या ईसकाळ च्या फडणी स रावांची चांगलीच कानउघाडणी केली पाहीजे . ३ वाजून गेले तरीही त्यांनी बातमी एडीट करून डोन्याचे नाव घातले नाही ..निषेध !
अन डोन्याचे पुनश्च अभिनंदन !! =D> =D>
~ वाहीदा
पण हे ईसकाळ वाले पण काय बावळट आहेत
वरती
मुळ अनामिक लेखकाच्या विनोदबुद्धीला आमचा सलाम... अन खाली
फॉरवर्डमधून या पाट्या सगळीकडे प्रसारित होत असल्या, तरी २२ मार्चला एका ब्लॉगमध्ये ही पोस्ट सर्वप्रथम झळकलीय. 'छोटा डॉन' नावाच्या या ब्लॉगवरची मुळ पोस्ट आणि त्यावरील प्रतिक्रियाही जरूर वाचा.
असे लिहले आहे .
लेखक अनामिक कसा ? 'छोटा डॉन' चे नाव माहीत नसेल तर विचारून तरी घ्यावे, ईसकाळ वाल्यांनी .
त्या ईसकाळ च्या फडणी स रावांची चांगलीच कानउघाडणी केली पाहीजे . ३ वाजून गेले तरीही त्यांनी बातमी एडीट करून डोन्याचे नाव घातले नाही ..निषेध !
अन डोन्याचे पुनश्च अभिनंदन !! =D> =D>
~ वाहीदा
आमचे जालमित्र छोटा डॉन ह्यांचे अभिनंदन.
त्यांनी मोठे होऊ नये, छोटेच डॉन राहावे, ही सदिच्छा.
(बाकी दांडीवाले विकास ह्यांच्याबद्दल काय बोलावे/लिहावे ? त्यांची कारकीर्द बहुतेक मोठ्या झालेल्या सदस्यांना परिचित आहेच.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
मंडळी , ऊष्मा भारी झालाय. मस्तपैकी चिल्ड बीअर घ्या. (त्या चारदांड्या विकासरावाना २-३ पाजा ;-) )
डॉन्या , तुझा लेख रिसायकल होऊन किमान २-३ अशा लोकांनी मला इमेल वर पाठवला , ज्यांचा मराठी सायटींशी काहीही संबंध नाही ! सलाम आहे बॉस तुला ! लेके गये यार तुम तो !
काय हो मुसुशेठ, मी पाहतो आहे सद्ध्या तुम्ही बिअरचा फारच प्रचार करत आहात! यायला हवे काय इस्ट कोस्टावर? ;)
बाकी काड्या लावणार्यांनी काड्या घालाव्यात आणि इतरांनी ताल धरुन नाचावे, मराठी संकेतस्थळाला साजेसे. ;)
डॉन्या, मन:पूर्वक अभिनंदन. पाट्या वाचतांना हहपुवा झाली होती.
सकाळमधील लेख आणि तेथील प्रतिसाद वाचून तर अजूनच कौतुक वाटलं...!
आज या निमित्तानं आठवण झाली आपल्या खरडी आणि लेखनाची. अरे साध्या-साध्या खरडी पाच-पाच किलोपेक्षा कमी वजनाच्या नसायच्या. प्रतिसादाचे वजन तर विचारुच नका. त्या वजनाने तर मी अनेकदा वाकून गेलो आहे. :)
अवांतर : सगळ्याच गोष्टी मला माहित नाही. पण ज्या पद्धतीने इथे काही प्रतिसाद दिसत आहेत. आणि विशेषत: इथे॥ विकास ॥ वर टीकेचे जे स्वरुप दिसत आहे. ते व्यक्तिगत मला न पटणारे आहे. समजा ॥ विकास ॥ यांनी खोडसाळपणा केला असेल तर असा खोडसाळपणा मिपावर करणारे ते पहिलेच आहेत का ? वरील प्रतिसादात जर कुठे खोडसाळपणा असेल म्हणून ते न पटणारे असू शकते. पण इथे तर अहमिका लागलेली दिसते ते कसे चूक आहेत हे ठरविण्याची. किंवा असे करुन त्यांनी फार मोठा गुन्हा केला आहे असे निदर्शनास आणल्या जात आहे. जसे काही त्यांनी फार मोठा अपराध केला आहे. त्यामुळे किंवा अन्य कारणामुळे आम्ही असे वागतो. किंवा ते तसे वागतात म्हणून आम्ही असे वागतो. याचा काहीच्या काही सबंध इथे वर चर्चेत मला दिसतो. आणि मला तरी या चर्चेच्या निमित्तानं ते न पटणारं आहे.
असो, आणि हेही माहित आहे की, हे सर्व चालायचेच....!
-दिलीप बिरुटे
||विकास|| हे मिपावरील बर्यापैकी सक्रीय सदस्य आहेत. त्यामुळे गेला काही काळ काही मंडळी मिपावर लिहीत नाहीत / येत नाहीत / दिसत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलेलेच असेल. 'छोटा डॉन' हे मिपावर नियमितपणे लिहितात आणि हाच लेख फक्त दुसरीकडे लिहिला असे असते तर ||विकास|| यांच्या प्रतिसादातील त्या वाक्याला अर्थ असता. अन्यथा मुद्दाम मागचे काही उकरून काडण्यासाठी (आणि पर्यायाने तात्या आणि छोटा डॉन यांच्यात पुन्हा काही खडाजंगी व्हावी म्हणून) ते वाक्य लिहिल्यासारखे वाटते. म्हणून बिकांनी प्रतिसादाला खोडसाळ म्हणणे योग्यच वाटते.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
आज या निमित्तानं आठवण झाली आपल्या खरडी आणि लेखनाची. अरे साध्या-साध्या खरडी पाच-पाच किलोपेक्षा कमी वजनाच्या नसायच्या. प्रतिसादाचे वजन तर विचारुच नका. त्या वजनाने तर मी अनेकदा वाकून गेलो आहे.
=)) =)) =)) =))
बापरे, काय ही माझी ओळख !
असो, त्या निमित्ताने का होईना तुम्हाला आमची आठवण येते त्याचा आम्हाला आनंद आहे.
आमच्या कौतुकाचे ४ शब्द बोलणार्या सर्व मिपाकरांना मनापासुन धन्यवाद ... !!!
अवांतराविषयी :
माझ्या मते इथे कुणाला अकारण टार्गेट गेले नाही ... कुणाकडुनही, विनाकारण तर नाहीच नाही. आता श्री. ॥ विकास ॥ ह्यांना लोक का बोलत आहेत ह्यावर मी काही बोलु इच्छित नाही. खालचा श्री. थत्ते ह्यांच्या प्रतिसादाशी फक्त मी सहमत आहे असे म्हणतो.
बाकी जे लोक आमच्या बाजुने किंवा मोअर प्रिसाईजली श्री. ॥ विकास ॥ ह्यांच्या विरुद्ध बोलत आहेत त्यांची एकंदर वाटचाल, लौकिक, कारकिर्द, सच्चेपणा, अनुभव, समंजसपणा इत्यादी गोष्टी विचारात घेऊनच मग काय तो 'मुद्दाम' का 'योग्य' हा वाद-विवाद व्हावा !
आता तात्यासाहेबांसाठी एक किस्सा :
>>॥विकास॥ ने त्याच्या त्या प्रतिसादात छोटा डॉनचे नाव घेतले होते का?'
ते सोडा, मी एक किस्सा सांगतो तो ऐका :
एकदा ना एका माणसाच्या घरात चोर घुसतात. त्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबियांना हाण हाण मरोस्तोवर हाणतात, जाताना सर्व कपडे, वस्तु वगैरे लुटुन घेऊन जातात.
ह्या माणसाला तर इतका मार बसतो की विचारु नका.
मग काय होते की दुसर्य दिवशी त्याचे मित्र, आप्त वगैरे चौकशीला येतात व त्याला विचारतात " का रे, खुप मारले का तुला त्यांनी ? "
तो म्हणतो " मारले असेल खुप, पण मी त्यांना शेवटपर्यंत गालगुच्चा काही घेऊ दिला नाही."
मित्र " अरे पण खुप मार पडला ना ?"
माणुस " पडला ही असेल, पण मी त्यांना गालगुच्चा काही घेऊ दिला नाही".
मॉरल : एवढे सगळे घडुन गेल्यावर एका क्षुल्लक पर्टिक्युलर गालगुच्च्याचे महत्व ते काय ? शिवाय त्याच्या जोरावर कॉलर ताठ करुन घेण्यात हाशील ते काय ?
असो, छान होता नै किस्सा, मी तर खुप हसलो पहिल्यांदा ऐकला तेव्हा ! :)
असो, पुन्हा एकदा आमची आठवण काढणार्या आणि कौतुक करणार्या सर्व मित्रांचे आभार ... :)
------
( जुन्या मित्रांची लै आठवण येणारा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
प्रतिक्रिया
मस्त रे
हार्दिक
अभिनंदन !
अभिनंदन
छोटा डॉन
हाण्ण
(विषय दिलेला नाही)
श्री. ||
बिपिनशेटच
+२
||विकास||
बिपिनसाहे
अलिकडेच
अलिकडेच
माझ्या
माझ्या
माझं नाव आहे म्हणुन ...
तात्या,
जर त्याने
माझ्याकडून उत्तर देण्याचा शेवटचा प्रयत्न
माझ्याकडू
है दुश्वार कांटोंसे दामन बचाना ...
सांगतो...
अजून एक....
अफवा पसरु नयेत म्हणून...
सहमत आहे........
गेल्या
आपण स्वतःला माहितीबाबतीत अपटुडेट ठेवता
छोटा डॉन यांच्याकडून प्रतिसाद
श्री डॉन
डान्रावां
डॉन रावांचे अभिनंदन !!
डॉन रावांचे अभिनंदन !!
त्या ईसकाळ
असेच छान
छोटा डॉन
अभिनंदन
+१
छोटा डॉन यांचे अभिनंदन!
मित्रानो
काय हो
>>तुम्ही
त्यांना 'त्यासाठी' भारतभेटीची जरुर नसावी! ;)
हॅहॅ
अभिनंदन
अभिनंदन...!!!
सक्रीय
छोटा डॉनचं अभिनंदन!
धन्यवाद ...
॥विकास॥ ने