इव्हा ब्राऊ हिटलर ची केवळ रखेल होती. तिची आणि हिटलर ची भेट हेनरिच होपमन घरी १९३० च्या सुमारास झाली होती हेनरिच होपमन हां हिटलर चा छायाचित्रकार होता. इव्हा ब्राऊ चा हिटलरशी झालेला परिचय हे गेली राउबल आत्महत्येचे एक कारण असावे. इव्हा ब्राऊ ही साधी,बेताची आकर्षक मुलगी होती. हिटलर आपल्याला सोडून देईल की काय अशी तिला नेहमी भीती वाटत असे. हिटलर ने तिला धूम्रपान करण्यास आणि नृत्य करण्यास बंदी केली होती. हिटलर जरी तिच्याकडे दिवसेंदिवस अक्षम्य दुर्लक्ष करीत असे, तरी तो तिच्याबाबतीत मत्सरी होता.तिची कुत्रा पाळण्याची साधी इच्छा ही त्याने मानली नाही. तिची दैनंदिनी सापडली आहे. व त्यातून तिच्या अस्वस्थ मन:स्थितीचे दर्शन घडते.
१९३५ मध्ये हिटलर तिच्याशी तीन महिन्यांपर्यंत काहीही बोलला नाही. तेव्हा तिने झोपेच्या पस्तीस गोळ्या एकदम घेतल्या. यापूर्वीही तिने नोव्हेंबर १९३२ मध्ये मानेवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचे हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले. १९३६ मध्ये हिटलरची सावत्र बहीण फ्राऊ राउबल बर्घहोप सोडून गेली, तेव्हा तिची जागा इव्हा ब्राऊ ने घेतली. इव्हा ब्राऊ ला अज्ञातवासातच राहावे लागले. तिला घराचा मागचा जिना वापरावा लागे. तिला बर्लिनला यायला हिटलर ने अनेकदा परवानगी नाकारली. भेटायला पाहुणे आल्याबरोबर तो तिला आतल्या खोलीत पिटाळून लावी. पण लवकरच ती हिटलरच्या अगदी आतल्या वर्तुळातील गणली जाऊ लागली. तिच्या उपस्थितीतच हिटलर एकदा म्हणाला होता,"अतिशय हुशार माणसाने साधीभोळी आणि मूर्ख स्त्री पत्करली पाहिजे! माझ्या कामात ढवळाढवळ करणारी स्त्री मी जवळ केली असती तर माझे काय झाले असते विचार करा!".
संदर्भ :- हिटलर(चरित्र).
लेखक:- अ.ह.भावे.
वाचने
7571
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मग?
तुमच नाव
ब्राउ नाही
न ला नकार
In reply to ब्राउ नाही by बिपिन कार्यकर्ते
फ्राउन...
In reply to न ला नकार by राजेश घासकडवी
कॉमेंट
In reply to फ्राउन... by स्वाती दिनेश
फ्रोलाइन
In reply to कॉमेंट by राजेश घासकडवी
काय घेणं ???
इव्हा
पासष्ट वर्षांनी इव्हाला श्रद्धांजली?
तात्या
तिची
खरंय
In reply to तिची by टारझन
मला इव्हा
मला इव्हा
In reply to मला इव्हा by शुचि
आपण काय जर्मन टिव्ही बघत नाही.
तिची
ईवा ब्राउन
In reply to तिची by चिरोटा
इव्हा
आपला बाब्या
In reply to इव्हा by ३_१४ विक्षिप्त अदिती
हिहॉहॉहॉ!!!
In reply to आपला बाब्या by प्रियाली
क्या प्रतिसाद मारा है प्रियाली !
In reply to आपला बाब्या by प्रियाली
हिटलर आपला
In reply to आपला बाब्या by प्रियाली
बिचारा
इव्हा