भारतीय कायदे आणि पुराणातील संदर्भ
सदर लेख संपादित करून जितके शक्य होईल तितके शुद्धलेखन सुधारले आहे.
-शुद्धलेखनाचा आग्रह असणारा मिपा संपादक.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात कृष्ण-राधा यांचा संदर्भ देऊन एकप्रकारे भारतीय कायद्यांना नवीन दृष्टिकोनातून पाहायला सुरवात केली. या गोष्टीची स्तुती करावी तितकी थोडीच. ज्या देशाचे सरकार राम अस्तित्वातच नव्हता, त्याच देशाचे न्यायालय कृष्णाचा आधार घेते, ह्यातच खूप मौज सामावली आहे.
असो. ह्याने काही नवीन प्रश्न सामोरे येण्याची शक्यता आली आहे. न्यायालयाने हिंदूंच्या देवाचा दाखला दिला, ह्यामुळे, सरकारच्या अधर्मी( म्हणजे धर्मरहीत) प्रतिमेला तडा गेला असेल काय? पुढच्यावेळी न्यायालय इतर धर्मातील पुराण कथांचा आधार घेणार काय? आता न्यायाधीश होण्यासाठी पुराणकथा माहिती असणे आवश्यक आहे का? असो.
ह्या धाग्याचा उद्देश, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच की सर्वोच्च न्यायालयावर किती कामाचे ओझे आहे. आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून आपण त्यांना मदत करायला हवी. ह्या धाग्यात भारतातील चुकीच्या कायद्याबद्दल लिहिले जाईल, त्याला पुराणातील संदर्भ दिला जाईल. आणि पुराणाच्या आधारावर काही नवीन कायदे करण्याबद्दल विनंती केली जाईल.
धाग्यात बरेचसे संदर्भ आले की पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाला हा धागा अग्रेषित केला जाईल.
-मला आठवत असलेले काही संदर्भ टाकत आहे.
१. द्विभार्याप्रतिबंधक कायदा: कृष्ण आणि त्याच्या एका पेक्षा जास्त बायका
२. द्विपती-प्रतिबंधक कायदा: द्रौपदी आणि पांडव
३. विवाहाआधीच संतती: कुंती आणि सूर्य : कर्ण प्रकरण
४. जुगारात बायको आणि भाऊ पणाला: युधिष्ठिर द्यूत प्रकरण
५. भगिनीला तुरुंग: कंस
६. सामूहिक आस्वाद घ्यायचे नृत्य : मेनका, अप्सरा नृत्य, इंद्र दरबार
७. सामूहिक वस्त्रहरणः द्रौपदी - दु:शासन
मला आठवेल तशी मी भर घालेनच, तुम्हीही घाला.
टीप: हा धागा मौजमजेसाठी आहे.
याद्या
5666
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
वा!
गल्लत
रामायण हे
In reply to गल्लत by युयुत्सु
.
काल्पनिक पात्र
प्राचीन चाली-रीतीं बद्दल मोलाची माहिती
काही माहिती
हिंदू विवाह
अच्छा, अनुलोम-प्रतिलोम मतलब...
In reply to हिंदू विवाह by अरुंधती
महाभारतात
आश्चर्य
>>(आता
In reply to आश्चर्य by समंजस
आता
In reply to >>(आता by II विकास II
मागे एकदा
>>मागे एकदा
In reply to मागे एकदा by युयुत्सु
नक्की काय माहिती हवी?
In reply to >>मागे एकदा by II विकास II
माहीतीबद्
In reply to नक्की काय माहिती हवी? by युयुत्सु
निकालाची प्रत
सुप्रीम कोर्टाचे टाळके फिरले असावे
सुप्रीम कोर्टाचे टाळके फिरले असावे.
In reply to सुप्रीम कोर्टाचे टाळके फिरले असावे by प्रियाली