Skip to main content

आजीची भातुकली

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 23/03/2010 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकली...आजच्या इंग्रजी माध्यमात ,संगणक युगात वावरणा-या मुलांना हा शब्द माहितही नसेल .परंतु एकेकाळी या शब्दाभोवती लहान मुलांचे भावविश्व गुंफलेले होते.एकत्रित जमण्याचे मैत्री वाढविण्याचे संकेत भातुकलीचा हा खेळ मुलांना द्यायचा.काळनुसार खेळही बदलले.जुन्या पिढीचे ते खेळ ,भातुकलीतील ती चिमुकली भांडी , १०० वर्षांपूर्वी वापरात असणा‍र्‍या त्या वस्तू..आपल्याला आजही पहावयास मिळतात. पुणे येथिल विलास करंदीकर यांनी २० वर्षांपासून अशा वस्तू जमवल्या आहेत. त्याच्याकडे १ हजाय २५० भातुकलीची खेळणी .लहान चूल ,घुसळण,पाटा-वरवंटा,पोहरा ,उखळ,ताक घुसळणारी बाई ,दळणारी बाई,पाण्याचा बंब,अडकित्ता,दूध ठेवण्याचे कपाट.सागर्गोते, सारिपाट .काचपाणी.बिट्या, डबा ऐसपैस असे खेळ पहावयास मिळतात.विलास करंदीकर अनेक ठिकाणी आजीची भातुकली नावाने या वस्तूंचे प्रदर्शन भरवत असतात.गिनिज बूक व लिम्का बूकने याची दखलही घेतली आहे. याची काही छाय़ाचित्रे--- " alt="" /> " alt="" /> " alt="" /> " alt="" /> " alt="" /> " alt="" />
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4151
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

१ हजार २५० भातुकलीची खेळणी?? मग खेळतात तरी किती दीवस? *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........*****

मस्त. १/२ बी.एच्.के.च्या जमान्यात आता ह्या वस्तु फक्त भातुकलीच्या संसारातच दिसणार.चांगले कार्य केले आहे करंदीकरांनी. भेंडी P = NP

पुण्यात कुठे आहे हे प्रदर्शन ? -जय महाराष्ट्र , जय मराठी !

मध्यंतरी वाचले होते त्यांच्या कलेक्शनबद्दल... स्वाती

दगडी उखळ, पाणी शेंदायच्या बारड्या, स्नानाची घंगाळी पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

पुण्यात एकदा पाहिले करंदीकरांचे हे कलेक्शन. जुन्या आठवणी जाग्या होतात निश्चितच. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/