आहाहा!!
लेखन मनाला एकदम गारेग्गार करून गेले!
उन्हाळ्याच्यादिवसात अंगणात किंवा गच्चीवर वाळवलेले चुरचुरीत कपडे, कुर्डया, पापड्यांसारखी वाळवणे (अर्धी ओली असताना खाणे) असं सगळं आठवलं.
रेवती
हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय .
इथे तर आज ही बारीकसा स्नो फॉल झालाय.
थंडी जायच नावच घेत नाही आहे.
अगदी ग, आमच्याकडचा स्नो थांबला आता, पण थंडी जायचं नावच घेत नाहीये,:( आत्ता कुठे पारा "डबल डिजिट" मध्ये तपमान दाखवायला लागला आहे. अजूनही स्वेटर घालावा लागतोच आहे...
स्वाती
>>हे वाचून कधी उन्हाळा येतोय असं झालय
ह्म्म. प्रत्येकाचे वेगवेगळे दु:ख. यावरून एक किस्सा आठवला. आमच्या ओळखीतले एक गृहस्थ सरकारी नोकरी निमित्ताने सिमल्याला दोन एक वर्षे होते. त्यांना बोलता बोलता म्हटले "तुमची मजा आहे बुवा....सिमल्याला नोकरी......उन्हाळ्याचा त्रास नाही !!! :) .
तेव्हा त्यांना एकदम संताप आला आणि मला म्हणाले "अहो कसली मजा >:P .... सिमल्याला राहून पहा. थंडीत नुसता जीव अर्धमेला होतो". :(
स्वातीतै पण बहुधा असेच म्हणतील. :)
नितिन थत्ते
व्व्वा !! सुर्रेख सुर्रेख .. :)
कलिंगड म्हणजे आमचा जिव की प्राण ..
ल्हाणपणा पासुन आमचं एक स्वप्न आहे .. एखाद्या भल्या मोठ्या कलींगडात घर करुन रहायचं :)
कलिंगडात घर? :-) मला भोपळ्याची व म्हातारीच्या गोष्टीची आठवण झाली... चल रे भोपळ्या टुणुक टुणुक तसे चल रे कलिंगडा टुणुक टुणुक! घर केलंत की सांगा नक्की! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
लेख भलताच भारी झालाय. मस्त. आवडला.
मार्च महीन्यात जे वारे वहातात त्यानी इतकं मस्त वाटतं आणि नेमक्या तेव्हा परीक्षा असतात. मला वाटतं हेच ते वसंत ऋतूचे वारे.
पहाटे पहाटे चालण्यासाठी बाहेर पडावं तर पक्षी इतके मंजूळ सुस्वरात साद घालत असतात. त्यांचा मीलन काळ हाच असतो त्यामुळे असेल कदाचीत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
सुंदर लेखन! सगळ्या आठवणींचा पट उलगडलात!! धन्यवाद! :)
पन्ह्यासाठी आई कैर्या उकडून ठेवायची आणि मग त्यातला गर काढून झाल्यावर राहिलेल्या साली आणि कोयींनी अंग घासून गच्चीवर ठेवलेल्या तांब्याच्या घंगाळातल्या झळवणीच्या पाण्याने आम्ही गच्चीवरच आंघोळ करायचो. मग राजापुरी पंचाने अंग पुसायचे की वेलची पूड घातलेले थंडगार पन्हे हाणायला तयार!
आंबे तर एक दोनाच्या हिशेबात कधी खाल्लेच नाहीत! रस काढायला मी सगळ्यात पुढे. आंबे घमेल्यात घेऊन धुवायचे, पुसून मऊ करायचे, रस काढायचा, कोयी आणि साले चाटून सर्व तोंड, हात माखून घ्यायचे त्याशिवाय मजा नाही!
घरातच मोगर्याच्या चार कुंड्या होत्या संध्याकाळी फुले उमलून संपूर्ण घरभर सुवास सुटायचा. अबोली आणि मोगर्याची फुलं एकत्र फार सुंदर दिसतात.
(आठवणीत हरवलेला)चतुरंग
सुंदर लेख आणि चित्रांनी शोभा वाढवली.
आमच्या घरी उन्हाळ्याच्या सुमाराला एप्रिलच्या मध्यावर-मे च्या मध्यापर्यंत भरपूर वाळवणे चालत असत. मुख्य म्हणजे डाळींना उन्हे देणे हा मोठा कार्यक्रम असे. आणि त्या डाळी वर्षभराच्या घेऊन नीट भरून ठेवणे हे प्रचंड कटकटीचे काम आमच्या घरच्या मोठ्या बायका कशा करत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक.
असो ते नंतर कधीतरी.
सुंदर चित्रमय लेख... :)
(आमराईतल्या कैर्या चोरणारा...) :)
मदनबाण.....
अमेरिकेने नक्की काय "डील" केले आहे पाकड्यांबरोबर ? डील व्ह्यायचे आहे का आधीच झाले आहे ?
http://www.timesnow.tv/Now-US-to-reward-Pak-with-India-type-N-deal/articleshow/4341126.cms
सुंदर!!!
माझ्या सुद्धा उन्हाळ्यातील बालपणीच्या आठवणी जागृत झाल्यात :)
शाळेतील बारामाही परिक्षा संपल्यावर सुरू होणार्या उन्हाळ्यातील सुट्टया खुपच
हव्याशा वाटत 8>
(भरपूर खेळायला मिळणार यामुळे की वर लेखात उल्लेखलेल्या पदार्थांचा फडशा पाडायला मिळणार यामुळे :? ठाउक नाही पण उन्हाळा खुप आवडायचा :D )
हा लेख खरं तर मी खूप उकडत होतं तेव्हा लिहायला घेतला.... आणि ते सर्व लिहिताना उकाडा कोठे पळाला, मन कसे प्रसन्न झाले ते कळलेच नाही!
तुम्हाला सगळ्यांना आवडला हा लेख व फोटो हे वाचून मस्तच वाटले. माझ्या बरोबर तुमचेही सर्वांचे डोळे निवले व आल्हाददायक आठवणी जागृत झाल्या! अजून काय हवे? :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
मागच्या शनिवारी इथे वसंत ऋतुचा पहिला दिवस होता आणि तुम्हीतर आधी उन्हाळ्याची वाट बघायला लावताय :)
सगळेच फोटो अगदी योग्य आहेत.
पण ह्या लेखात 'उसाच्या रस', रसवंतीगृह आणि फोटो राहिलेले दिसतायत :)
शेणाने सारवलेल्या जमिनी, बांबूच्या तट्ट्यांचा भिंती, बसायला लाकडी बाकं आणि डुगडुगणारी टेबलं, भिंतीवर काळानुरूप बदलणारे नट्यांचे फोटो (तेव्हा रेखा, हेमा मालिनी असायच्या, आता प्रियांका, बिपाशा, करीन, कतरीना असतील), आणि तो घुंगुरांच्या आवाजाबरोबर चालणार उसाचा चरक. ...
लिहावं तितकं कमीच आहे :)
(परवा न्यू जर्सीतल्या स्प्रिंगच्या स्वागताला उसाचा रस प्यायलेला) संदीप !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
संदीप, लिहिताना मला पण ऊसाचा आले-लिंबू घातलेला बर्फाळ रस आठवला.... रसवंती गृहात भर दुपारी जाऊन 'एक फुल एक हाफ' करत, घुंगरांचा ताल व नाद कानांत साठवत, आजूबाजूच्या रंगीबेरंगी पोस्टर्सकडे बघत घालवलेला तो ऊसाच्या गुर्हाळातला सह्ही काळ! :-)
हा घ्या तुमच्यासाठी खास गारेगार ऊसाचा रस! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
प्रतिक्रिया
आहाहा!! लेख
कधी येतोय अस झालाय
अगदी, अगदी...
उन्हाळा थंडी
हे वाचून
व्व्वा !!
आता तुला
कलिंगडात
व्वा...!
लेख भलताच
क्या बात है!!
हेच
मस्तच
सुंदर...
फार सुंदर
अरुंधतीताई
सुरेख लेख..
मस्त लेख.
वा !!.. अतिशय
सुंदर
वाचून गार
वा!!
मस्त लिव्हलय.....
Wow !
+१
अरुंधती मी
अप्रतिम लेख!
सहमत
मस्तच!!!
थंडावा
क्या बात है !!
धन्यवाद!
सुरेख लेख आणि फोटो
संदीप
ऊसाचा थंडगार रस
उन्हाळा
सुंदर