कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:)
(ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;)
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये !
हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये !
थंडगार एकटाच खणखणतो...
देहाची वाफ किती दवडवितो...
किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो -
-`सोड सोड तू बाटली; लवकर ये `!
तेच भक्त; तूच मदिरा त्यांची!
पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची!
ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची!
पेग तो आता भर...लवकर ये !
सांग त्यांना वाट किती दावू मी?
का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ?
वाट बघत कोरडा का राहू मी ?
धारेचे ते का 'अंतर' ? लवकर ये !
* * *
मिटले; सार्यांचे नयन मिटले...
फिटले रे, जाल 'धूम्राचे' फिटले...
तन आता या तहानेला विटले...
ये वारुणि, ये लवकर ! लवकर ये !
..........................................
रचनाकाल ८ एप्रिल २००८
..........................................
चतुरंग
Taxonomy upgrade extras
वाचने
6305
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता...
हसून हसून पुरेवाट!
In reply to आवडली कविता... by प्राजु
चित्तर,
In reply to हसून हसून पुरेवाट! by चित्तरंजन भट
चित्तर साहेब..
In reply to हसून हसून पुरेवाट! by चित्तरंजन भट
बाकी
In reply to चित्तर साहेब.. by प्राजु
मजेशीर कल्पना
हो मजेशीर कल्पनेमुळेच हा विषय घेतला.
In reply to मजेशीर कल्पना by बेसनलाडू
वा!
हेच म्हणतो..
In reply to वा! by सुवर्णमयी
धक्का
In reply to हेच म्हणतो.. by केशवसुमार
खरं आहे!
In reply to वा! by सुवर्णमयी
:)
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!
मस्त!
अप्रतिम
विडंबन