आधीच्या लेखनधाग्याच्या सन्दर्भातच आज लिहीतो आहे अजून दोन कवितान्च्या बद्दल.
एक आहे कवयित्री इन्दिरा सन्तान्ची "गवतफुला". खरतर मला ही पूर्ण आठवत नाही पण जेवढी आठवते त्यातून हे निश्चित दिसून येते की इन्दिराबाईनी केवळ एका साध्या फुला वर केवढी सुन्दर कविता लिहीली आहे. एक छोटा मुलगा एक छोटेसे फुल - रानफुल बघतो आणि त्याच्या सुन्दर रूपामुळे हरखून जातो. मात्र इन्दिराबाईनी ईतक्या रेखीव पणे आणि नेमकेपणे वर्णन केले आहे की ते फुल मुर्तिमन्त आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.
गवतफुला - कवयित्री : इन्दिरा सन्त
रन्गरन्गुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सान्ग तुझा रे तुझा लळा ||ध्रु||
मित्रान्सन्गे माळावरती पतन्ग उडवीत फिरताना
तुला पाहीले गवतावरती झुलता झुलता हसताना
विसरूनी गेलो पतन्ग नभीचा विसरूनी गेलो मित्राना
पाहूनी तुजला हरखून गेलो अशा तुझ्या रे रन्गकळा
हिरवी नाजूक रेशीमपाती दोन बाजूला सळसळती
निळनिळूली एक पाकळी पराग पिवळे झगमगती
तळी पुन्हा अन गोजिरवाणी लाल पाकळी खुलती रे
उन्हामध्ये हे रन्ग पाहता भानही हरपून गेले रे ||१||
आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालूनी रन्गीत कपडे फुलपाखरा फसवावे
तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुजला सान्गाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुजला शिकवाव्या
रन्गरन्गुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला सान्ग तुझा रे तुझा लळा ||ध्रु||
या कडव्यामध्ये अजून दोन ओळी आहेत पण मला त्या आठवत नाहीत. कुणाला आठवत असल्यास जरूर सान्गाव्यात.
दुसरी कविता आहे बालकवी उर्फ त्र्यम्बक बापूजी ठोमरे यान्ची "श्रावणमासी".
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे |
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे ||
वरती बघता इन्द्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे |
मन्गल तोरण काय बान्धिले नभोमण्डपी कुणी भासे ||
झालासा सुर्यास्त वाटतो सान्ज अहाहा तो ईकडे |
तरूशिखरान्वर उन्च ढगान्वर पिवळे पिवळे उन पडे ||
उठती वरती जलदान्वरती अनन्त सन्ध्याराग पाहा |
सर्व नभावर होय रेखिले सुन्दरतेचे रूप महा ||
बलाकमाला उडता भासे कल्पसुमान्ची माळची ते |
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते ||
सुन्दर परडी घेऊन हाती पुरोपकन्ठी शुद्धमती |
सुन्दर बाला या फुलमाला वन्यफुले पत्री खुडती ||
देवदर्शना निघती ललना हर्ष माईना ह्रुदयात |
वदनी त्यान्च्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ||
श्रावण आणि कविता म्हटले की बालकवीन्च्या ह्या कवितेला पर्याय नाही ईतके सुन्दर वर्णन त्यानी या कवितेत शब्दबद्ध केलेले आहे. या कवितेशिवाय मला आठवतो तो दुर्गा भागवतान्चा "श्रावण" या नावाचा धडा. श्रावणातल्या सौम्य सुर्याचे आणि त्यामुळे सुखद सौम्य भासणार्या सुर्यप्रकाशाचे सुरेख वर्णन त्या धड्यामध्ये केलेले आहे.
बालकवीनी केवळ १४ ओळीन्मध्ये श्रावणातील सुरेख निसर्ग आपल्यासमोर चितारलेला आहे.
तर अशा ह्या दोन कविता. काळाच्या कसोटी वर उतरणार्या. केवळ त्यान्च्या गेयतेमुळे, यमक साधल्यामुळे, अचूक शब्दयोजनेमुळे, सुरेख विषय माण्डणी मुळे आणि सर्वात महत्वाचे मनाला भावल्यामुळे आणि भिडल्यामुळे त्या विस्मरणात जाऊच शकत नाहीत.
वाचने
6282
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद
अहो शुचिताई,
In reply to धन्यवाद by शुचि
बालभारती मधील कविता
In reply to अहो शुचिताई, by Manish Mohile
धन्यवाद
In reply to बालभारती मधील कविता by लवंगीमिरची
@श्री. एम
ह्या
श्रावणमास
@ शुचि
होय होय
In reply to @ शुचि by मि माझा
हि पुर्ण कविता नाही