मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ढोकळा

वैशाली हसमनीस · · पाककृती
साहित्य-----दोन वाट्या थोडेसे आंबट ताक,एक वाटी बेसन्,एक चमचा खण्याचा सोडा,मिरची कोथिंबीर्,मोहोरी,हिंग्,तेल,मीठ कृति---सुमारे चार तास ताकात बेसन भिजवून ठेवावे,नंतर पीठ थोडे फुगलेले दिसल्यावर त्यात मिरची वाटून ,चवीपुरते मीठ,खायचा सोडा घालावा.कुकरमधील एका भांड्याला तेल लावून त्यात मिश्रण ओतावे,कुकरची शिट्टी न लावता भांडे १० ते १५ मिनिटे कुकरमध्ये वाफवावे,सुमारे एक तासाने गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व वरून मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी.

वाचने 9155 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by शेखर

टारझन Tue, 03/16/2010 - 23:59
नाही नाही मंग्याच आहे तो .. "आणि हो प्रतिक्रीया द्या.." कुठे लिहीलंय त्यानं ? :) बाकी ढोकळाच आहे आमच्या णशिबी .. त्यामुळे पर्वा इल्ले :) -(ढोकळा प्रेमी) टी

अस्मी गुरुवार, 03/11/2010 - 10:32
छान पाकृ....खरंच सोपी आहे :) - मधुमती

युयुत्सु गुरुवार, 03/11/2010 - 18:42
सोडा किती घालायचा? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

काजुकतली Fri, 03/12/2010 - 15:38
हम्म्म.. मला नाही वाटत इतकी सोप्पी आहे म्हणुन... मी खुप वेळा प्रयत्न केला पण तो बाहेर मिळतो तसा जाळीदार ढोकळा माझ्या हातुन तरी अजुन बनलेला नाहीये. :(

In reply to by प्रकाश घाटपांडे

शुचि Sat, 03/13/2010 - 01:11
आमच्या पुण्यामधल्या दव्यांचा ढोकळा खाला की ठोठरा नाही बसत बर का. आमच्या पुण्याची गोष्टच वेगळी म्हणा .... O:) *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

शानबा५१२ Tue, 03/16/2010 - 23:47
छान झाले तर ईमेलने पाठवा _____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

शानबा५१२ Tue, 03/16/2010 - 23:49
ढोकळा हमका खुप अछ्छा वाट्तो......... _____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........