सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लेखक: प्रशांत उदय मनोहर विशेष
लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ कवितेच्या आशयाशी या कवितेचा आशय कितपत जुळतोय हे तुम्हीच सांगा. सौंदर्यामधुन नित्य ती चालते, निरभ्र आकाशी चांदण्यांची रात. कृष्णधवलांचे लावण्य नांदते, तिच्या असण्यात, तिच्या नयनांत. लाभले रात्रीस मंद चांदणे, जे स्वर्गे नाकारले दिनास प्रदीप्त! ओज होता न्यून छटा वा अधिक नासेल क्षणात अमोल रूप, जे वाहे काळेभोर कुरळ केसांत, नी तिचा चेहरा मंद तेजाळते. किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित! व्यक्त विचारांचे जणु आगर ते!! तिच्या गालांवरी नी भुवयांवरी शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी जगले सुखाचे क्षण जे, कथत सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त. मूळ प्रकाशन माझ्या ब्लॉगवर. हा अनुवाद करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल शुचि यांचे विशेष आभार.

शुचि यांनी 14/03/2010 - 15:43 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त जमलीये ...... ही माझी सर्वात लाडक्या कवितांपैकी एक. >>किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित! व्यक्त विचारांचे जणु आगर ते>>>> आगर शब्द मस्त *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

प्रशांत उदय मनोहर यांनी 14/03/2010 - 16:14 या दिवशी प्रकाशित केले.

In reply to by शुचि

Permalink

धन्यवाद शुचि आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

प्राजु यांनी 14/03/2010 - 23:15 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

तिच्या गालांवरी नी भुवयांवरी शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी जगले सुखाचे क्षण जे, कथत सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त. मस्त!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

स्पंदन यांनी 29/03/2010 - 08:06 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

अप्रतिम...!!! मस्त!! स्पंदन.

अविनाशकुलकर्णी यांनी 03/05/2010 - 16:48 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

She Walks In Beauty like the night a poem by Lord Byron She walks in beauty, like the night Of cloudless climes and starry skies; And all that's best of dark and bright Meet in her aspect and her eyes: Thus mellowed to that tender light Which heaven to gaudy day denies. One shade the more, one ray the less, Had half impaired the nameless grace Which waves in every raven tress, Or softly lightens o'er her face; Where thoughts serenely sweet express How pure, how dear their dwelling place. And on that cheek, and o'er that brow, So soft, so calm, yet eloquent, The smiles that win, the tints that glow, But tell of days in goodness spent, A mind at peace with all below, A heart whose love is innocent! GR* भावानुवाद..मस्त जमलिय

स्वैर परी यांनी 04/10/2010 - 14:19 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

जमलयं!!! :) :) :)

यशोधरा यांनी 04/10/2010 - 14:23 या दिवशी प्रकाशित केले.

Permalink

मस्त!