णमस्कार्स लोक्स ,,,
येस .. "गमन" म्हणजे मिपावर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! आज मिसळपाव होमपेज वरचा फोटू आणि तात्यानं केलेलं वर्णन पाहिलं आणि एक किस्सा आठवला . बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ मधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं .. नक्की तिकडं असतं काय ? कोण लोकं येतात कोणत्या प्रकारची लोकं येतात ? कोणत्या प्रकारच्या बाया असतात ? पण पावलं तिकडे वळवण्याच्या विचारानेही अंगाला कापरं भरत असे.
एकदा मनाचा हिय्या करुन गेलोच त्या वाटेने. श्रिकृष्ण थेटराच्या बाजुने कोणत्यातरी गल्लीत घुसलो आणि घामंच फुटला, १७ वर्षांचा असेन तेंव्हा. फक्त ऐकुन असलेल्या भागात मी पहिल्यांदाच आलो होतो. अरुंद रस्ता .. दोन्ही बाजुंनी दोन-तीन मंजली माड्या .. आणि प्रत्येक खिडकीत; गॅलरीत उभ्या त्या ! यांच्या त्वचेचा रंगं नेमका कोणता ? कोणी गोरी असावी, ती तर चक्क गुलाबी दिसते, कोणी काळी सावळी असेल तर ती चिक्कार पावडर किंवा अजुन काय ?थापुन चक्क चक्क करड्या रंगाचीच झालीये ? वर हे काय ? डोळ्यात आख्खी काजळाजी डब्बी रिकामी केली की काय ? चमकी काय मारलीये .. गजरा काय लावलाय ? कपडे पण कसले ? श्श्शी .. आणि वर हाईट म्हणजे रस्त्यातल्या कोणालाही "ए शुक्शुक..","ए चल्ना .." ,"क्या रे ..मस्ती करेगा क्या ?" वगैरे कमेंट्स टाकणं ! खोल्यांच्या दरवाज्यातंच थोबाड लाल झालेली , छाती कुठे न पोट कुठे ह्याच्या पत्ताच नसलेली अत्तिशय उर्मट आणि रागिट भासणारी .. चालक असावी बहुदा ! मी पुर्णंच घामाघुम झालो होतो. कुठेसं पाणी प्यावं म्हणून थांबलो..
अशा वातावरणात काही करण्याची इच्छा तर सोडाच पण अल्मोस्ट उल्टी होईल असं वाटत होतं,
तोच माझ्या शेजारुन माझ्याच वयाचं एक पाच फुटाचं मिसरुड फुटलेलं कार्ट सेकंदांत माडीपाशी पोचलं आणि तिथे उभ्या एकीला काहीतरी बोललं , आणि ती त्याला आतंही घेऊन गेली,
मी आपली सरळ धुम ठोकली .. पुण्हा इकडे चुकूनही भटकायचं नाही.
कधी नव्हे तो मी वैचारिक झालो ! :) Sex is not something mechanical , it has to be emotional ... its not just an insertion of organ ! And of course how could it be paid ? :) मी जे दृष्य पाहिलं त्या वातावरणात माझी पाणी प्यायची इच्छा होत नव्हती तर बाकी इच्छांचं काय ? पण च्यायला, इथे सगळे लोकं तर एकाच उद्देशानं येतात.. केवळ वासना शमवण्यासाठी ? पण ह्यात सुख भेटतं का ? नो नो .. ह्यात सुख सापडेल असं ह्यांना वाटतं तरी का ? असं कोण-कुठली .. स्वच्छतेचा प्रश्न दोन कोस लांबंच ! नजरेत नजर घालुन बघायची इच्छा कशी होते ? की फक्त माझीच होत नाही ? ह्यांच्या खोल्यांतली स्ट्रक्चर्स कशी असतात ते माहित नाही , (पण ऐकीव माहितीच्या आधारे) छोट्याश्या रुम मधे ... एकाचा इकडे कार्यक्रम चालु , दुसर्याचा तिकडे .. जणु काही कटिंगच्या दुकाणात आपण शेजार-शेजारच्या खुर्च्यांत बसुन हेयरकट करत आहोत. दोन घटका गाडीच्या ब्लॉकपिष्टन प्रमाणे मेक्यानिकल हालचाली करून पुन्हा आपले कपडे घालुन चला पुढे .. तीही लगेच गॅलरीत लॉगिन करून उभी.. ते स्पर्शज्ञाने प्रत्येक सजीवाला असावं इव्हन गेंड्यालाही :) पण 'तो' स्पर्ष असा कुणाकडुनही कसा मिळेल ? आई-वडील-भाऊ-बहिण-मित्र-मैत्रिणी-नातेवाईक ह्यांना स्पर्ष करतो .. त्यात प्रत्येकाचं फिलींग वेगळं असतं .. त्यात 'ती' भावना कधीच नसते ! लहानपणी जेंव्हा सर्दी व्हायची तेंव्हा नाकाला- छातीला विक्स लाऊन द्यायची .. त्या स्पर्षानं एक समाधान भेटायचं .. एक फिलींग यायचं जे केवळ आणि केवळ आईच्याच स्पर्षाने यायचं! बहिणीबरोबर बर्याचदा मारामारी करायचो अंगमस्तीही करायचो एकदा तर डोकं फोडून घेतलं होतं :) ... पण त्यात कधी "तसं" भासलंच नव्हतं.
आपल्या मनात एक फँटसी असतेच की ( नाही म्हणता ? खोटं बोलताय :) ) पण ती भावना अशी कोणत्याही व्यक्तीसाठी येत नाही .. किमान मिपा मुखपृष्ठावरच्या व्यक्तिंसाठी तर नाहीच नाही. गप्पा-गोष्टी वाचनं , समाजात वावरताना बर्याच गोष्टी आपण ऐकतो. मग हे "गमन" करणारे लोकं कोण ? त्याविषयीही उद्बोधक चर्चा झालेलीच असते. मला आश्चर्य वाटतं ... ह्यांची इच्छाच कशी होते ?
बरं वरचा फोटू तर झाला भारतातला .. त्यातही एकदम रोड-लेव्हल बिजनेस :) आम्ही परदेशातही हे पाहिलं .. हो आता तिकडे काही असा स्पेशल झोन असावं असं काही नाही. किंवा तुम्हाला त्या साठी फक्त "व्यावसायिक" बायांकडेच जायला हवं असंही काही नाही. चालु चालु हँडशेक करतो तश्याच सगळ्या गोष्टी शेक केल्या जातात नो वंडर !
पण इथेही असा हाय-फाय शो असला तरी भावना कुठून विकत आणता येत नाही.. भले काही करा. एक क्षणिक आनंद आणि त्यानंतर केवळ पश्चाताप असं काहीसं ! Was it really that needed ? हा विचार आधी कधीच येत नाही :) असं का होतं ? जे रेग्युलर क्लायंट असतात अशांची मानसिकता काय असावी असा प्रश्न मला नेहमीच पडतो. प्राण्यांत आणि माणसात हा एक मोठा फरक असावा असं मला वाटतं ! माणसाच्या भावना अधिक प्रगल्भ आहेत आणि त्या भावनांतला फरक समजण्याची जाण निसर्गतःच आहे.
बोलण्यासारखं बरंच काही आहे , पण ते काही नविन नाही.. थोड्या फार फरकाने बरेच जण असा विचार करत असतीलंच ! असो !!
सर्व "गमन" करणार्यांना हा लेख अर्पण :)
वाचने
8847
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
Sex is not something
नॉलेज आणि
In reply to Sex is not something by विजुभाऊ
बाल टारझन !!
टारझनने
>>सर्व "गमन"
टार्या
या तात्यांसाठी...
In reply to टार्या by विसोबा खेचर
प्राण्यांत आणि माणसात हा एक मोठा फरक असावा असं मला वाटतं
टारुबाळ, मा
>>>तसा एकाच
In reply to टारुबाळ, मा by अप्पा जोगळेकर
In my opinoin, women are not
ह्म्म्म्म!!!!!!!!!!!!!!!
टारझनभाऊंचा लेख व तात्यांचा प्रतिसाद.....
भारी
धडा पहिला
धडा शेवटाचा
In reply to धडा पहिला by प्रकाश घाटपांडे
हम्म्म!!!
अगदी छान
टार्या,
हेच..
In reply to टार्या, by प्राजु
अगतिकता...
तिथेही
In reply to अगतिकता... by प्रभाकर पेठकर
प्रतिक्रिया
अवेअरनेस!!!
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
ही तर गरज... समाजस्वास्थ्याची !
हर्षलराव, ए
In reply to ही तर गरज... समाजस्वास्थ्याची ! by हर्षद आनंदी
मालक,
In reply to हर्षलराव, ए by विसोबा खेचर
टार्या
चांगली
छान
हा टार्या