मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाळेमध्ये मुले परीक्षेत नापास का होतात

शैलेश हिंदळेकर · · काथ्याकूट
ढकलपत्रातून आलेला मजकूर जसाच्या तसा डकवल्यामुळे धागा संपादित करत आहे. रेवती

वाचने 8853 वाचनखूण प्रतिक्रिया 8

शुचि Fri, 03/12/2010 - 17:23
=)) मस्त *********************************** खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले) चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

Nile Sat, 03/13/2010 - 02:37
च्यायला मी रोज किमान ३ तास खेळायचो, दर शुक्र, शनि आणि रवी अनुक्रमे नवा हिंदी जुना हिंदी आणि मराठी सिनेमे पहायचो, रोज रात्री १० तास झोपायचो त्याशिवाय. ट्रिपा काढायचो, पतंग उडवायचो आणि अर्थात वर्गात झोपा काढायचो (हे विसरले वाटतं वरच्या गणितात?). आता हिशेब करुन सांगा माझ्या वर्षात नक्की कीती दिवस होते ते? ;) अर्थात हे गणित आम्ही लै पुर्वीच ऐकलं होतं.

लंबूटांग Sat, 03/13/2010 - 03:39
हा असा हिशेब करतात म्हणूनच नापास होतात :) प्रत्येक दिवसातले तास मोजताना ३६५ ने गुणले आहे. आणि ते वजा मात्र already सगळ्या सुट्ट्या वजा करून उरलेल्या दिवसांमधून केले आहे. त्या सुट्ट्यांच्या दिवसांमधे काय हे जेवत/ झोपत नव्हते काय ;) असो. बरोबर हिशेब असा होईल. एका वर्षामध्ये ३६५ दिवस असतात. एका वर्षामध्ये ५२ रविवार असतात. मग ३६५ मधून ५२ वजा केले की राहिलेत ३१३ दिवस. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी अशा ५० सुट्ट्या वजा केल्यास राहिलेत २६३ दिवस. ३५ दिवस शाळेमध्ये परीक्षा म्हणजे २२८ दिवस वर्षातील ४० दिवस निरनिराळे सण, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, इतर लहान-मोठे सण यांच्यामध्ये जातात. १८८ दिवस वर्षातील ३ दिवस तरी निदान आजारपण, ताप, सर्दी तांच्यामध्ये जातात. आता राहिलेत १८५ दिवस. वर्षातील २ दिवस ( फक्त ) चित्रपट, टिव्हीवरील कार्यक्रम बघण्यात जातात. आत राहिलेत १८३ दिवस. आता उरला १ दिवस आणि त्या दिवशी त्या मुलाचा वाढदिवस असतो म्हणजे १८२ दिवस :) आता सगळ्या गोष्टींना १८२ ने गुणायला पाहिजे ३६५ ने नाही. कारण आपण रविवार आणि सुट्ट्यांच्या काळातील पूर्ण २४ तास अगोदरच काढून टाकले आहेत. तशी गुणाकाराची पण गरज नाही म्हणा. भागाकारानेच काम भागेल ;) दररोज आपण ८ तास झोपतो. मुले रोज १ तास खेळतात.दररोज २ तास दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि न्याहरी करण्यात जातात. दररोज १ तास बोलण्यात आणि इथे तिथे जाण्यात जातो. म्हणजे ८+१+२+१=१२ तास म्हणजे अर्धा दिवस :) आता १८२/२=९१ दिवस = २१८४ तास उरले की हो फक्त अभ्यास करायला ;) चू.भू.द्या.घ्या. अंमळ गडबडीत हिशेब केला आहे मी पण. बाकी एके काळी हिशेब लिहीण्याचेच काम करणारे मालक पण गंडलेले पाहून अंमळ आश्चर्य वाटले. इथे वाचल्याप्रमाणे मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे. आणि हे लेखन बाकीच्याही कोणत्याच नियमांत बसते असे माझ्या अल्पमतीला वाटत नाही आहे. असो.