Skip to main content

घर

लेखक sur_nair यांनी शनिवार, 13/03/2010 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
घर घर, एक वास्तू विटा मातीची घर, एक कल्पना प्रत्येकाच्या मनाची घर थारा निवारा कष्टाचे अन घामाचे घर इच्छा आशा सुखद आठवणींचे घर महाल वाडा झोपडे वारूळ गुहा खोपटे कधी कपार उंच कड्याची कधी भुयार पोखरलेले घर बालपणीचे भातुकलीतल्या खेळातले गोष्टीतल्या चिऊ काऊचे एक मेणाचे एक शेणाचे घर तारुण्याचे जिद्ध अपेक्षा आकांक्षेचे भविष्याच्या ओढीचे गोड गुलाबी स्वप्नांचे घर वार्धक्याचे आश्रयाचे आधाराचे स्मरीत, काही विस्मरीत, अशा आठवणींच्या गोतावळयाचे घर प्रेमाचे, विश्वासाचे नाती - गोती, जुळलेल्या मनांचे घर संशयाचे, विरल्या स्वप्नांचे दुभंगले विखुरले विभागलेले घर असते प्रत्येकाचे किती भिंती खिडक्या दारे सजवायचे कसे, भरावे कशाने ते मात्र ठरवावे ज्याचे त्याने सुरेश नायर
लेखनविषय:

वाचने 2400
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

फार सुंदर *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

विटांची वास्तू व मन यांचा मेळ चांगला जमला आहे. राजेश

व्वा........ अतिशय सुंदर काव्य !!

अतिशय सुन्दर ! !

सजवायचे कसे, भरावे कशाने ते मात्र ठरवावे ज्याचे त्याने हे खूप छान! राघव

सुंदर कविता. आवडली खूप. - अश्विनी

सुंदर कविता. आवडली खूप. - अश्विनी

नायरसाहेब, सुरेखच कविता..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही हा फार छान कट्टा जमवून आणलाय. हेही एक वेगळ्या प्रकारचे 'घर'च म्हणावे लागेल.