महदाश्चर्यम्!
मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत! (मी मनमोहन सिंग-जीं व प्रतिभाताईंना 'अरुणाचल'बद्दल लिहिलेले निरोप मी श्री विकास यांच्या "अरुणाचल" या धाग्याखाली लिहिले होते.) हा निरोप लिहिताना त्यांच्या वेबवर असलेल्या ५०० 'characters'च्या मर्यादेमुळे अडचण आली म्हणून मी काल PM साहेबांच्या ऑफीसला (PMO) लिहिले होते कीं "५०० 'characters' च्या मर्यादेमुळे कांहींच meaningful लिहिता येत नाहीं, तरी ही मर्यादा वाढवून ५०० शब्द करावी!"
महदाश्चर्यम्! मला PMO कडून कांहीं तासांतच खालील उत्तर आले.....
From:
"Web PMO"
To:
kbkale@yahoo.com
Dear Mr. Kale,
The mail ID is pmosb@pmo.nic.in
regards
Communications Incharge
म्हणजे आपली पत्रे (कधी-कधी तरी) वाचली जातात असे म्हणायला हरकत नाही! एका क्षणात माझा आपल्या लोकशाहीबद्दलचा आदर द्विगुणित झाला!
आपणा सर्वांना ही विनंती कीं आपली लोकशाही गुंडांच्या हातून सुशिक्षितांच्या हातात जावी असे ज्यांना-ज्यांना वाटत असेल तर अशा सर्वांनी आपापले मतप्रदर्शन करण्यात आढेवेढे घेऊ नयेत व 'बिनधास' लिहीत जावे!
(मूळ 'अरुणाचल'वरील मतप्रदर्शनाला अद्याप उत्तर आलेले नाहीं!)
सुधीर काळे
वाचने
3265
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचून बरे
प्रामाणिकपणे सांगतो.....
In reply to वाचून बरे by शाहरुख
कार्यवाही
हरकत नाही
अभिनंदन काळेसाहेब.
शुभेच्छा ..
अभिनंदन
स्वयंचलित
नाही
In reply to स्वयंचलित by प्रकाश घाटपांडे
हे पत्र automated response नसावा असे वाटते.
In reply to स्वयंचलित by प्रकाश घाटपांडे
बरे वाटले