मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शाल्मली...

विमुक्त · · कलादालन
शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं... "शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे... हे नाव ऐकून माझा मित्र रव्या म्हणाला "चार-पाच मुलींची नावं एकत्र घेतल्या सारखं वाटलं..." विमुक्त http://www.murkhanand.blogspot.com/
लेखनविषय:

वाचने 6754 वाचनखूण प्रतिक्रिया 17

मदनबाण 08/03/2010 - 10:52
वा.मस्त फोटो...शाल्मलीचे फुल पाहिले नव्हते...ते आज पहावयास मिळाले. :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

विंजिनेर 08/03/2010 - 13:09
सुरेख!! अशीच पांगार्‍याची लाभडक फुले सुद्धा डोळ्याची पारणं फेडतात. जाता जाता: मराठी भाषा कधी कधी आपला शब्ददळीद्री पणा दाखवते. पांगार्‍याला इंग्रजीत फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं किती समर्पक नाव आहे. :)

In reply to by विंजिनेर

विजुभाऊ 13/10/2014 - 15:06
जाता जाता: मराठी भाषा कधी कधी आपला शब्ददळीद्री पणा दाखवते.
ओ विंजनेर काका. आपले भाषेचे अज्ञान भाषेच्या "दळभद्रीपणा" म्हणुन खपवू नका. पांगार्‍याला "अग्नीशिखा " असेही एक नाव आहे. या नावाची समर्पकता वेगळी सांगायला नको.

राजेश घासकडवी 08/03/2010 - 13:20
खूप रसरशीत रंग आले आहेत. विशेषत: शेवटच्या फोटोत फुलाच्या मध्यभागचा पिवळा रंग म्हणजे मंद लावलेला दिव्यासारखा परिणाम देतो. हे चित्र क्रॉप करून पानांचा भाग काढून टाकून बघा. मला वाटतं आणखीन छान दिसेल. राजेश

भाग्यश्री कुलकर्णी 08/03/2010 - 13:26
मी ही इतक्या जवळुन नाही पाहिलीत ही फुले. छान आहेत.
वर्णन छानच आहे! मात्र हा पांगारा वाटतो आहे. काटेसावर नाही. http://www.loksatta.com/old/daily/20090419/rvrt09.htm या दुव्यावरही पहावे. आपले http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही स्वागतच आहे.

प्राजु 08/03/2010 - 22:18
आई गं!! सुरेख!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

अर्धवटराव 09/03/2010 - 02:40
विमुक्ताकडुन आणखी एक मुक्त मेजवानी :) मझा लुटतोय !!! (त्रुप्त होत असलेला) अर्धवटराव -रेडि टु थिंक

अस्मी 11/03/2010 - 16:40
अय्या....या फुलाच नाव शाल्मली हे आत्ताच समजलं. फोटोज खूप भारी आहेत... :) - मधुमती

नितीनमहाजन 11/03/2010 - 16:50
विमुक्ताने दिलेल्या छब्या काटेसावर या झाडाच्या फुलांच्या आहेत. मलापण थोडी शंका होती म्हणून दोन दिवस काही प्रतिक्रिया दिली नाही. कालच एस. टी. ने अलिबागला जाताना कर्नाळ्याच्या जंगलात दोन्ही झाडे पाहिली व खात्री पटली. काटेसावराची फुले पूर्ण उमललेली असतात व जराशी फिक्कट लाल असतात. पारंगा किंवा पांगार्‍याची फुले अधिक गडद (Blood Red) व अर्धोन्मुल्लित असतात. ही थोडी टोकदारही असतात. सावर, पांगारा व पळस ही तीनही झाडे एकाच प्रजातीत येतात. पैकी सावर थंडी संपता संपता फुलते, पाठोपाठ पळस व त्यानंतर पांगारा. अजून पांगारा नीट फुललेला नाही. सावर फुलली म्हणजे थंडी संपली असे समजायला हरकत नाही. यावर्षी सावर खूप उशीरा फुलली. पळसाच्या फुलांवरून मोरोपंतांच्या कृष्णार्जुन युद्ध मधील एक चरण आठवला:
रक्त वर्ण नटला पळसाचा पार्थ सावध नसे पळ साचा
नितीन

राघव 12/03/2010 - 14:43
मस्त! शेवटचा फोटू अप्रतीम! आम्हा फोटूवेड्या रसिकांना मेजवानीच आहे अगदी!! ;) राघव

डावखुरा 14/03/2010 - 19:03
मला मिपा वर काही फोटु लावायचे आहेत कसे लावु? "राजे!"

समिक्शा 13/10/2014 - 14:55
अगदी नावाप्रमाणेच सुंदर...... फोटो पण सही...