Skip to main content

रेज

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 05/03/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
दर आठवड्याला दोन दा तज्ञांकडुन तपासणी. शाळेच्या जाहिरातीतील एक वाक्य. कुतुहल वाढले. बघुया काय प्रकार आहे ते. फोन लावला. समोर ज्या कुणी अधिकारी होत्या त्याना प्रश्न विचारला. "कसली तपासणी हो? ती सुद्धा आठ्वड्यातुन दोन दा" We talk to students to find out any presence of uncontrolled rage, dent in personality not noticed by parents. कुठल्या यत्तेतील? From first standard onwards, बाई म्हणाल्या. कसले प्रश्न? उदाहरण म्हणुन एखादा सांगा. Like Who is your favourite actor.? एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर? We conclude that the child is having tilt towards violence. कोण आहेत हो ट्रस्टीज. चरणामृत घेईन म्हणतो. ............................................................................................................................ "काय हो रेज म्हणजे काय"? मनासारखे झाले नाही की होणार्‍या संतापाचा स्फोट. हा शब्द तुला का सुचला? "अहो, ती सातव्या माळ्याची आली होती. तिच्या मुलाला काहीतरी रेज नावाचा मानसिक रोग आहे असे शाळेत सांगितलय." हे निदान कशावरुन झाले.? "अहो, तो आणलेली खेळणे दोन दिवसात मोडतो असे तीने शाळेतल्या पालक सभेत सांगितले. तेंव्हापासुन दर आठवड्यात त्या लहानग्या मुलाची दोन दा तपासणी होते. हे बरोबर आहे का"? मला विचारु नकोस. नाहीतर मी वायोलंट होईन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2152
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

संकेतस्थळावर बी अशी तपासणीची सोय असते म्हणे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

हे खरं असेल तर ..... अतीच होतय. नाही या लोकांना फटकावलच पाहीजे. लहान मुलांच बालपण तुम्ही हिरावून घेताय. यांची डोकी तपासा आधी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

अशी तपासणी होण्यावर पालक बंदी घालू शकत नाहीत का? शाळा आपल्या जाहिरातीत हे घालतात - याचा अर्थ असा आहे की बऱ्याच पालकांना अशी तपासणी आवडते - किंवा निदान आवडेल असं शाळेला तरी वाटतं. हे कसलं द्योतक आहे?

थोडे पालक विरोध करणारे/असे प्रकार न आवडणारे असतात पण त्यांची संख्या कमी आणि एकजूट नसते त्यामुळे अशा शाळांचे फावते! (माझी आई गेली २० वर्षे वय वर्षे ४-५ साठी बालवाडी चालवते . प्रवेश घेतानाचा संवाद बहुसंख्य पालकांचा - पालक - "बाई ह्याला/हिला काय काय शिकवणार?" आई - गाणी, गोष्टी, खेळ, चित्रकला, चांगल्या सवयी. पालक - "बास इतकंच? काय ए, बी, सी, डी आकडे वगैरे नाही का?" आई - "नाही त्यांचं ते वय नाही! मोठी झाल्यावर शिकतीलच." पालक - "अहो पण बाई काँपिटिशन किती आहे! आलं पाहिजे ना मुलांना लवकर लवकर सगळं." आई - "तुम्ही दहावीची गणितं पाचवीत सोडवली होतीत?" पालक - "?" आई - "त्यामुळे तुमचं काही नुकसान झालं?" पालक - "नाही सगळं नीट चालू आहे" आई - "मग मुलांचंही सगळं नीट चालू द्या. त्यांना त्रास देऊ नका! तुम्हाला पटत नसेल तर दुसर्‍या शाळेत घालू शकता!") चतुरंग

अविनाश धर्माधिकारी त्यांच्या विवेकानंदांवरच्या भाषणात म्हणाले होते कि "लहान मुलांनी बंडखोर असलच पाहिजे." मला ते पटलं. मला माझ्या मुलाशी (वय वर्ष ३)मारामारी करायला आवडते. त्याचं डिवचल्यावर त्वेषाने अंगावर धावून येणं मला फार आवडतं. तसा जर तो एखाद दिवस नाही आला तर काळजी वाटते कि याला बरं नाही कि काय? मग यांच्या मते आम्ही दोघेही "रेज" चे बळी का? (तसंही मला काही फरक पडत नाही त्यांना काय वाटतं पण माहिती असावं म्हणजे ती शाळा टाळता येईल.) -(भावे प्राथमिक शाळेत तुफान दंगा केलेला) एक.

In reply to by एक

आम्ही चौथीपर्यंत शाळेत मारामारी करायला फळ्यावर रेघा काढायला वापरल्या जाणार्‍या मोठ्या पट्ट्या वापरायचो. मजबूत मारामारी असायची. हात आणि डो़की सडकून निघायची पण कधी कोणी तक्रारी वगैरे घेऊन गेलं नाही घरी! आणखी एक खेळ म्हणजे सतरंजीत एकदोघांना गुंडाळायचं आणि कोपर्‍यात लोटून त्यावर उरलेल्या सगळ्यांनी ढीग करायचा, मग दुसर्‍याची टर्न! (माझे बाबा म्हणायचे तुम्ही सगळे हातीपायी धड कसे राहिलात हेच नवल आहे! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

हॅहॅहॅ...हे प्रकार आम्ही नोकरीला लगल्यावर पण रूमपार्टनर ला धुवायला करायचो...(इ.स. २००७) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी