Skip to main content

वरणफळे अर्थातच चकोल्या

लेखक श्रद्धा. यांनी शुक्रवार, 01/01/2010 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : तुरीची डाळ १ १/२ वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन) १/२ वाटी, कांद्यालसणाचे तिखट, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे, वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य, कणिक - त्यात मीठ, हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी. कृती : प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद घालुन शिजलेली डाळ जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी. मग त्यात पाणी घालुन चिंचेचा कोळ , गुळ, तिखट मीठ घालावे, चांगली उकळी आली की त्यात मळलेल्या कणकीच्या पोळ्या लाटुन घेउन शंकरपाळ्याच्या आकारचे तुकडे करुन घालावेत. चांगले शिजले की डीश मधे घालुन त्यावर तुप आणि कोथिंबीर घालुन खायला द्यावे

वाचने 7507
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडती डिश! अर्थात मिपावर दोन तीन वेळा येउन गेली आहे. अजुन नव्या पाकृ येउ द्या!

In reply to by सहज

आवडत्या डिशच्या इतक्या पाककृत्या..वावावा!!

In reply to by खादाड_बोका

बोका साहेब, तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी मिपाच्या मेन्युकार्डावर भरपूर पदार्थ आहेत. ते सगळे तपासत बसणे थोडे जिकिरीचे वाटते. आता पाकृ विभागात उपविभाग पाडायची वेळ झाली असे वाटते आहे.:) रेवती

ही आपल्यापैकी बर्‍याच जणांची आवडती पाकृ आहे. मी आज करते लगेच. नाहीतरी रात्री जेवायला काय करावं ते सुचत नव्हतच.... रेवती

अरे वा...मस्तच...! अशा चकोल्या आई नागपंचमीच्या सणाला करायची पण पद्धत जरा वेगळी होती वाटते. -दिलीप बिरुटे

मस्त, सोपा आणि वरण, भात आणि पोळी सगळे एकातच असलेला संपूर्ण आहार...एकदम आवडती डिश. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

माझा अत्यंत आवडता पदार्थ. बेश्ट पाकृ. ....बबलु