चित्राताई स्वतःला तशा क्यूटच समजतात, पण एवढ्या??!
आणि चित्राताई एनपीआरच फक्त ऐकतात असं नाही हो, त्या तेव्हा बहुदा हे गाणे ऐकत असाव्यात.
बाकी लहानपणचे धनंजय, प्रियाली (आणि खरे तर सर्वच) मस्त!
'लहानपणीचे मिसळप्रेमी'चे दोन्ही भाग आवडले! सगळीच चित्रे गंमतीशीर आहेत. कोलबेरचे व सहजचे अभिनंदन आणि आभार.
अवांतर --
मला दोन मुद्दे महत्वाचे वाटतात.
१) या दोन्ही भागात मिसळपाववरील काही सदस्यांच्या नावांचा व्यक्तिगत उल्लेख असूनही, 'आपापसात' या सदरांतर्गत त्यांची मुस्कटदाबी न होता हे दोन्ही भाग अद्यापही मेन स्ट्रीमवरच आहेत!
२) तसेच मिसळपावच्या माननीय पंचायतीकडून 'व्यक्तिगत लेखन नको', 'व्यक्तिगत लेखन नको' अशी उरांची बडवाबडवी न होता ते मिसळपाववरून काढूनही टाकले गेलेले नाहीत!
वरील दोन्ही मुद्द्यांमुळेच मिसळपाव हे एक अत्यंत निरोगी आणि खेळीमेळीचं वातावरण असलेलं संकेतस्थळ आहे असे मला अभिमानाने म्हणावेसे वाटते! आणि वर्षादोनवर्षांच्या आतच 'मिसळपाव' हे मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ होईल याबाबत मला खात्री आहे.
त्याचप्रमाणे उद्या जर कुणी इथे येऊन उगाचंच काही विष कालवू लागला तर मिसळपावची पंचायत समिती ते प्रकरण उत्तमप्रकारे आणि लोकशाही पद्धतीने हँडल करावयास समर्थ आहे असेही मला म्हणावेसे वाटते.
मी मिसळपावच्या सरपंचांना, पंचायत समितीवरील सर्व आदरणीय सदस्यांना, आणि तमाम मिसळपावकरांना नवरात्रीच्या मन:पूर्वक शुभेच्छा प्रदान करतो आणि या निमित्ताने मिसळपावचे अभिष्टचिंतन करतो!
सरपंच साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे पंचायतीच्या निवडणुका होतीलच आणि त्या व्हाव्यातच. परंतु मला स्वत:ला मात्र सध्याचीच पंचायत समिती पसंद आहे आणि माझे मत अजून पुढची एक टर्म तरी याच पंचायतीला राहील असे मी जाहीर करतो!
शुभं भवतु!
आपला,
राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, दादर.
भिडेसाहेब, आपल्याला मिसळपाव हॉटेल आवडले. आमच्या हातची एक डीश आवडली. आम्हाला देवी पावली बघा!
खरे आहे इथे बराच व्यक्तिगत उल्लेख आहे त्याचे खरे कारण आम्ही खरच एक कुटूंब आहोत. आम्हाला सगळे जवळचे आहेत. भले म्हणायला "मिसळपावची पंचायत समिती " असा शासकीय भाषा उल्लेख आहे पण खरोखरच हे सगळे लोक आपल्याच घरची मंडळी आहेत.
मराठीतील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ होईल काय ते परमेश्वराला माहीत. आम्ही तरी आमचे हे एकत्र कुटूंब असेच हसत खेळत राहू देत व आमच्यावर तिची कृपादृष्टी कायम राहूदे अशी जगदंबा मातेला विनवणी करतो.
वा वा .. मस्तच एकदम !
यात आमचा फोटो असल्याने हा भाग जरा जास्तच आवडला :)
मजा येत आहे. अजून इतरांचे बालपणीचे फोटो पाहण्यास उत्सूक.
माझ्याकडे वात्सल्याने पाहणारे कोण आहेत बरे? प्रमोदकाका, गुंडोपंत, राजे की अजून कोणी ? (जाणून घ्यायची उत्सूकता आहे:)
बाकी धनंजय, स्वाती, नीलकांत यांचे फोटो झकासच.
-- ("पिक्चर परफेक्ट") लिखाळ.
तो क वी डा ल डा वि क तो
(. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)
असे सत्यवचन हॉटेलमधे भिंतीवर लिहले आहेच! असो तुम्हा सर्वांना आवडले व तसे तुम्ही इथे, माझ्या खरडवहीत लिहलेत. धन्यवाद.
>>मनःपटलावर जशा प्रतिमा आहेत तशाच
एखाद्या व्यक्तीबद्दल ऐकले / वाचले असेल पण पाहीले नसेल तरी डोळ्यासमोर एक रुपरेखा असते. कधी कधी खरी ठरते तर कधी कधी ... त्यातल्या त्यात एखादी व्यक्ती खूपच गूणवान असली पण रुपात आपल्यापेक्षा किंचीत कमी असली तर एक वेगळेच मानसिक समाधान मिळते. :-) (ह्याला सामान्य मनूष्य म्हणतात )
ज्यांच्याशी संपर्क आला, ज्यांचे लिखाण वाचले गेले त्यातून काही आडाखे बांधले गेले, काही वैशिष्ट समजली. त्याचा वापर करून सर्वांचे जितके छान (and Apt)सापडू शकतील तितके छान फोटो लावण्याचा प्रयत्न केला आहे. ते कानाला हेडफोन लावलेले बाळ तर खल्लासच!!! धनंजयचा फोटो मस्तच मिळाला, बघा धनंजय आपल्याला भेटले नसते तर कदाचित तो फोटोपण आपल्या नजरेत भरला नसता. विकासराव म्हणजे मला ते हिंदी पिक्चरमधले जबाबदार कर्ते जेष्ठ बंधू जसे राम - जॅकी श्रॉफ इन राम लखन, किंवा हम साथ साथ साथ मधील मोहनीश बहल.
काही लोकांचा प्रयत्नपूर्वक लहानपणीचा चेहरा कितिही विचार केला तरी कल्पनेत (तुमच्या पैकी काही जण मला म्हणालेत की मी भन्नाट विचार करतो तरीही नाही) आणू शकत नाही उदा. अभिनेता अशोककूमार गांगूली, ए. के हंगल, यनावाला :-) ह. घ्या.
अजून कोणाला बघायचे असल्यास मला खरडीत लिहा बघू जमते का?
बुद्धिमत्तेची जी षडंगे आहेत त्यातील कल्पनाशक्ती हे महत्त्वाचे अंग आहे. श्री.सहज यांच्याकडे ही कल्पनाशक्ती मोठ्याप्रमाणात आहे हे त्यांच्या लेखनातून वारंवार दिसून येते. "बालपणीचे मिसळप्रेमी " यातून तर ती प्रकर्षाने दिसते. योग्य फोटो निवडून , त्यावर समर्पक मजकुर लिहून त्यांनी हा वाचनीय आणि प्रेक्षणीय लेख तयार केला आहे. सर्वच चित्रे यथायोग्य आहेत. त्यांत पहिली तीन सांगायची तरः
१. आजानुकर्ण. २. धनंजय ३. केशवसुमार.
पुन:प्रत्ययाचा सुखद अनुभव देऊन गेला हा धागा. :)
पण धागा प्रवर्तक सहजराव कुठे हरवले? :(
असे काही मजेशीर धागे... ही तर सहजरावांची खासियत होती.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
वर्तमानपत्रात जाहिरात देऊन पहा; आणि हो, शेवटी हे वाक्य लिहायला विसरू नका: ... असशील तसा परत ये, आम्ही तुझे प्रतिसाद उडवणार नाही आणि तुला कंपूबाजांचा म्होरक्या म्हणून पिडणार नाही.
अदिती
प्रतिक्रिया
मस्त!
केशवसुमार
+++++१!!
क्यूट!
+++१
मजा!
आजानुकर्ण आणि धनंजय !!!
अरे हो...
कोलबेर !!
आवडले
लिखाळ !!
हे पाहा सहजराव!
दुसरे
हाहा!
हेच म्हणतो..:)
माझा फोटू
निरोगी संकेतस्थळ!
धन्यवाद
मस्त !
ग्राहकांचा संतोष हेच आमचे समाधान!
हा हा.
कल्पनाशक्ती
मस्त हं ...
ह्या
प्राडॉस
झकास धागा
सहजराव कुठे हरवले?
वर्तमानपत्रात जाहिरात
>>पण धागा