Skip to main content

वाट पाहणं!

लेखक राघव यांनी बुधवार, 24/02/2010 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाचीही वाट पाहणं मोठं जीवघेणं असतं! नक्की कुण्या जन्माचं राहिलेलं देणं असतं!! कवितेची ओळ साधी, हवी तेव्हा स्फुरते का? डोळ्यांपुढे झोपसुद्धा नको तेव्हाच येते ना? :W हटखोर वळवासारखं यांचं येणं असतं.. वळवाचं काय म्हणा, त्याचं कामच भिजवण्याचं! गारव्याची आस, पुन्हा हृदयात जागवण्याचं!! :) आणिक हवं असण्याचं, दु:ख नेहमी दुणं असतं.. ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण? इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? :) त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं.. राघव
लेखनविषय:

वाचने 1844
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अप्रतिम!!! काळजाला हात घालणारी कविता. ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण? इवलासा प्रश्न आता एवढा मोठ्ठा वाटतो ना पण? त्या अनामिक ओढीचंही आपल्याकडून नेणं असतं.. व्वा!! राघव, जियो!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

अ-प्र-ति-म!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! >ज्याच्यासाठी जगतो आपण, त्याच्याविना जगतो(च) का पण?>> वोह जीना भी कोइ जीना होता है?? ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्राजु अन् शुची, तुम्हा दोघींचेही मनापासून आभार. :) राघव

कविता गीत म्हणूनही - विशेष करून एखाद्या मराठी चित्रपटात शोभावेसे चित्रपटगीत - छान आहे. (कविताप्रेमी)बेसनलाडू