चिकन-६५

गणपा पाककृती
नमस्कार मंडळी, इंडो-चायनीझ च्या नवीन भागात आपल सहर्ष स्वागत :) या विकांताला काही मित्र मंडळी आली होती. सगळे अट्टल नॉन व्हेज खाणारे असल्याने एक छोटे खानी कौल टाकुन एक मुखाने चिकनच्या निवडीवर शिक्का मोर्तब झाले. :) आपल्या व्हेज मंडळीं साठी याच व्हेज वर्जन आधीच दिलेल आहे. साहित्य: ३/४ किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करुन. १ मोठा चमचा आल-लसुण पेस्ट. ३-४ पाकळ्या किसलेला लसुण. १.५ लहान चमचा वर्‍हाडी ठेचा. (असल्यास) २ चमचे सोया सॉस. १ लहान चमचा हळद. २ लहान चमचे लाल तिखट. ३-४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करुन. ३-४ कडिपत्याची पाने. १ लहान चमचा घट्ट दही. १ मोठा चमचा कॉन फ्लॉवर. २ मोठे चमचे मैदा. स्वादानुसार मीठ. आवडत असल्यास तंदुर रंग. तळण्यासाठी तेल. कृती: सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या. त्यात सोया सॉस, हळद,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, कडिपत्ता, ठेचा, किसलेला लसुण आणि लाल तिखट टाका. त्यातच दही, मैदा , कॉन फॉवर, रंग आणि स्वादानुसार मीठ टाका. चांगल मिक्स करुन १ ते २ तास मुरत ठेवा. २ तासांनी कढईत तेल तापवून खरपुस तळुन घ्या. नाटक्याशेठ पासुन स्फुर्ती घेउन एक जहाल मादक पेय बनवले. वॉटरमेलन्-मार्टिनी. आस्वाद घ्या :)

13 टिप्पण्या 11,803 दृश्ये

Comments

विंजिनेर नवीन

मस्त रे गणपा!! (१२५ वाचने आणि गणपाच्या पाकृला पहिलाच प्रतिसाद? :O प्रतिसादांच्याबाबतीत मिपाचं नमोगत होऊ घातलंय काय? ;) )

बट्ट्याबोळ नवीन

गणप्या .. तू एक अतिरेकी आहेस !!! किती मारशील आम्हाला !!!! च्यायला .. तुझ्या पाक्रु करून खाउन वजन ६४ च ८० किलो झालं आहे. आणि तुझ्यामुळे डाएट करताच येत नाही ...

प्रभो नवीन

हॅहॅहॅ... गण्या, लेका एक प्लेट दे पाठवून... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

प्राजु नवीन

झालं!! पुन्हा एकदा दिवस सत्कारणी लागला. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

स्वाती दिनेश नवीन

मस्त फोटू आणि कृतीही.. स्वाती

पक्या नवीन

जबर्‍या. तुम्ही आता हॉटेल काढा राव. जय महाराष्ट्र , जय मराठी !

मी-सौरभ नवीन

दोन्ही आयटम लै भा....हा री....ही ही ही ... ही ही ...... ----- सौरभ :)

चतुरंग नवीन

एकदाचा मी पुन्हा चिकन खायला लागलो म्हणजेच तुझा जीव शांत होणार आहे असं दिसतंय! ~X( (सामिष - आमिष)चतुरंग

वाहीदा नवीन

गणपा, आता तुम्ही तुमच्या पाककृती पुस्तकाचे प्रकाशन च करून टाका मग कधी येणार पुस्तक बाजारात ??? 8> ~ वाहीदा