चिकन-६५
नमस्कार मंडळी,
इंडो-चायनीझ च्या नवीन भागात आपल सहर्ष स्वागत :)
या विकांताला काही मित्र मंडळी आली होती. सगळे अट्टल नॉन व्हेज खाणारे असल्याने एक छोटे खानी कौल टाकुन एक मुखाने चिकनच्या निवडीवर शिक्का मोर्तब झाले. :)
आपल्या व्हेज मंडळीं साठी याच व्हेज वर्जन आधीच दिलेल आहे.
साहित्य:
३/४ किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करुन.
१ मोठा चमचा आल-लसुण पेस्ट.
३-४ पाकळ्या किसलेला लसुण.
१.५ लहान चमचा वर्हाडी ठेचा. (असल्यास)
२ चमचे सोया सॉस.
१ लहान चमचा हळद.
२ लहान चमचे लाल तिखट.
३-४ हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करुन.
३-४ कडिपत्याची पाने.
१ लहान चमचा घट्ट दही.
१ मोठा चमचा कॉन फ्लॉवर.
२ मोठे चमचे मैदा.
स्वादानुसार मीठ.
आवडत असल्यास तंदुर रंग.
तळण्यासाठी तेल.
कृती:
सर्व प्रथम चिकन स्वच्छ धुवुन त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
त्यात सोया सॉस, हळद,आल लसुण पेस्ट, हिरवी मिरची, कडिपत्ता, ठेचा, किसलेला लसुण आणि लाल तिखट टाका.
त्यातच दही, मैदा , कॉन फॉवर, रंग आणि स्वादानुसार मीठ टाका.
चांगल मिक्स करुन १ ते २ तास मुरत ठेवा.
२ तासांनी कढईत तेल तापवून खरपुस तळुन घ्या.
नाटक्याशेठ पासुन स्फुर्ती घेउन एक जहाल मादक पेय बनवले. वॉटरमेलन्-मार्टिनी.
आस्वाद घ्या :)
वाचन
11801
प्रतिक्रिया
0