उडप्याच्या बाजूलाच शोरबा, कबाब आणि बिर्याणी मिळायला हवी. तर सगळे खूष होतील.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
इतर कोणत्या देशात रस्त्याच्या मधोमध 'ऐतिहासिक' कारणासाठी जपून ठेवलेली देवळे आणि मशीदी दिसतात?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
अरे 'मिपा'करांनो,
खेळाडू आताच मैदानात उतरलाय्. पंचाकडून (umpire) अजून 'सेंटर' मागतोय्. अजून पवित्राही (stance) घेतलेला नाहींय् आणि तुम्ही लोकांनी शरीराच्या दिशेने चेंडूफेक (bodyline bowling) सुरू केली. जरा एक-दोनदा बॅट फिरवू दे, एक-दोन चेंडू खेळू दे! मग टाका 'आपटबार'!
पण माझं वैयक्तिक मत असं आहे कीं भारतीय मुस्लिम समाजाने जर असं केलं तर फाळणीच्या वेळेला झालेली मनांची ताटातूट संपेल!
तरी अशी आशा आहे कीं मुस्लिम बांधव ही संधी सोडणार नाहींत!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
भारतीय मुस्लिम समाजाने जर असं केलं तर फाळणीच्या वेळेला झालेली मनांची ताटातूट संपेल!
खर बोल्ला काका. मुस्लीम इचारवंत काय म्हणतेत. हिंदू मानसिकता काय म्हणती त्याचाबी इचार करा पाह्यजे.
चांगल्या इषयावर प्रसार माध्यमबी मोकळ्या मनानं बोलना.
बाबुराव :)
कुराणात मूर्तीपूजा हे अक्षम्य पाप मानले जाते (४:४८).
कुराणात जे लिहिले आहे ते देवाने सांगितले आहे. त्यात बदल होऊ शकत नाही असा मुस्लिमांचा विश्वास आहे. त्यात काहीही चूक असू शकत नाही असाही विश्वास आहे.
असे असेल तर देवाला मंजूर असणार्या पद्धतीची प्रार्थना एका स्थळी आणि देव ज्याला अक्षम्य पाप मानतो त्या पद्धतीची प्रार्थना त्याच्या जवळच हे कुणातरी डोकेफिरु मुस्लिमाला खटकणे शक्य आहे आणि त्यातून काही उत्पात घडू शकेल. जसे आत्मघाती हल्ला.
हिंदू लोकांचा असा एकमात्र ग्रंथ नसल्यामुळे असे होण्याची शक्यता कमी असली तरी कुणीतरी आगलाव्या भाषणाने बिथरुन तोही मशिदीचे नुकसान करु शकेल.
त्यामुळे पुरेशी सुरक्षा व्यवस्था कायमस्वरुपी असेल तरच हा पर्याय व्यवहार्य आहे.
हे भाजपाचे अधिवेशन इथे इंदोरात चालु होते.गडकरींनी ह्या मुद्याचा अगदी ओझरता उल्लेख केला.अन वर ही टिप्पणी ही केली कि जर हा मुद्दा मी चर्चेत घेतला नाही तर भाजपा अध्यक्ष ह्या मुद्द्याला विसरले असे लोक म्हणतील.
त्यांच्या पुर्ण भाषणात त्यांनी इतरही अनेक मुद्दे मांडले.पण मिडियाने नेहमीप्रमाणे ह्यासारख्या विषयालाच मुख्य मुद्दा बनवला.
भाजपा अध्यक्ष ह्या मुद्द्याला विसरले असे लोक म्हणतील.
भाजपा अध्यक्ष ह्या मुद्याला इसरले नाय आन सामान्य जनताबी इसरलेली नाय.
कसाबी करुन ह्यो मुद्दा धगधगत राह्यला पाह्यजेन. ते इंदोरात बोलो नाय तर कुठंबी बोलो
बराबर की नाय
बाबुराव :)
श्री बाबुराव, मंदिराच्या बाजूला मशीद बांधणे शक्य आहे तर असलेल्या मशीदीच्या बाजूलाही मंदिर बांधणे शक्य होते. मग मशीद का पाडली? गडकरींनी ज्येष्ठांना मशीद पाडण्याचे कारण विचारून बोलायला पाहीजे होते. गडकरीबाबा तर असलेली वोटबँक घालवायच्या मागे लागलेले दिसतात ब्वॉ.
मंदिराच्या बाजूला मशीद बांधणे शक्य आहे तर असलेल्या मशीदीच्या बाजूलाही मंदिर बांधणे शक्य होते. मग मशीद का पाडली?
एकदम बराबर
गडकरींनी ज्येष्ठांना मशीद पाडण्याचे कारण विचारून बोलायला पाहीजे होते.
हेबी बराबर
बाबुराव :)
ज्याच्या ह्रदयी राम आहे त्याला कुठल्याही मंदिराची जरुर नाही.
तसेच ज्याच्या ह्रदयी 'अल्ला' आहे त्याला कोणत्याही मशिदीची जरुर नाही.
दुर्दैवाने असे लोक सध्या स्वल्पमतात आहेत.
मशीद पाडली गेली असल्याने या प्रस्तावाचा (मशीद बांधून देऊ) कसा भरवसा धरायचा. त्या ऐवजी मशीद होती तिथे बांधून द्या मग शेजारी मंदिर बांधायला "मोठ्या मनाने" सहकार्य करता येईल.
(अवांतर : हा प्रतिसाद गडकरींच्या विशिष्ट प्रस्तावाला आहे. अन्यथा काहीच बांधायची बांधून द्यायची गरज नाही. ठाकरे यांनी केव्हातरी म्हटल्याप्रमाने हॉस्पिटल बांधले तर बरे).
नितिन थत्ते
चर्चा वाचून झोप आली :) वाचनखुण साठवलीये :) कधी झोप नाही आली तर तेवढीच सोय :) चालू द्या :)
- गप्झोपराव
स्वप्नात सुंदर्या आहेत , तोवरंच झोपण्यात मजा आहे.
प्रतिक्रिया
च्यायला
नाही हो
भेन्डि
खरं आहे..
इतर देश
एक-दोनदा बॅट फिरवू तरी द्या!
भारतीय
मशीद आणि मंदिर,
कट्टरपणाची अडचण आहे
हे भाजपाचे
भाजपा
घरघालू धंदा?
मंदिराच्य
मुद्दा
हा हा हा
राम के नाम
भिकार@# प्रतिक्रिया
चर्चा
++++
कुरानातल्