✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....(आमचे मॅनेजमेंट गुरू)

ज
जे.पी.मॉर्गन यांनी
Mon, 02/15/2010 - 17:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
22934 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

मॉर्गन

शुचि
Mon, 02/15/2010 - 17:46 नवीन
मॉर्गन, मला क्रिकेट मधलं काही कळत नाही पण माणसामधली पॅशन (मराठी शब्द?) कळते. आपल्या या क्रिकेट्च्या पॅशन ला माझा सलाम :) मला पुढील वाक्य खूप मजेशीर वाटलं - >>त्यांचा कर्णधार अ‍ॅलन बोर्डर हा आताच्या हिशोबानी क्रिकेटपटू कमी आणि पुण्यातल्या कार्यालयातल्या केटररसारखा जास्त वाटायचा. क्षेत्ररक्षकाला सूचना देतानाचा आविर्भाव सुद्धा "इकडे मसालेभात आणि आळूभाजी घे रे" अश्याच थाटाचा. >> =)) =)) =)) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जे.पी.मॉर्गन
Mon, 02/15/2010 - 18:14 नवीन
धन्यवाद शुचि ! क्रिकेटच्या बाबतीत मी बर्‍यापैकी 'गॉन केस' आहे हे खरंय :) ह्या खेळानी खूप काही दिलंय बघा ! पुनश्च धन्यवाद! जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

मध्ये एका

भडकमकर मास्तर
Mon, 02/15/2010 - 17:55 नवीन
मध्ये एका लेखात वाचलं होतं... अमिताभच्या "मैं आज भी फेंके हुए पैसे नही उठाता सेठ" नं मनात स्वाभिमान रुजवल्याचं... अहो आम्ही पण हापिसात दादाचं नाव घेतो आणि डायरेक्टरला बिनधास्त सांगतो "तू दिलेली टार्गेट्स unrealistic आहेत". एखाद्या नवीन पोराला समजावताना कुठेतरी इम्रान डोक्यात असतो.... टीमला कामं वाटून देताना कुठेतरी रणतुंगाचे संस्कार झालेले असतात... ऐन स्प्रिंटच्या मध्ये काही गोची झाली तरी थोरल्या वॉसाहेबांचं स्मरण करतो..... सेल्समध्ये सतत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा कुठेतरी क्रोनएनी दिलेली असते.... आणि माहीला बघूनच पहिल्या डीलवर प्रॉडक्ट मॅनेजरला सही करू द्यायची कल्पना सुचलेली असते ! आणि तुम्ही काय म्हणता राव... की क्रिकेट फक्त एक खेळ आहे? अहाहा.. १ नंबर...
  • Log in or register to post comments

सहमत

श्रावण मोडक
Mon, 02/15/2010 - 19:55 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

१००% सहमत

संदीप चित्रे
Tue, 02/16/2010 - 05:56 नवीन
सगळा लेख आणि विशेषतः शेवटचा परिच्छेद खासच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

सहमत!

स्वाती दिनेश
Wed, 02/17/2010 - 18:05 नवीन
मास्तरांशी अगदी सहमत.. लेख खूप म्हणजे खूपच आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

क आणि ड आणि क

गणपा
Mon, 02/15/2010 - 18:14 नवीन
एकदम क आणि ड आणि क लेख. जियो मॉर्गनसाहेब.
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 02/15/2010 - 20:51 नवीन
सहमत !! !! क ड क !! (क्रिकेटप्रेमी) बैलोबा चायनीजकर !!! © Copyrights 2008-2010. All rights reserved.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शब्द संपले

मेघवेडा
Mon, 02/15/2010 - 18:55 नवीन
शब्द संपले राव!! न बोलणेच बरे!! वाक्यावाक्याला टाळ्या!! आणि शेवट म्हणजे कळस आहे अगदी!!! खरंच अगदी क आणि ड आणि क असेच लिहीत असा साहेब! मजा येते वाचायला! -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments

आणखी एक बहारदार षटकार!

बहुगुणी
Mon, 02/15/2010 - 19:31 नवीन
सहावा भाग पहिल्या पाचांइतकाच उत्तम जमलाय. फक्त या नेत्यांच्या यादीत १९७४ ते १९८५ अशी जवळजवळ सलग ११ वर्षं वेस्ट इंडिजचं नेतृत्व करणारा क्लाईव्ह लॉईड हवा होता असं वाटून गेलं.१९७५ आणि १९७९ चे विश्वचषक जिंकणारा हा कप्तान माणूस म्हणूनही उत्तुंग होता, सहकार्‍यांची कायम काळजी घ्यायचा असं आठवतंय. त्रिनिदादच्या एका कसोटीत त्याच्या hip bone ला वेदना होत असतांना, व्हिव रिचर्ड्स ने "मी आधी जातो हवं तर" असं म्हंटलं असतांनाही, हा पठ्ठा हाडात इंजेक्शन घेऊन चांगली खेळी करून गेल्याचं आठवतंय. Image removed.
  • Log in or register to post comments

नक्कीच

जे.पी.मॉर्गन
Tue, 02/16/2010 - 11:18 नवीन
बहुगुणी! लॉईड काय, कपिल काय अगदी डग्लस जार्डीन, ब्रेअर्ली, बॉब सिंप्सन, ब्रायन क्लोज, मार्टिन क्रो... सगळेच भन्नाट कॅप्टन्स होते. पण दुर्दैवानी मला त्यांचा खेळ बघायला मिळाला नाही. मी लेखात म्हटल्याप्रमाणे ८७ च वर्ल्डकपसुद्धा मला अगदी पुसट आठवतो. ह्या मालिकेतही "मी पाहिलेल्या" खेळाडू - पंच - समालोचकांबद्दलच लिहीले आहे. मधुबाला सुंदर होतीच हो..... पण आमच्या स्वप्नांत आधी माधुरी आणि मग ऐश्वर्या आली त्याला कोण काय करणार? ;) "माझं प्रेम" शब्दांत व्यक्त करता यावं म्हणून मला आठवणारेच खेळाडू निवडलेत ! लॉईडबद्दल आणि इतरांबद्दल वाचायला मात्र नक्की आवडेल! मनःपूर्वक धन्यवाद जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

निव्वळ अफलातून

सुमीत
Mon, 02/15/2010 - 21:36 नवीन
मला हा भाग फारच आवडला जेपी, खूप सुंदर लिहिले आहेस अगदी निर्विवाद
  • Log in or register to post comments

मस्त, मस्त, एकदम मस्त!!

चतुरंग
Mon, 02/15/2010 - 22:32 नवीन
हा लेखही आवडला रे जेपी! संपूर्ण लेखात चारोळ्या, बदाम, काजू, पिस्ते, आक्रोड अशा ड्राय फ्रूट्सची रेलचेल आहे त्यामुळे नेमकं एकच काय आवडलं असं सांगणं अवघड आहे! शेवटचा पॅरा म्हणजे लेखाचं 'सिनॉप्सिस' आहे! ;) (हाताखाली नसलेल्या लोकांकडूनही कामे करुन घेणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments

मॉर्गनराव

मदनबाण
Tue, 02/16/2010 - 03:31 नवीन
मॉर्गनराव लयं वाट पहायला लावलीत हो... दादा "दादा" होता ! येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स... :) बाकी लेख भारी झालाय हे काय नव्याने सांगितल पाहिजे काय ??? ;) जाता जाता :--- शेवटचा पॅरा सॉलिट्ट्ट्ट् हाय !!! ;) (आयटी मधलाच पेड स्लेव्ह.) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments

जबरा लेख

विसोबा खेचर
Mon, 02/15/2010 - 23:25 नवीन
जबरा लेख रे जेपी! जियो.. (सचिनप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

व्वा!

आशिष सुर्वे
Tue, 02/16/2010 - 00:07 नवीन
तुमच्या शब्दांमध्ये 'मार्क वॉ'च्या खेळाची नजाकता आहे!! अप्रतिम!! ====================== कोकणी फणस कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं, कधीकधी वाटतं की काही वाटू नये, नंतर वाटतं की जाऊ देत! वाटण्या ऐवजी सरळ.. मिक्सरमधूनच काढावे!!
  • Log in or register to post comments

वा!

सुमीत भातखंडे
Tue, 02/16/2010 - 03:17 नवीन
मस्त लेख. एकदम कडक!!!
  • Log in or register to post comments

सुंदर

चंडोल
Tue, 02/16/2010 - 06:42 नवीन
सुंदर लेख, पण आपल्या कपिलला विसरलात मालक, लोकांना प्रेरणा देत अन स्वतःही मोलची खेळी करायची या बाबतीत कपिल इम्रानाच्याच तोडीचा होता.
  • Log in or register to post comments

विसरलो नाही !

जे.पी.मॉर्गन
Tue, 02/16/2010 - 11:35 नवीन
विसरलो नाही चंडोल... मी आधीही म्हटल्याप्रमाणे मी पाहिलेल्या खेळाडूंबद्दलच मी ह्या मालिकेत लिहीलंय. आणि माझ्या आठवणीतला कपिल (दुर्दैवाने) ४३२ विकेट्सच्या पलिकडे ढकलण्यासाठी असलेलं ओझं होता.... कपिलची माझी आठवण म्हणजे त्यानी "रडीचा डाव" खेळून पीटर कर्स्टनला आऊट केलेलं. आता माझं चूकही असेल, पण समहाऊ तो तडाखेबंद, जोगरबाज कपिल मला कधी बघायलाच नाही मिळाला. आणि वैयक्तिकरित्या विचाराल तर मला लॉर्डसवर वर्ल्डकप ऊंचावणार्‍या कपिलपेक्षा तिथेच शर्ट काढून विरवणारा गांगुली जास्त भावतो. Image removed. Image removed. कपिलच्या महानतेबद्दल शंकाच नाही पण दुर्दैवानी मला "तो" कपिल बघायला नाही मिळाला. मधुबाला, वैजयंतीमाला, वहीदा रहमान भारी होत्याच हो... पण आमच्या खोलीत पहिलं पोस्टर माधुरीचं लागलं :( प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद जे पी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंडोल

"रडीचा डाव" खेळून पीटर कर्स्टनला आऊट केलेलं.

कानडाऊ योगेशु
Tue, 02/16/2010 - 12:02 नवीन
मॉर्गनभाऊ,हे पूर्णसत्य नाही आहे. त्या कसोटी सामन्यात आदल्या दिवशीच कपिलने कर्स्टनला वॉर्निंग दिली होती.म्हणजे तो क्रिझबाहेर आहेस हे त्याच्या नजरेस आणुन दिले होते व खिलाडुवृत्ती पूर्णपणे दाखवली होती.तिच चुक कर्स्टनने दुसर्या दिवशी केली and then Kirsten was punished...!!! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

वनडे

जे.पी.मॉर्गन
Tue, 02/16/2010 - 12:08 नवीन
योगेश... तो कसोटी नाही तर एकदिवसीय सामना होता. कपिलच्या रिअ‍ॅक्शन वरून असं दिसतं की त्याने कर्स्टनला आधी तीन वेळा वॉर्निंग दिली होती.. .पण त्या चित्रफितीत असं दिसून येईल की कर्स्टन रन घेण्यासाठी क्रीझ सोडून बाहेर आला नव्हता तर केवळ त्याची बॅट क्रीजच्या किंचित बाहेर होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मला "तो" कपिल बघायला नाही मिळाला...

कानडाऊ योगेशु
Tue, 02/16/2010 - 12:07 नवीन
तो कपिल कदाचित भारत झिंबाव्वे सामना पाहणार्या प्रेक्षकांशिवाय कोणालाच पाहायला मिळाला नाही. कल्पना करा ५ बाद १७ असा स्कोअर असताना तळाच्या फलंदाजांना हाताशी घेवुन विक्रमी १७५ धावा काढणे व तो सामना जिंकुन देणे हे नुसते वाचले तरीही अंगावर रोमांच उभे राहतात.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

सहमत

चंडोल
Wed, 02/17/2010 - 07:30 नवीन
सहमत .. 'दादागिरी' हा गांगुलीचा गुण माझ्याही विशेष आवडीचा. असं म्हणतात कि जिंकण्यावर प्रेम असण्या पेक्षा हरण्या बद्दल घृणा असणं महत्वाचं. दादाने ही मनोवृत्ती भारतीय संघात रुजवली जी अतिशय उपयोगी ठरताना दिसत आहे. गांगुलीचा हा शट 'लॉर्डस' वर जतन करण्यात आला आहे आणि त्याचा फोटो मी जतन केला आहे :
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जे.पी.मॉर्गन

मस्त --प्रभ

प्रभो
Tue, 02/16/2010 - 06:57 नवीन
मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

मस्त

अमोल केळकर
Tue, 02/16/2010 - 09:37 नवीन
मस्त माहिती. अवांतर : ' हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ' हे सुनील साहेबांचे गाणे नेटवर कुठे मिळेल ? अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

+१

baba
Tue, 02/16/2010 - 09:51 नवीन
एकदम जबरा!! अजून लिहा... ..बाबा
  • Log in or register to post comments

फार सुंदर

कानडाऊ योगेशु
Tue, 02/16/2010 - 12:12 नवीन
फार सुंदर लेख लिहिला आहे. क्रिकेटकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन आवडला. क्रिकेट मधुनही व्यक्तिमत्व विकास साधता येतो हे तुम्ही दाखवुन दिले आहे. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

अतिशय

पाषाणभेद
Tue, 02/16/2010 - 12:39 नवीन
अतिशय पिळदार अन बांधेसूद लेखन. Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलय..

उपास
Tue, 02/16/2010 - 21:18 नवीन
कय लिवलय! कय लिवलय! मॆनेजमेंटच्या प्रिन्सिपल्सचा खेळाच्या दृष्टीकोनातून विचार मस्तच जमलाय. हर्ष भोगलेला पाठवायला हवाय हा लेख. कपिलविषयी म्हटलेलं आहेच वरच्या प्रतिसादात आणि १९८७ च्या नंतरचा कालखंड विचारात घेतल्याचे म्हटलेय तुम्ही हे ही बरोबर पण अगदीच राहावत नाही म्हणून.. पाकिस्तानसाठी इम्रान तसा आपल्यासाठी कपिल. ८३ च्या वर्ल्ड कप मध्ये झिंबावे बरोबरची कॆप्टन्स इनिंग्ज असूं दे की रीचर्ड्सचा फायनल मधे उलटा धावत जाऊन घेतलेला कॆच. लिडींग फ्रॊम फ्रंटचं उत्तम उदाहरण. समोरच्यावर बिनधास्त चाल करुन जाण्याची वृत्ती आम्हाला शिकवली कपिलनेच. एरवी श्रिकांत आणि कपिल दोघेही बिनडोक्याचे गदाधारी पण कपिलची बातच न्यारी. आठवा शेवटचा खेळाडू समोरच्या एन्डला असताना चार चेंडूत चार सिक्सर मारून कपिलने टाळलेला फॊलोऒन.. समोरच्याला संपवायचा तो माईंडसेट आपल्याला पूर्वी दिसलाच नाही कुठे.. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जगात सर्वश्रेष्ठ ठरु शकतो हा त्याने पूर्ण भारताला दिलेला आत्मविश्व्वास. भारताची अर्थव्यवस्था मुक्त नव्हती आणि जगात भारताचा ठसा उमटू शकेल इतकं काही थोर होत नव्हतच. भारतातल्या एका पूर्ण पिढीला कपिलच्या वर्ल्ड कप उंचावणाया फोटॊने एक आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती दिलेय हे विसरता येणार नाहीच. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

+१ हेच मनात आलं!

चतुरंग
Tue, 02/16/2010 - 22:11 नवीन
'माहीच्या' लढाऊ पोरांनी आणि त्याही आधी 'दादाने' जी लढवय्या संघाची पायाभरणी केली त्या इमारतीचा पाया मुळात खोदला होता 'कपिलपाजीनं'! हा कणखर जाट त्याच्या रक्तातल्या लढाऊ वृत्तीला साजेसा खेळायचा. मैदानावर खुन्नस घेऊनच खेळावं लागतं तिथं उगीच दयामाया दाखवून चालत नाही हे कपिलनं ओळखलं होतं. शारीरिक तंदुरुस्तीत सुद्धा त्यानं एक आदर्श घालून दिलान, गुडघ्यावर शस्त्रक्रिया होऊनही तो एकही कसोटी किंवा एकदिवस सामना शारीरिक दुखापतीने खेळला नाही असं झालं नाही! १९८३ चा वर्ल्डकप मला आठवतोय. रंगीत दूरदर्शनचं नुकतंच आगमन झालं होतं आणि त्याची ती अफलातून १७५ धावांची खेळी बघता आली होती. आणि त्यानंतरच्या सामन्यात जिंकलेला कपही. रिचर्डसचा अफलातून झेल घेतला तिथेच विंडिज गळफटले आणि पुढे लॉइडचा झेल घेतला त्यावेळी तर फक्त किती वेळात जिंकतात एवढाच प्रश्न होता! विंडिजला अतिआत्मविश्वास नडला! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

कैच्या कैच !

मिसळभोक्ता
Wed, 02/17/2010 - 00:10 नवीन
रंगीत दूरदर्शनचं नुकतंच आगमन झालं होतं आणि त्याची ती अफलातून १७५ धावांची खेळी बघता आली होती. रंगाशेट, कैच्या कैच बोलू नका ! झिंबाब्वे-भारत हा १९८३ च्या प्रुडेन्शियल कपातला सामना चित्रफीतीवर उपलब्ध नाही ! त्याच वेळी ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज सामना होता, त्यामुळे ह्या दोन्ही लिंबू-टिंबू सामन्यासाठी एकही व्हिडियोग्राफर हजर नव्हता. तुम्ही कसे टीव्हीवर बघणार ? -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मिभो तुम्ही म्हणताय ते

चतुरंग
Wed, 02/17/2010 - 00:45 नवीन
बरोबर असावं, आत्ताच मी तो विडिओ शोधायचा प्रयत्न केला तर एकही दुवा हाती लागत नाही, फायनल मॅच मात्र सगळी यू ट्यूबवर दिसते आहे. माझ्या आठवणीत काहीतरी घोळ आहे. चुकीबद्दल क्षमस्व! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

माझ्या

sujay
Wed, 02/17/2010 - 00:59 नवीन
माझ्या माहिती प्रमाणे त्या दिवशी ब्रॉडकास्टर्सचा का क्यामेरामन लोकांचा संप होता, त्यामुळे त्या सामन्याच चित्रण कुठेच उपलब्ध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

मेघवेडा
Wed, 02/17/2010 - 01:10 नवीन
असेच म्हणतो. माझे बाबा जेव्हा मला क्रिकेटच्या रंजक गोष्टी सांगत तेव्हा या सामन्याचा उल्लेख नेहमीच व्हायचा आणि "कपिलच्या त्या अजरामर खेळीची चित्रफीत नाही, आम्ही आपले ऐकले ते तुम्हाला सांगतो" असे माझ्या बाबांनी मला कित्येकदा सांगितल्याचे स्मरते. तो सामना झाला होता 'टनब्रिज वेल्स' या केंट मधल्या छोट्याशा गावात 'नेव्हिल ग्राऊंड'वर. मैदान फार लहान होते (आहे) आणि सामनाही दोन हलक्या संघांचा होता त्यामुळे अधिकृत कॅमेरा क्रू तिथं गेलाच नाही. मी गेल्या ऑक्टोबरमधे त्या मैदानावर जाऊन आलो. बाबांनीच सांगितलं गावाचं नाव मला. आजही त्या मैदानात दोन पॅव्हेलिअन्स सोडली तर एकही छत नाही, स्टेडियम तर सोडाच. 'टनब्रिज वेल्स क्रिकेट क्लब'चाही 'केंट काउंटी डिव्हिजन' मधला परफॉर्मन्स काही खास नाही आणि या मैदानापेक्षा कित्येक चांगली चांगली मैदाने इंग्लंडमधे आहेत. याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या मैदानांवर तर मी सुद्धा खेळलोय. :D (मस्करी नाही, खरंच) तेव्हा हे मैदान पाहून, या मैदानावर विश्वचषकाची मॅच खेळवली गेली याचं फार आश्चर्य वाटलं. -- मेघवेडा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

अहाहा ...

संग्राम
Tue, 02/16/2010 - 22:29 नवीन
जबरदस्त ... कोणत्या वाक्याला ">>" लिहून दाद देवू आणि कोणत्या नको हे कळेना ... अगदी वाचता वाचता डोळ्यासमोर जिवंत झालं सगळं....
  • Log in or register to post comments

लीडर

नितिन थत्ते
Tue, 02/16/2010 - 22:56 नवीन
Great leaders are those who extract superlative performance from ordinary team. आपण वर्ल्डकप जिंकला तेव्हाची टीम आठवा. गावसकर- याला वनडेचा प्लेअर कुणी म्हणणार नाही. श्रीकांत, संदीप पाटील आणि स्वतः कपिलदेव हे त्यातले उत्तम खेळाडू. वेंगसरकर बरा, मोहिंदर सो सो आणि किरमाणी विकेटकीपर म्हणून उत्तम पण वनडेचा खंदा खेळाडू नव्हे. बाकी मदनलाल, कीर्ती आझाद, यशपाल शर्मा, रॉजर बिन्नी*, बलविंदर संधू... नावं सुद्धा आठवत नाहीत. अशा खेळाडूंकडून वर्ल्ड कप जिंकवणे म्हणजे थोर कार्य. *रॉजर बिन्नीने त्या वर्ल्डकप मध्ये १८ विकेट काढून अव्वल परफॉर्मन्स दिला. त्याच्याच मुळे आपण वर्ल्डकप (आणि १९८५ ची ऑस्ट्रेलियातली बेन्सन हेजेस स्पर्धा) जिंकलो असे मी म्हणेन. कपिलला नाहीच वगळू शकत. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

बलविंदर संधू

मिसळभोक्ता
Wed, 02/17/2010 - 00:18 नवीन
बलविंदर संधूने ग्रीनिजचा त्रिफळा उडवून सुरुवात केली होती. आणि ८३ चा हीरो बिन्नी नाही (अर्थात, माझ्या मते), तो खरा मोहिंदर अमरनाथ ! ८५ चा हीरो नक्कीच रवी शास्त्री (आणि शिवरामकृष्णन). -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कपिलला नाहीच वगळू शकत.

जे.पी.मॉर्गन
Wed, 02/17/2010 - 17:21 नवीन
>>कपिलला नाहीच वगळू शकत.<< अगदी बरोबर रे दादा... कपिलच्या नेतृत्त्वगुणांबद्दल अथवा एक महान ऑलराऊंडर म्हणून त्याच्या खेळाबद्दल दुमत असूच शकत नाही. पण मी आधी म्हटलंय तसं...मी फक्त मी पाहिलेल्या कालखंडातीलच खेळाडू विचारात घेतले आहेत. आणि मी पाहिलेला कपिल "अ‍ॅसेट" कमी आणि "लायबिलिटी" जास्त होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

१९८३ वर्ल्ड कप चा व्हिडीओ

बहुगुणी
Wed, 02/17/2010 - 02:34 नवीन
दोन भागांतले हायलाईट्स इथे पहायला मिळतील. कपिलने घेतलेला रिचर्ड्सचा कॅच part 2 च्या ८.२०-८.३० या कालावधीत.
  • Log in or register to post comments

दादा

राजकारणी
Wed, 02/17/2010 - 18:25 नवीन
लइ भारी लेख आहे ... नाद खुळा .... >>परवाच आय पी एल च्या एका जाहिरातीत "दादानेंभी आपको मिस किया" म्हणणारा दादा बघितला आणि काय सांगू.... आपल्या "क्रश" नी "मलाही तू आवडतोस" म्हणावं असा आनंद झाला ! << आगदी मनातल बोल्ला राव .... दादागिरी फोरेवर !!! (आन्ग्ल भाषेतील Dadagiri Forever !!!)
  • Log in or register to post comments

दादा

राजकारणी
Wed, 02/17/2010 - 18:26 नवीन
लइ भारी लेख आहे ... नाद खुळा .... >>परवाच आय पी एल च्या एका जाहिरातीत "दादानेंभी आपको मिस किया" म्हणणारा दादा बघितला आणि काय सांगू.... आपल्या "क्रश" नी "मलाही तू आवडतोस" म्हणावं असा आनंद झाला ! << आगदी मनातल बोल्ला राव .... दादागिरी फोरेवर !!! (आन्ग्ल भाषेतील Dadagiri Forever !!!)
  • Log in or register to post comments

सुंदर

राघव
Mon, 07/04/2016 - 01:27 नवीन
संपूर्ण लेखमालाच अतिशय सुंदर. काही काही मला आवडणारे खास म्हणजे - सचिनचा जमिनीला चिकटून जाणारा "ग्लोरीयस" कव्हरड्राईव्ह.. द्रविडचा ऑफस्पिनला खाली बसून कव्हर्सच्या डोक्यावरून मारलेला लॉफ्टेड सिक्सर.. कुंबळेचा अनप्लेयेबल फ्लीपर.. मॅग्राचा डवखुर्‍या बॅट्समनला राऊंड-दी-विकेट बॉलिंग करताना सारख्याच अचूकतेने टाकलेला ईनस्विंगर[बॅट्समनला बाहेर जाणार].. सकलेनचा अशक्य ड्रिफ्टर.. रिचर्ड्सनं २ यॉर्करवर लागोपाठ मारलेले फ्लिकचे २ सिक्स.. असे बरेच काही.. :-) बाकी माहीचा कुंबळेला ट्रॉफी घेवू देण्याचा किस्सा लाजवाब! त्यावरून आठवलं दादाच्या शेवटच्या मॅचला शेवटचे काही तास कॅप्टन्सी करायला देण्यातला आदरही फार भावला होता..! इतक्या सुंदर लेखमालेबद्दल पुन्हा धन्यवाद! :-) राघव
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा