Skip to main content

रूप पाहता लोचनी..! (भाग १) :)

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 14/02/2010 10:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2700
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

व्वा !!! अल्टिमेट्स !! तोंड पाणावले !!!! सगळीच थालिपीठे एकसाथ सारखीच आवडल्या गेल्याने बोगस मतदान केल्या आहे :) -:)

लंबर तीनला मत टाकलं...! -दिलीप बिरुटे ''नमोगताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लेखक,कवी आणि सदस्य हवे आहेत. संपर्क: फंजोप आणि फजिती''

लोण्याचा सगळ्यात मोठ्ठा गोळा ७ व्यात आहे :-D

त्या एका फटुत थालीपीठा शेजारी आंबे कशाला चिरून ठेवलेत थाळीत? नाही तो आचरट पणा.. असो. बाकी आम्ही थालीपीठ दिसलं की खाउन टाकतो. फटु काढून मतं-बितं विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. (लोणची झाली, थालीपीठं झाली... आता पुढे कसला काथ्याकूट वाढुन ठेवलाय कोण जाणे ) :?

In reply to by विंजिनेर

(लोणची झाली, थालीपीठं झाली... आता पुढे कसला काथ्याकूट वाढुन ठेवलाय कोण जाणे )
माझं काही सांगता येत नाही.. मी 'नट्यांचे आव्हानात्मक नितंब!' या विषयावरदेखील फक्त पुरुषांकरता कौल-काथ्याकूट टाकीन! ;) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

>>मी 'नट्यांचे आव्हानात्मक नितंब!' या विषयावरदेखील फक्त पुरुषांकरता कौल-काथ्याकूट टाकीन! हा हा हा

मी चवथ्या थालिपिठाला मत दिलं. खमंग वाटतंय शिवाय त्यात साली ती फोडणीची मिर्ची आहे त्यामुळे अधिक घायाळ झालो! :) म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड! छ्या..! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

म्हणजे एकतर छान देखणी बाई, त्यात पुन्हा स्लीव्ह्जलेस ब्लाऊज घातल्यामुळे आव्हानात्मक दिसणारा तिचा तो गोरापान दंड! आता पुढचा कौल मांडा. दोन्ही खांद्यावरून पदरः नूतन दंडाधीकारी. पंधरा दिवसानंतर : धूप छाव दंडाधीकारी. उन्हाळ्यात : मौसमी दंडधीकारी कृश दंडाधीकारी. मध्यम दंडाधीकारी. स्थूल दंडाधीकारी. पण काही चित्रं उत्तम दंडाधीकारी वगैरेची पण टाका.

In reply to by रामदास

अजून काही अ‍ॅडिशन्स... लहानपणी टोचलेल्या देवी दाखवणारी: देविका दंडाधिकारी दंडावरची लव दाखवणारी: सुकेशा दंडाधिकारी दंड वॅक्स केल्यानंतरः मुलायमा दंडाधिकारी दंडातल्या बेटकुळ्या दाखवणारी: जिमी दंडाधिकारी होऊन जाऊ द्या...

In reply to by प्रमोद देव

हे सगळे कौल पाहता... तात्या बहुधा ’वेडा’ झालेला दिसतोय
देवकाका, आता आपण काय म्हणाल ते मान्य! फक्त कौल आवडला की नाही इतकंच प्रांजळपणे सांगा! :) तात्या.

५ नम्बरवाले बिच्चारे कोरडे कोरडे थालिपीठ त्याबरोबर दही लोअणी चटणी मिरची काहीही नाही... अगदी सॉसही नाही ५ नबराच्या थालिपिठाला कोणीही मत देणार नाही असं वाटतंय... बिचार्‍याचे डीपॉझिट रद्द होईल असे वाटत आहे... आमचे मत वीकेष्ट उमेदवाराला... (किंवा त्याची स्वतःचीच चव अप्रतिम असेल की ते भारीच असेल, असे एक आर्ग्युमेन्ट असू शकते) _____________________________ माझ्या कारकीर्दीला परवा बारा वर्षं पूर्ण होतील.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

आई करायची तसं दिसतय. जाडीलाही कमी म्हणजे खमंग असावं. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

अगदी मनातले बोललीस.मलाही पहिलेच थालिपिठ आवडले.पातळ अन खरपुस.

In reply to by भाग्यश्री कुलकर्णी

अगदी गं.. माझं पण मत पहिल्यालाच. अगदी योग्य जाडीचं, योग्य तेवढंच भाजलं गेलेलं, हवं तिथेच खरपूस झालेलं परफेक्ट थालिपीठ. बाकी सगळे... थालिपीठाच्या चवीची कल्पना करायचीये ना? लोण्याचे गोळे, बटर, दही, खाराची मिरची हे काय दगडाबरोबरही उत्तमच लागेल की. - नी http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

In reply to by नीधप

आई गं, आत्ता येईल मग येईल अशी नवर्याची वाट बघत थांबले असताना ही थालिपीठं बघून (भुकेने व्याकुळ होऊन) आता रडू येणार बहुतेक!! बाय द वे, नंबर १ एक नंबर दिसत आहे!! :)

ह्या थालीपीठाला मत दिले आहे. जमेची बाजू : कांदा, कोथिंबीर, कुरकुरीतपणा इ. नीट दिसत आहेत वजेची बाजू: प्रेझेंटेशन अजून थोडे चांगले हवे होते. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

लंबर येक गड्याहो. झक्कास कुरकुरीत, खमंग....... ................. अजून कच्चाच आहे. जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?

नंबर ३ ला.फुल भारी. मुंबईच्या कोणत्याच मराठी हॉटेलात पाहीले नाही,कमी तेलकट आणी नरम.

आमचे मत..... मुलायमा दंडाधिकारी व ४ नंबर थालीपिठ