आता राम लल्लालाच करायला हवे
बाबरीपरी मशिदींच रक्षण
अन रसूल अल्लालाच धावायला हवंय
मंदिर जन्मभूमी वाचवायला .....
स्वत:च्याच अस्तित्वासाठी ...
तथाकथित धार्मिकांचे चोचले जोपासण्यासाठी
स्वत:चे सत्व जपण्यासाठी अन टिकविण्याकरितासुद्धा.....
खूनखराबा, जाळपोळ, विध्वंस करणा-यांना
जातपात नसते, धर्म तर नसतोच नसतो...
असते ती फक्त एक जीवघेणी नशा...
धगधगत्या ज्वाळांची...लाल भडक रक्ताची ...आर्त किंकाळ्याची
वेदनेने तडफडणा-या अश्राप हुंदक्यांची...
तर बा रामलल्ला परमेश्वरा अन रसूललल्ला परवरदिगारा
कान, डोळे, तोंड बंद करून
महात्म्यासारखा स्थितप्रज्ञ बसला असशील तर जरा माणसात ये.
थांबव या हिंस्र पशूंना...
त्यांच्या निगर गट्ट हृदयाच्या गाभा-यात खोलवर शिरून...
माणुसकीचा झरा पाझरत बंधुभावच खरा धर्म याची जाणीव करून दे त्यांना
नाहीतर कोण पढेल रोज नमाज...
अन कोण गाईल महाआरती..... ?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2105
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
सदर कवितेत
In reply to (विषय दिलेला नाही) by अविनाशकुलकर्णी
छान
सारे
"उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद"
In reply to सारे by अविनाशकुलकर्णी
मुस्लीम मनाचा शोध हे जरुर वाचा
In reply to "उगाच उचलला कळफलक बडवला प्रतिसाद" by विजुभाऊ
बजरंग दलाने केलेल्या हत्या विसरलात काय?
In reply to सारे by अविनाशकुलकर्णी
छान आहे
फार
मटा ऑनलाइन