Skip to main content

बटन्ड

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 12/02/2010 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता. थकवा तर जाणवतच होता. हात पाय धूउन तो जेवायला बसला. .................................................... समोर वाफाळलेले जेवण. पेंग घालवण्याकरता टीवी लावला. कुठलासा सिनेमा. नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन. हीरो ऑफिसला निघालेला. शर्ट चे बटन तुटलेले. हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते. आणि मग........ तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला. स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे. ........................................... आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती. शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला. इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले. "अग शर्टाचे बटन नाहीये वरचे" नाश्त्याची भांडी घासत असलेली सौ. दोन मिनिटानी बाहेर आली. हातात दुसरा शर्ट होता. "काढ तो. हा दुसरा घाल. वॉशिंग मशीन बिघडले आहे. कपड्याची रास पडली आहे. ऑफिसला गेल्यावर न विसरता सर्विस सेंटरला फोन कर. दुपारी बटन शिवुन ठेवते". त्याने मुकाटपणे शर्ट हातात घेतला. बुट घालता घालता त्याला पुट्पुटणे कानावर आले. "तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की". आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4116
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की". आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला. =)) -दिलीप बिरुटे

पोपट झाला रे! काहीही म्हणा मास्तर, स्वानुभव लय भारी हाय हं! The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की". आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.
बाझव तिच्यायला! :) मास्तर मस्त किस्सा रे. आणि मांडला आहेस असा की एक छोटेखानी सीनच डोळ्यासमोर आला! (अविवाहीत) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

खरोखरंच बाझवला तिच्यायला =)) =)) =)) काही खरं नाही ... अजुनही काही दृष्ये समोर आनणारे लेख येऊन द्या मास्तर =))

>>आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाल>>> खूप गंमत्शीर :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by वेताळ

आपले अनुभव आपल्याला खुप आवडतात.
म्हणजे हा बटणाचा अनुभव मास्तरचा स्वत:चा आहे? मास्तर काय रे हे? लेका विंजिनियरींगच्या वयाचा मुलगा तुला, आणि अजून स्वत: शर्टाची बटणं मुद्दाम तोडतोस आणि बायडीने ती लगेचंच शिवून द्यावी अशी अपेक्षा करतोस?! :) च्यामारी, मला वाटलं असंच आपलं एक मुक्तक लिहिलं असशील! :) छ्या..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

रीअ‍ॅलिटी शो आहे हा. काल्पनिक नाही.

In reply to by विनायक प्रभू

रीअ‍ॅलिटी शो आहे हा. सरळ हापिसला निघाला? मास्तर, तुम्हाला काय "कॅज्युअल" लीव्ह वगैरे मिळत नाय वाटतं!!! :)

मास्तर ;एक फोल्ड होईल अशी शिडी आणून ठेवा. आनि सदोदीत जवळ ठेवत जा .वापरता येई वेळ येईल तशी ख्या ख्या ख्या ख्या

मस्त किस्सा आहे! -- मेघवेडा भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

तोडीस तोड आहेत. :D ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

बर्‍याच दिवसांनी लोणचे चाखले.. बरे वाटले

काकूंना नमस्कार! =)) =)) =))

ही ही ही! छान लेखन! त्या नवर्‍याचा प्रयत्न चांगला होता पण फसला बिचारा! अवांतर: सर बर्‍याच दिवसांनी आले आहेत. रेवती

बटणच तोडायचे, तर निदान प्यांटचे तरी तोडायचे. शिडी नको, की काही नको. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

अरे पण प्यांटचे बटण शिवताना हाताला धक्का लागला तर तो पुन्हा कोणतंच बटण तोडू शकणार नाही !! ;-) असा सूज्ञ विचार त्याने केला असेल.

In reply to by मराठे

प्यांटीला. बटणंवाली प्यांट नसती आता. पूर्वी बर्‍या असायच्या नै सोयी. सगळं कसं 'बेचेन' असायचं हॅ हॅ हॅ! ;) चतुरंग