आज ऑफिस मधुन येताना खुपच उशिर झाला होता.
थकवा तर जाणवतच होता.
हात पाय धूउन तो जेवायला बसला.
....................................................
समोर वाफाळलेले जेवण.
पेंग घालवण्याकरता टीवी लावला.
कुठलासा सिनेमा.
नेहेमीचा नर्म श्रुंगाराचा सीन.
हीरो ऑफिसला निघालेला.
शर्ट चे बटन तुटलेले.
हीरॉइन सुई दोरा घेउन बटन शिवुन देते.
आणि मग........
तोच सीन डोक्यात घेउन तो झोपी गेला.
स्वप्नात सुद्धा त्याच सीन ची पारायणे.
...........................................
आज ऑफिसला लवकर जायची गरज नव्हती.
शर्ट चढवता चढवता त्याला कालचा सीन आठवला.
इथे तिथे बघत त्याने शर्टाचे बटन तोडले.
"अग शर्टाचे बटन नाहीये वरचे"
नाश्त्याची भांडी घासत असलेली सौ. दोन मिनिटानी बाहेर आली.
हातात दुसरा शर्ट होता.
"काढ तो. हा दुसरा घाल. वॉशिंग मशीन बिघडले आहे. कपड्याची रास पडली आहे. ऑफिसला गेल्यावर न विसरता सर्विस सेंटरला फोन कर. दुपारी बटन शिवुन ठेवते".
त्याने मुकाटपणे शर्ट हातात घेतला.
बुट घालता घालता त्याला पुट्पुटणे कानावर आले.
"तोडलेले बटन निदान खिडकी बाहेर तरी फेकायचे. नाहीतर सिनेमातल्यासारखे छोटे स्टुल तरी आणायचे. लग्नाला आता दहा वर्ष झाली, पैंतरे बाजी कशाला करायची. सरळ सांगायचे की".
आपले बटन्ड तोंड घेउन तो सरळ ऑफिसला चालता झाला.
वाचने
4116
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा
पोपट झाला
"तोडलेले
:)
In reply to "तोडलेले by विसोबा खेचर
बटन्ड तोंड
मास्तर आजकाल ज्यादा लिहित नाही
आपले अनुभव
In reply to मास्तर आजकाल ज्यादा लिहित नाही by वेताळ
तात्या
In reply to आपले अनुभव by विसोबा खेचर
खुलाश्याब
In reply to तात्या by विनायक प्रभू
रीअॅलिटी
In reply to तात्या by विनायक प्रभू
मास्तर ;एक
हे हे कसले भारी.....
मस्त
सौ. मास्तरही...
बर्याच
शि बै ..
In reply to बर्याच by डॉ.प्रसाद दाढे
काकूंना
ही ही ही!
हॅ हॅ हॅ
अरे पण
In reply to हॅ हॅ हॅ by मिसळभोक्ता
चेन असते हो हल्ली
In reply to अरे पण by मराठे