✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आटपाट नगर होतं...

ऋ
ऋषिकेश यांनी
Fri, 02/12/2010 - 10:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4070 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

हम्म

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2010 - 10:33 नवीन
आटपाट नगराची कथा चांगलीच आहे. पण, भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"’ हम्म, स्थानिक,बाहेरचे, हिंदी,मराठी, असा वैरभाव नकोच. अखंड भारत, समृद्ध भारत,विविधतेने नटलेला भारत. अशा प्रतिमेत भर घालायची असेल तर काही संकुचित विचाराच्या पलिकडे पाहण्याची गरज आहे, असे वाटते. ”माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन” -दिलीप बिरुटे [समजदार]
  • Log in or register to post comments

बिरुटे

Dhananjay Borgaonkar
Fri, 02/12/2010 - 12:18 नवीन
बिरुटे साहेब तुम्ही म्हणताय ते खर आहे. संकुचित विचारसरणी नको. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजु असतात तसच ईथेही आहेच की.. आपल्या विभागच मुळात भाषेच्या आधारावर पडले आहेत. प्रत्येक प्रदेशामधे त्या त्या लोकांना प्राधान्य हा जर क विचार असेल तर चुक तरी काय? ”माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन” अगदी मान्य..पण हेच सर्वाना लागु व्हायला पहिजे..हा विचार फक्त महाराष्ट्रापुरता का? नियम केलेत तर सर्वांसाठी.. पुर्ण देशानेच असा विचार केला पहिजे. उत्तरेतील लोक इकडे येउन माज करतात. साउथ वाले आपल्या लुंग्या सोडायला तयार नाहीत.तिकडे त्यांना हिन्दी येत असेल तरी सुद्धा फक्त त्यांचाच भाषेत बोलतात. पी.चिदंबरम एकत्मतेची भाषा करतो मग स्वतः का नाही हिंदीतुन बोलत (जर का आपण हिंदी राष्ट्रभाषा मानली तर).. कोणाला उगाच भांडण करायही हौस आहे जर सगयांनीच जर घालुन दिलेले नियम पाळले तर?? पण तस होत नाहीये..मग असे वाद चव्हाट्यावर येतात. आज पुण्या मुंबईत असंख्य अमराठी लोक रहातात त्यापैकी किती मराठीत बोलतात? जर आपण एखाद्या प्रदेशात बरीच वर्ष रहातो तर तिकडशी भाषा, संस्क्रुती का नाही शिकली जात? आपल्या घरात पाहुणा आला आणी स्वैराचार कारायला लागल तर तुम्ही किती दिवस ऐकुन घ्याल? तुम्ही जर का त्याला तुमच्या घरचे नियम सांगितलेत तर तुमच वागण हे संकुचित झाल का? डोंबिवली ते दादर एक महिना प्रवास करुन बघा (केला नसेल तर). मी अस का म्हणतो आहे हे लक्षात येईल तुमच्या. (तुम्ही म्हणजे शब्दशः तुम्ही नव्हे. मी फक्त उद्देशुन बोलतो आहे. क्रुपया वैयक्तिक समजु नये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाषेचा उद्देश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/12/2010 - 12:37 नवीन
>>आपल्या विभागच मुळात भाषेच्या आधारावर पडले आहेत. प्रादेशिक भाषेमधून ती ती सरकारे आपले कामकाज चालवतील. भाषेमुळे एकात्मतेची भावना निर्माण होईल. राष्ट्रीयत्वाची भावना रुजू लागेल. असा तो उद्देश होता. परंतू भाषावार रचनेच्या ज्याकाही चर्चा आपल्याला वाचायला मिळतात त्यात अशा भाषावार रचनेमधून मध्ययुगीन संस्थानाप्रमाणे वाद होतील, एकमेकांचे शत्रु होतील असा विचार केलेलाच होता, आणि दुर्दैवाने आपली वाटचाल त्या दिशेने सुरु झालेली आहे, असे वाटायला लागते. आणि ते योग्य नव्हे. म्हणूनच राष्ट्राची भाषा एकच हिंदी असावी असे म्हटलेले होते. बाकी, आटपाट नगरीच्या कथेत अवांतर होईल म्हणून थांबतो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

बोधकथा

प्रकाश घाटपांडे
Fri, 02/12/2010 - 10:39 नवीन
बोधकथा आवडली. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

भारताबद्द

विसोबा खेचर
Fri, 02/12/2010 - 10:44 नवीन
भारताबद्दल बोलायचं झालं तर मुंबैतील कष्टकरी उत्तर भारतीयांबद्दल आमचं काहीच म्हण्णं नाही. परंतु त्यांच्या आडून महाराष्ट्रात बसलेले अबु आझमी सारखे भिकारचोट नेते आणि महाराष्ट्राबाहेर बसलेले मुंबै आणि महाराष्ट्र द्वेष्टे नेते जे राजकारण खेळतात त्यामुळे उत्तर भारतीय जनता मुंबैत मार खाते!
"नाहि मी ऑस्ट्रेलियातच राहिन. इथे मी खरोखर परका आहे. तिथे भारतीय असूनही परकेपणाची वागणूक मिळण्यापेक्षा हे बरं काय?"
माझ्या मते भारत कसाही असला तरी ती आपली मातृभूमी आहे.. परक्या देशात राहून अपमान/अवमान/मारहाण का सहन करा? असो..मी आपलं माझं मत मांडलं रे ऋष्या! धागा बाकी छान काढला आहेस आणि छान, मोजक्या शब्दात कथारूप मांडला आहेस! तात्या.
  • Log in or register to post comments

आवडले.

स्वाती दिनेश
Fri, 02/12/2010 - 11:17 नवीन
प्रकटन आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

बोधकथा नाही आवडली.

प्रमोद देव
Fri, 02/12/2010 - 11:36 नवीन
जिथे राहतो तिथली भाषा,संस्कृती जाणून घेऊन त्यात मिसळून राहणे जमत नसेल तर आपला गाव गाठावा हे बरे. इतरात मिसळूनही आपले स्वत्व टिकवता येतेच. पण आपले स्वत्व टिकवण्यासाठी परदेशात/परप्रांतात तिथल्या स्थानिकांशी,त्यांच्या भाषेशी फटकून वागलात तर फटके मिळणारच आणि ते तसे मिळाले की मग गळे काढण्यात काय हंशील आहे? कुणी तरी म्हणून गेलाय ना...बी रोमन व्हेन इन रोम....अगदी, तसे वागणार्‍याला कधी त्रास होण्याची शक्यता जवळपास कमीच असते. मिळून मिसळून वागण्याला पर्याय नाही. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

त्या नगरीत

टारझन
Fri, 02/12/2010 - 12:48 नवीन
त्या नगरीत कधी कोणाला काम मिळालं नाहि असं झालंच नाहि. कष्टकरीच नव्हे तर विद्यार्थी, व्यापारी सगळ्यांची ती पंढरीच होती म्हणा ना!
सुर्दैवानं असं आमच्या आटपाट नगरात होत असतं तर कोणाला हाकलायचा ही संबंध नव्हता .. :) शिवाय वरून नॉर्थ वाल्यांचं राजकारण ? ते ऋषी सारख्या उपर्‍यांचा "पुळका" असणार्‍यांना दिसतंच कुठे ? जेंव्हा हातची वेळ निघुन जाईल नी आपल्यालाच आपल्या जागी नोकर्‍या न घरे मिळणार नाहीत तेंव्हा पुन्हा "अर्रे .. आमच्याच जागी आम्ही कधी परके झालो ?" अशा आशयाचा लेख येऊन दे भावा
  • Log in or register to post comments

ऋषि... तुला

बिपिन कार्यकर्ते
Fri, 02/12/2010 - 20:59 नवीन
ऋषि... तुला काय म्हणायचंय... साम्य दाखवायचंय ते कळलं... पण बरेचवेळा अश्या विचारांमधे एक स्वप्नाळू भोळसटपणा असतो... तेवढा टाळला तरच असे विचार प्रॅक्टिकल ठरतात. नाही तर त्यांचा '६२ मधला नेहरू होतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

नाण्याची तिसरी बाजु

अभिज्ञ
Fri, 02/12/2010 - 21:20 नवीन
ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या व सध्या भारतवारीला आलेल्या काही मराठी माणसांची मध्यंतरी गाठ पडली होती. बोलता बोलता तिथे भारतीयांवर होणारे हल्ले ह्यावर चर्चेची गाडी आली. त्यांच्याकडून मिळालेली माहिती काहितरी भलतीच होती. त्यांच्या अनुभवानुसार भारतीयांवर होणारे हल्ले हे स्थानिक वा मुळ ऑस्ट्रेलियन लोकांकडून होत नसून भारतीयांसारखेच तिथे स्थायिक झालेल्या व ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळालेल्या इतर विदेशी मुळाच्या नागरिकांकडून भारतीयांना "टारगेट" बनवले जात आहे. त्यातही मुख्य भरणा हा इजिप्त,लेबॉनन वगैरे मुळ नागरीकत्व असलेल्या नागरीकांचा आहे. मला वाटते हि नाण्याची तिसरी बाजु असावी. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

नाण्याची अजून एक बाजू ...

खान्देशी
Fri, 02/12/2010 - 22:30 नवीन
http://www.whiteindianhousewife.com/category/learning-hindi/
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ऋषिकेश
Sat, 02/13/2010 - 10:06 नवीन
सगळ्यांचे प्रतिक्रीयांबद्दल आभार. बर्‍याचशा प्रतिक्रीया अपेक्षेप्रमाणेच आहेत. सर्वप्रथम ही कथा प्रातिनिधिक नव्हे. आता मला यातून काय सांगायचंय? इथे मला स्थानिकांचे हक्क वगैरे नाकारायचे नाहियेत. मात्र तो मिळविण्याचा मार्ग दिसेल त्याला बदडणे असा जर असेल तर त्याला विरोध आहे. आपल्या प्रांताचा, भाषेचा वगैरे अभिमान सकारात्मक असावा असे वाटते. सध्या दिसतो आहे तो स्वभाषेचा अभिमान नव्हे तर इतरांबद्दलचा द्वेष. माझ्या देशाबद्दलच्या अभिमानाआड प्रांताचा/भाषेचा अभिमान येता कामा नये. माझ्या स्थानिकत्त्वात माझं राष्ट्रीयत्त्व लोप पाऊ शकत नाहि. आणि असं काहि ठिकाणी होऊ लागलंय हेच दाखवायचं होतं असेही म्हणता येईल की (कदाचित सध्या नाहि पण निदान भविष्यात) माझ्या राज्यातही जितका मान मराठीला असेल तितकाच अन्य भाषांना मिळालेला दिसला तरच माझं मराठीपण, माझ्या राज्यांचं पुरोगामित्त्व, इतरभाषांवर आधारीत राज्यांच्या संकूचित दृष्टीकोनापेक्षा वेगळं दिसेल. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा