Skip to main content

लोणच्यांच्या निवडणुका...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 09/02/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2059
प्रतिक्रिया 45

प्रतिक्रिया

लिंबाचे लोणचे लहानपणा पासून खूप आवडीचे. ....... गोड, तिखट, आंबट ..... आहाहा...... . . लहानपणी आईच्या नकळत बोकाणे भरत असू .... दुसर्‍या दिवशी .....चंबटीचंबटी ची चगागा ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

पण आमच्या मते लोणचे असावे तर आंबटंच .. त्याशिवाय काय चव नाय बा :) - (आंबटशौकीन) नटरंग

देत नाही जा! एकच मत कसं द्यायचं? आणि मुद्दलातली गोष्ट; लोणचं महत्वाचं कशाचं ते नाही.

माझ्या आवडीचं लोणचं म्हणजे "फणसाचं लोणचं" :)

In reply to by जयवी

अय्या फणसाचं लोणचं असतं? - कापा की बरका? :O ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

हळदीचे. (खल्लास!!! साला संस्थळ कसे चालवायचे ते तात्याला विचारा... ;) ) कवटी

In reply to by कवटी

(खल्लास!!! साला संस्थळ कसे चालवायचे ते तात्याला विचारा.
हा हा हा! आमच्या गैरहजेरीत पोरासोरांनी थोडाफार धुरळा उडवला होता.. तेव्हा म्हटलं आता जरा मिपाकडे लक्ष द्यावं! ;) तात्या.

आंबा आंबा आंबा आंबा सहस्त्रवेळा.. आंबा! जल्ला आमाला आंबा सोडून काय बी दिसत नाय बगा!! तात्यानू, तुमच्या धाग्याक शि.सा.न. ====================== कोकणी फणस कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं, कधीकधी वाटतं की काही वाटू नये, नंतर वाटतं की जाऊ देत! वाटण्या ऐवजी सरळ.. मिक्सरमधूनच काढावे!!

लोणच्याशिवाय जेवणाला अर्थय का हो?? तर्‍हेतर्‍हेची लोणची रोज आलटून पालटून खायला मिळाली हे आम्ही आमचे सद्भाग्यच समजतो! जेवायला पानं वाढायला घेतली की आमची नजर आधी पानात डावीकडे काय येतंय यावरच!! आंब्याचं, करवंदांचं, गाजराचं, भाज्यांचं, हळदीचं, लिंबाचं (गोड, तिखट, आंबट सगळ्या भगिनी समाविष्ट), आवळ्याचं ही लोणची प्रिय आहेतच, पण उन्हाळ्यात आजोळी गेल्यावर करमलांचं एक आणि बिंबलांचं एक अशी दोन प्रकारची लोणची असत त्यांची जी खास चव आहे ती काही केल्या जीभेवरला मुक्काम हालवत नाही.. (कोकणातल्या/ गोव्याकडच्या लोकांना माहिती असावी..) बोले तो एकदम झकास!! खास करमलाच्या लोणच्याकरता आणि एक मूद भात घेत असू आम्ही! आणि मिरचीच्या लोणच्याबद्दल काय बोलावं महाराजा!! अहाहा!! जरी बाकीचे पदार्थ तितके तिखट वा झणझणीत खाण्याची सवय या गोड्या कोकणस्थाला नसली तरी फोडणीची/वाळवलेली-तळलेली मिरची पानात पडली की अगदी चवीने, तल्लीन होऊन खाल्ली जाई!! पैजेवर खाल्ल्यायत तळलेल्या मिरच्या!! मग आहे.. चिंपाट घेऊन रन्स काढतोय आपले!! तर अशी ही करमल/ बिंबलाची लोणची आणि फोडणीची/ तळलेली मिरची हे दोन जिन्नस आम्हास प्रिय आहेत.. पण आजीच्या हातचं करमलाच लोणचं जरा खासचं.. म्हणून आम्ही 'इतर' या पर्यायास मत दिले आहे.. बाकी तात्या, धाग्याबद्दल अगदी शिसान!! -- किसोबा गाजर (लोणच्यासाठी, हलव्यासाठी नाही!) भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

इथं लोणची म्हणजे केवळ "जन्माने भारतीय" (म्हंजे "इण्डियन पिकल") अपेक्षित आहेत आणि परदेशी उमेदवारांना तिकिट नाही का हे कृपया स्पष्ट करावे. ते स्पष्टीकरण येईस्तोवर माझे मतः १. ताजं कैरी-कांदा लोणचं २. तेलगु पद्धतीचे कोडी-अवाकया अर्थात "चिकनचे लोणचे" (पाकृ. साठी जागा राखून ठेवत आहे) स्वगतः मुखपृष्ठावर "गाणं" आणि लेखांच्या यादीत "खाणं" घेऊन मालक परत मिपावर लोटलेले दिसतायेत :)

लिंबाच्या लोणच्याला मत दिलेले आहे. लिंबाचे गोडे लोणचे, जे बरणीला दादरा बांधून उन्हात ठेवून मुरवलेले असते, लालभडक दिसते ते!:) लहानपणी मला जेवणाचा भारी कंटाळा येत असे तेंव्हा आज्जी किंवा आई दही दूध भात कालवून त्यावर गोड्या लोणच्याचा थोडा खार घालून देत असत. असा भात मी पटकन फस्त करत असे. माईन मुळ्यांचे लोणचेही आवडते आहे पण कधीकधीच! रेवती

In reply to by रेवती

तेंव्हा आज्जी किंवा आई दही दूध भात कालवून त्यावर गोड्या लोणच्याचा थोडा खार घालून देत असत.
वा! मस्तच! :)

आंब्याच्या [कैरीच्या] लोणच्याला मत टाकलं ! लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं....आवडीने चाखतोच. तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्‍याच्या बारीक चिर्‍या करुन टाकायची. माय गॉड, एकदा का त्या कैर्‍याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे. असो, आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्‍याच्या बारीक चिर्‍या करुन टाकायची. माय गॉड, एकदा का त्या कैर्‍याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे.
क्या केहेने!
आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं
भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर देवाने आम्हाला दिलेल्या या मोलाच्या देणग्या. न मागता दिल्या होता, न विचारता परत नेल्या! :( तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्‍याच्या बारीक चिर्‍या करुन टाकायची. माय गॉड, एकदा का त्या कैर्‍याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे.
क्या केहेने!
आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं
भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर देवाने आम्हाला दिलेल्या या मोलाच्या देणग्या. न मागता दिल्या होता, न विचारता परत नेल्या! :( तात्या.

प्रविणचे लोणचे ! उपलब्ध नसल्यास चिल्लाळ चे ! बाकी ह्या धाग्यात काही विषेश असं नाही :) पण मालकांनी काढलाय म्हंटल्यावर कौतुक करायलाच हवे :) काय कवट्या बरोबर का ? :) - टारझन "मिठाच्या णिवडणुका " लिहीण्याच्या विचारात :)

अगदी रोजचे लागणारे आंब्याचे (कैरीचे) लोणचे. ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

टोम्याटोचं- हे खरच असतं- खानदेशात करतात.

आंब्याच आणि लिंबाच लोणच आवडत, एकच मत द्यायच आहे म्हणुन आंब्याला मत दिल आहे. --टुकुल

आंब्याचे लोणचे. पण आजारी पडले की आंबट-गोड लिंबाचे लोणचे. माझी आई या लिंबाच्या लोणच्याची एक बरणी वेगळी ठेवायची. बर्‍याच सासुरवाशीणी मागल्यादाराने पदराखाली झाकून हे लोणचं घेऊन जायच्या. ;)

उन्हात मुरवलेले लिंबाचे लाडभडक लोणचे आवडते सर्रर्रर्र... आख्ख्या बाळकैर्‍यांचे लिंबू-मिरची आवळ्याचे माईनमुळाचे फ्लावरचे .. . (लोणच्यातला)चतुरंग

शाळेत असताना कैरीच्या हंगामात वर्गात चोरुन कैर्‍या कापुन, मग मधल्या सुट्टीत टेबल वर पेपर टाकुन त्या कैर्‍या गोळा करुन त्यांना मीठ, मसाला, साखर लावुन बनवलेले लोणचे सर्वात आवडीचे.. हा एक मोठा सोहळाच असायचा, प्रत्येकीला कैरी व इतर जिन्नस आणण्याचे काम विभागुन दिले जायचे. यात अनेक धोके असायचे. आईच्या नकळत मसाला बांधुन आणणे.. वर्ग सुरु असताना कैर्‍या कापणे.. पकडले गेलो तरी इतरांची नावं न सांगणे.. मुलांना सामिल न करुन घेतल्याने ते फितुर झालेले.. म्हणजे चहुबाजुनी गनिम सावरत यशस्वी पणे दर मोसमान हा उपक्रम व्हायचा.. लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..

In reply to by मितालि

>> मुलांना सामिल न करुन घेतल्याने ते फितुर झालेले>> =)) मस्त मजा आली मिताली ..... ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

आमच्या हैदराबाद च्या एका मित्राने चिकनचे लोणचे खाऊ घातले होते.. वाः अजूनही जीभेवार ती चव आहे (सामिष आहारी ) चंडोल

In reply to by चंडोल

कोलंबीप्रमाणेच चिकनचे, सुक्या जवळ्याचेही लोणचे मी खाल्ले आहे.. मस्त लागते..! :) आपला, (चित्पावन) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सोलापूर भागात मिळणारे सावजीचे मटणाचे (ओले) लोणचे.... थंडगार बीअर सोबत ..... अहाहा... कवटी

मिपापासून स्फूर्ती घेऊन या प्रकारच्या निवडणुका इतरही काही संस्थळांवर सुरू झाल्याचे पाहून आनंद वाटला. चांगल्या गोष्टींची, चांगल्या विचारांची, चांगल्या कल्पनांची कॉपी करण्यात गैर काहीच नाही, उलटपक्षी ती आनंदाचीच बाब आहे! :) आपला (कल्पक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इमिटेशन इज बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी. :) ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by विसोबा खेचर

मिपापासून स्फूर्ती घेऊन या प्रकारच्या निवडणुका इतरही काही संस्थळांवर सुरू झाल्याचे पाहून आनंद वाटला.
मला वाटलं आय.डी. उडण्याच्या भितीने तो धागा तिकडे काढल्या गेला असावा :) आमचा ही धागा काढायचा विचार होता , इकडेच ... सेम कारणामुळे टाळला हॅहॅहॅ...
चांगल्या गोष्टींची, चांगल्या विचारांची, चांगल्या कल्पनांची कॉपी करण्यात गैर काहीच नाही, उलटपक्षी ती आनंदाचीच बाब आहे!
आनंदाच्या बाबीत आपण सर्वांनीच "आनंद मानला" ही तर त्याहुन आनंदाची बाब आहे ;) -(बॉर्न अँड बॉट अप मिपाकर) टारझन

नुसती फोड जिभेवर ठेवली तरी तोडांत झरे फुटतात.. :)

माझ्यामते लोणच्याचा शोधच मुळी आमच्या आंब्यामुळे लागला असावा. वेताळ

In reply to by वेताळ

आमच्या "निम्बूड्या"वरही गाणी निघालीयेत म्हटल. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

माझेही आवडते लिंबाचे आंबट गोड तिखट लोणचे.

तात्या, मला सर्व प्रकारची लोणची आवडतात. मग एकाला कसे काय मत द्यायचे? तरी पण मी आंब्याच्या लोणच्याला मत दिले आहे. आंब्याचे पण मला थोडे गुळ घातलेले लोणचे आवडते. (तिखट-गोड). माझी आजी भरलेल्या मिरच्यांचे काय लोणचे करायची. अहाहा. आणि फेसुन मोहोरीचे लोणचे, भोकराचे देखिल आवडते. इयत्ता १ली ते ५वी माझ्या डब्यात कायम लोणचं-तुप पोळीचा रोल असायचा. मी फिशचे लोणचे देखिल खाल्ले आहे. मस्त लागते. हे मटणाचे लोणचे कुठे मिळते, कधीच खाल्ले अथवा ऐकले देखिल नव्हते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

माईनमुळ्याच्या लोणच्यावरून एक किस्सा आठवला. शाळेत असताना एका ओळखीच्या आज्जींकडे जेवायला बोलावले होते. इतर पदार्थांसोबत हे माईनमुळ्याचे लोणचे पण वाढले होते. आयुश्यात पहिल्यांदा (आणि शेवटचे) ते लोणचे खाल्ले. त्याच्या त्या उग्र चविने डोक्यात शिट्ट्याच वाजल्या. आवडले नसल्याने ते पटकन संपवून बाकीचे पदार्थ हाणायला सुरवात केली तर आजीबाई ,"आरे लोणचे आवडलेले दिसतय हे घे आजुन" असे म्हणून नको म्हणायच्या आत वाढून रिकाम्या. परत ते पटकन संपवून दुसर्‍या पदार्थाकडे वळतोय तर परत आ़जी लोणचे वाढायला आल्या. नको नको म्हणालो तर "का? आवडल नाही का?" अता नाही आवडले असे सांगायचे डेरिंग पण नव्हते. आम्ही आपले भिडस्तपणे "हो आवडले" म्हणाल्यावर "मग घे की आजुन ... लाजतोय्स कशाला?" असे म्हणून डबल वाढून गेल्या. असे ४-५ हप्ते ते लोणचे खाल्ल्यावर शहाणे होउन आम्ही ते लोणचे शेवटच्या घासा पर्यंत ताटात ठेवले. ("वाढू का? वाढू का?" ला "नको . आजुन आहे ताटात" असे टोलवत... ;) ) काय सांगू दादानु अगदी २ वाट्या शेवयांची खीर हाणल्यावर शेवटचा घास माईनमुळ्याचा खाल्ला. पण तेवढ्यावर थांबतील तर त्या अज्जी कसल्या.... मला ते लोणचे लै आवडलय असा ग्रह करून घेउन त्यानी चांगले बचकभर लोणचे मला बांधून घरी घेउन जायला दिले. त्या नंतर आजतागायत माईनमुळ्याच्या लोणच्याला परत तोंड लावायची माझी हिम्मत झाली नाही. कवटी

In reply to by कवटी

कवटीबुवा, मस्त किस्सा! डोक्यात शिट्ट्या वाजणे ह वाक्प्रचारही मस्त आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कवटीत शिट्ट्या वाजणे!!! हा वाक्प्रचार जास्त छान वाटेल ;) ----- सौरभ :)

चवदार धागा.... ;) लाळ लाळ लाळ लाळ... =P~ सध्या आईच्या हातच मेथी प्लस मसाला युक्त अंब्याच लोणच मटकवतोय... (आवडीने लोणच चाखणारा) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

आंबा, लिम्बु, माइनमुळ्याच लोणच आवडतच पण पयला नंबर गुजराती पद्धतीने केलेल्या (ही माहिती ऐकीव आमच काम फक्त खाण्याच) आंबट्गोड बडीशेप घातलेल्या मस्त मुरलेल्या आंब्याच्या लोणच्याला. :)