लिंबाचे लोणचे लहानपणा पासून खूप आवडीचे. ....... गोड, तिखट, आंबट ..... आहाहा......
.
.
लहानपणी आईच्या नकळत बोकाणे भरत असू .... दुसर्या दिवशी .....चंबटीचंबटी ची चगागा
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
अय्या फणसाचं लोणचं असतं? - कापा की बरका? :O
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
आंबा
आंबा
आंबा
आंबा
सहस्त्रवेळा.. आंबा!
जल्ला आमाला आंबा सोडून काय बी दिसत नाय बगा!!
तात्यानू, तुमच्या धाग्याक शि.सा.न.
======================
कोकणी फणस
कधीकधी वाटतं की काहीतरी वाटावं,
कधीकधी वाटतं की काही वाटू नये,
नंतर वाटतं की जाऊ देत!
वाटण्या ऐवजी सरळ..
मिक्सरमधूनच काढावे!!
लोणच्याशिवाय जेवणाला अर्थय का हो?? तर्हेतर्हेची लोणची रोज आलटून पालटून खायला मिळाली हे आम्ही आमचे सद्भाग्यच समजतो! जेवायला पानं वाढायला घेतली की आमची नजर आधी पानात डावीकडे काय येतंय यावरच!!
आंब्याचं, करवंदांचं, गाजराचं, भाज्यांचं, हळदीचं, लिंबाचं (गोड, तिखट, आंबट सगळ्या भगिनी समाविष्ट), आवळ्याचं ही लोणची प्रिय आहेतच, पण उन्हाळ्यात आजोळी गेल्यावर करमलांचं एक आणि बिंबलांचं एक अशी दोन प्रकारची लोणची असत त्यांची जी खास चव आहे ती काही केल्या जीभेवरला मुक्काम हालवत नाही.. (कोकणातल्या/ गोव्याकडच्या लोकांना माहिती असावी..) बोले तो एकदम झकास!! खास करमलाच्या लोणच्याकरता आणि एक मूद भात घेत असू आम्ही!
आणि मिरचीच्या लोणच्याबद्दल काय बोलावं महाराजा!! अहाहा!! जरी बाकीचे पदार्थ तितके तिखट वा झणझणीत खाण्याची सवय या गोड्या कोकणस्थाला नसली तरी फोडणीची/वाळवलेली-तळलेली मिरची पानात पडली की अगदी चवीने, तल्लीन होऊन खाल्ली जाई!! पैजेवर खाल्ल्यायत तळलेल्या मिरच्या!! मग आहे.. चिंपाट घेऊन रन्स काढतोय आपले!!
तर अशी ही करमल/ बिंबलाची लोणची आणि फोडणीची/ तळलेली मिरची हे दोन जिन्नस आम्हास प्रिय आहेत.. पण आजीच्या हातचं करमलाच लोणचं जरा खासचं.. म्हणून आम्ही 'इतर' या पर्यायास मत दिले आहे..
बाकी तात्या, धाग्याबद्दल अगदी शिसान!!
--
किसोबा गाजर (लोणच्यासाठी, हलव्यासाठी नाही!)
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
इथं लोणची म्हणजे केवळ "जन्माने भारतीय" (म्हंजे "इण्डियन पिकल") अपेक्षित आहेत आणि परदेशी उमेदवारांना तिकिट नाही का हे कृपया स्पष्ट करावे.
ते स्पष्टीकरण येईस्तोवर माझे मतः
१. ताजं कैरी-कांदा लोणचं
२. तेलगु पद्धतीचे कोडी-अवाकया अर्थात "चिकनचे लोणचे" (पाकृ. साठी जागा राखून ठेवत आहे)
स्वगतः मुखपृष्ठावर "गाणं" आणि लेखांच्या यादीत "खाणं" घेऊन मालक परत मिपावर लोटलेले दिसतायेत :)
लिंबाच्या लोणच्याला मत दिलेले आहे.
लिंबाचे गोडे लोणचे, जे बरणीला दादरा बांधून उन्हात ठेवून मुरवलेले असते, लालभडक दिसते ते!:)
लहानपणी मला जेवणाचा भारी कंटाळा येत असे तेंव्हा आज्जी किंवा आई दही दूध भात कालवून त्यावर गोड्या लोणच्याचा थोडा खार घालून देत असत. असा भात मी पटकन फस्त करत असे. माईन मुळ्यांचे लोणचेही आवडते आहे पण कधीकधीच!
रेवती
आंब्याच्या [कैरीच्या] लोणच्याला मत टाकलं !
लिंबाचं आणि मिरचीचं लोणचं....आवडीने चाखतोच.
तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात
मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्याच्या बारीक चिर्या करुन टाकायची.
माय गॉड, एकदा का त्या कैर्याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे. असो,
आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं :(
-दिलीप बिरुटे
तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात
मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्याच्या बारीक चिर्या करुन टाकायची.
माय गॉड, एकदा का त्या कैर्याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे.
क्या केहेने!
आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं
भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर देवाने आम्हाला दिलेल्या या मोलाच्या देणग्या. न मागता दिल्या होता, न विचारता परत नेल्या! :(
तात्या.
तात्या, माझी आज्जी [आईची आई] मोठ्या खापरी माठात
मीठ,मोहरी,हळद,लसणाच्या पाकळ्या, अगदी थोडंस तेल टाकून कैर्याच्या बारीक चिर्या करुन टाकायची.
माय गॉड, एकदा का त्या कैर्याच्या फोडी चांगल्या रापल्या आणि जितक्या उशिरा लोणंचं खावू तितकं ते चवदार लागायचे.
क्या केहेने!
आता काय, आज्जीही गेली आन् आज्जीच्या हातचं चवदार लोणचंही गेलं
भाईकाकांच्या भाषेत सांगायचं तर देवाने आम्हाला दिलेल्या या मोलाच्या देणग्या. न मागता दिल्या होता, न विचारता परत नेल्या! :(
तात्या.
प्रविणचे लोणचे ! उपलब्ध नसल्यास चिल्लाळ चे !
बाकी ह्या धाग्यात काही विषेश असं नाही :) पण मालकांनी काढलाय म्हंटल्यावर कौतुक करायलाच हवे :) काय कवट्या बरोबर का ? :)
- टारझन
"मिठाच्या णिवडणुका " लिहीण्याच्या विचारात :)
आंब्याचे लोणचे. पण आजारी पडले की आंबट-गोड लिंबाचे लोणचे. माझी आई या लिंबाच्या लोणच्याची एक बरणी वेगळी ठेवायची. बर्याच सासुरवाशीणी मागल्यादाराने पदराखाली झाकून हे लोणचं घेऊन जायच्या. ;)
शाळेत असताना कैरीच्या हंगामात वर्गात चोरुन कैर्या कापुन, मग मधल्या सुट्टीत टेबल वर पेपर टाकुन त्या कैर्या गोळा करुन त्यांना मीठ, मसाला, साखर लावुन बनवलेले लोणचे सर्वात आवडीचे.. हा एक मोठा सोहळाच असायचा, प्रत्येकीला कैरी व इतर जिन्नस आणण्याचे काम विभागुन दिले जायचे. यात अनेक धोके असायचे. आईच्या नकळत मसाला बांधुन आणणे.. वर्ग सुरु असताना कैर्या कापणे.. पकडले गेलो तरी इतरांची नावं न सांगणे.. मुलांना सामिल न करुन घेतल्याने ते फितुर झालेले.. म्हणजे चहुबाजुनी गनिम सावरत यशस्वी पणे दर मोसमान हा उपक्रम व्हायचा.. लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..
>> मुलांना सामिल न करुन घेतल्याने ते फितुर झालेले>> =))
मस्त मजा आली मिताली .....
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
मिपापासून स्फूर्ती घेऊन या प्रकारच्या निवडणुका इतरही काही संस्थळांवर सुरू झाल्याचे पाहून आनंद वाटला. चांगल्या गोष्टींची, चांगल्या विचारांची, चांगल्या कल्पनांची कॉपी करण्यात गैर काहीच नाही, उलटपक्षी ती आनंदाचीच बाब आहे! :)
आपला
(कल्पक) तात्या.
इमिटेशन इज बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
आमच्या "निम्बूड्या"वरही गाणी निघालीयेत म्हटल.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
तात्या,
मला सर्व प्रकारची लोणची आवडतात. मग एकाला कसे काय मत द्यायचे? तरी पण मी आंब्याच्या लोणच्याला मत दिले आहे.
आंब्याचे पण मला थोडे गुळ घातलेले लोणचे आवडते. (तिखट-गोड).
माझी आजी भरलेल्या मिरच्यांचे काय लोणचे करायची. अहाहा.
आणि फेसुन मोहोरीचे लोणचे, भोकराचे देखिल आवडते.
इयत्ता १ली ते ५वी माझ्या डब्यात कायम लोणचं-तुप पोळीचा रोल असायचा.
मी फिशचे लोणचे देखिल खाल्ले आहे. मस्त लागते.
हे मटणाचे लोणचे कुठे मिळते, कधीच खाल्ले अथवा ऐकले देखिल नव्हते.
माईनमुळ्याच्या लोणच्यावरून एक किस्सा आठवला.
शाळेत असताना एका ओळखीच्या आज्जींकडे जेवायला बोलावले होते. इतर पदार्थांसोबत हे माईनमुळ्याचे लोणचे पण वाढले होते. आयुश्यात पहिल्यांदा (आणि शेवटचे) ते लोणचे खाल्ले. त्याच्या त्या उग्र चविने डोक्यात शिट्ट्याच वाजल्या. आवडले नसल्याने ते पटकन संपवून बाकीचे पदार्थ हाणायला सुरवात केली तर आजीबाई ,"आरे लोणचे आवडलेले दिसतय हे घे आजुन" असे म्हणून नको म्हणायच्या आत वाढून रिकाम्या. परत ते पटकन संपवून दुसर्या पदार्थाकडे वळतोय तर परत आ़जी लोणचे वाढायला आल्या. नको नको म्हणालो तर "का? आवडल नाही का?" अता नाही आवडले असे सांगायचे डेरिंग पण नव्हते. आम्ही आपले भिडस्तपणे "हो आवडले" म्हणाल्यावर "मग घे की आजुन ... लाजतोय्स कशाला?" असे म्हणून डबल वाढून गेल्या.
असे ४-५ हप्ते ते लोणचे खाल्ल्यावर शहाणे होउन आम्ही ते लोणचे शेवटच्या घासा पर्यंत ताटात ठेवले. ("वाढू का? वाढू का?" ला "नको . आजुन आहे ताटात" असे टोलवत... ;) )
काय सांगू दादानु अगदी २ वाट्या शेवयांची खीर हाणल्यावर शेवटचा घास माईनमुळ्याचा खाल्ला.
पण तेवढ्यावर थांबतील तर त्या अज्जी कसल्या.... मला ते लोणचे लै आवडलय असा ग्रह करून घेउन त्यानी चांगले बचकभर लोणचे मला बांधून घरी घेउन जायला दिले.
त्या नंतर आजतागायत माईनमुळ्याच्या लोणच्याला परत तोंड लावायची माझी हिम्मत झाली नाही.
कवटी
आंबा, लिम्बु, माइनमुळ्याच लोणच आवडतच पण पयला नंबर गुजराती पद्धतीने केलेल्या (ही माहिती ऐकीव आमच काम फक्त खाण्याच) आंबट्गोड बडीशेप घातलेल्या मस्त मुरलेल्या आंब्याच्या लोणच्याला.
:)
प्रतिक्रिया
लिम्बू
व्वा !
In reply to लिम्बू by शुचि
मत
इतर
अय्या
In reply to इतर by जयवी
ओल्या
(खल्लास!!!
In reply to ओल्या by कवटी
आंबा
इतर
माईनमोळ्य
इथं लोणची
लिंबाच्या
तेंव्हा
In reply to लिंबाच्या by रेवती
आंब्याच्य
तात्या,
In reply to आंब्याच्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
In reply to आंब्याच्य by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रविणचे
कैरी
टोम्याटोच
आंब्याच
कोलंबीचे लोणचे
आहेस रे
In reply to कोलंबीचे लोणचे by संदीप चित्रे
आंब्याचे
एकाच लोणच्याला मत द्यायचं म्हणजे अन्याव आहे राव!
शाळेत
हाहा
In reply to शाळेत by मितालि
चिकन्चे...
कोलंबीप्र
In reply to चिकन्चे... by चंडोल
मटणाचे.
In reply to कोलंबीप्र by विसोबा खेचर
मिपापासून
इमिटेशन
In reply to मिपापासून by विसोबा खेचर
मिपापासून
In reply to मिपापासून by विसोबा खेचर
कैरीचे....
आंबा
आमच्या
In reply to आंबा by वेताळ
माझेही
सर्वच लोणची आवडतात.
माईनमुळाच
माईनमुळा
In reply to माईनमुळाच by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to माईनमुळा by कवटी
कवटीबुवा, म
In reply to माईनमुळा by कवटी
एक विचार....
In reply to कवटीबुवा, म by विसोबा खेचर
चवदार
आंबोशीचे लोणचे...
आंबा,