Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by कोलबेर on गुरुवार, 04/03/2008 - 10:00
  • Log in or register to post comments
  • 17193 views

प्रतिक्रिया

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 04/03/2008 - 10:09

Permalink

अप्रतिम चित्रे आहेत.

मस्त आली आहेत फुलांची चित्रे. मला अशी फुलांची चित्रे काढता आली असती तर फार बरे झाले असते. म्हणजे फुले आणि फुलपाखरे यांची चित्रे उत्तम काढली असती. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 04/03/2008 - 10:10

Permalink

सुंदर..

शिंच्या कोलबेरा, चित्रं सुंदर आहेत रे! नाही नाही कोणत्याही गाण्याचे रसग्रहण नाही हे! तेवढी (चौफेर) प्रतिभा आमच्या असती तर आम्ही 'विसोबा खेचर' नावाने नसते का लिहिले? :) हा हा हा! करतोच थांब आता जाईन विचारीत चं रसग्रहण! :) आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :) ओक्के! मला काही वाळत घातलेल्या राजापुरी पंच्यांची आणि कळकट नी भोकं पडलेल्या गंजीफ्रॉकांची चित्रं हवी होती! आमची ऑर्डर लिहून ठेवा शेठ, पैशे नंतर पाठवतो! :) असो, मला शेवटचं चित्रं सर्वात जास्त आवडलं रे कोलबेरा! आपला, (रानफुलांचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 04/03/2008 - 11:04

Permalink

वाह! क्या

वाह! क्या केहने!!!! कोलबेरशेठ, मस्त. ते दुसर्‍या क्रमा॑काचा फोटो असलेल॑ कोणत॑ फूल आहे हो? एकदम चिकण॑ आहे! माझ्या आवडत्या र॑गाच॑!!!!! आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :) फुटलो रे...फुटलो रे मी !!!! ज ह ब ह र्‍ह्या - ध मा ल.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on गुरुवार, 04/03/2008 - 11:04

Permalink

वा फारच नयनमनोहर!

सगळीच चित्रे अप्रतीम आहेत. शेवटल्या चित्रातला वसंतागमनाने आलेला मोहोर तर इतका आसुसलेला आलाय की काय बिशाद आहे फुलपाखरु सोंड वाकडी करुन मध प्यायला अलगदणार नाही! अभिनंदन वरुणा! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on गुरुवार, 04/03/2008 - 11:18

Permalink

सुरेख चित्रे,,,,

फुलांची चित्रे सुरेखच... त्यांची नावे कळतील का? -- ध्रुव
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on गुरुवार, 04/03/2008 - 11:46

Permalink

महाकवियत्री

इंदिरा संत म्हणतात... गवतफुला रे गवतफुला, कसा लागला तुझा लळा... चित्रे पाहून डोळ्याचे पारणे फिटले. पण तुम्ही वरूण वैद्यांची चित्रे ढापायचे कारणच काय? > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 04/03/2008 - 12:45

In reply to महाकवियत्री by सृष्टीलावण्या

Permalink

कोलबेर =

कोलबेर = वरुण वैद्य असे असू शकते नं? :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on गुरुवार, 04/03/2008 - 12:59

In reply to कोलबेर = by विसुनाना

Permalink

अरेच्या

मला तर बुवा कोलबेर = काळंबेरं वाटले... असले दुष्ट विचार पैदा करणार्‍या ह्या मनावर काहीतरी इलाज केला पाहिजे. > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on गुरुवार, 04/03/2008 - 21:53

In reply to महाकवियत्री by सृष्टीलावण्या

Permalink

ह ह पु वा

पण तुम्ही वरूण वैद्यांची चित्रे ढापायचे कारणच काय? हा हा हा !!!! तुम्ही "विसोबा खेचरांविरुद्ध" जनरल डायरकडे तक्रार केली होती, असे ऐकिवात आहे. पण हे तर खूपच मस्त !! - सर्किट
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Fri, 04/04/2008 - 07:05

In reply to ह ह पु वा by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

अवांतर, अवांतर, अवांतर

तुम्ही "विसोबा खेचरांविरुद्ध" जनरल डायरकडे तक्रार केली होती, असे ऐकिवात आहे. त्याचं काय आहे माझा स्वभाव मुळातच तोंडात खडिसाखर आणि डोक्यावर बर्फाची लादी असा आहे. कोणी सारखं सारखं चिडून आणि चिडवून दाखवलं तरी आपण काय आपला शांत स्वभाव मुळीच सोडत नाही. पण हा जमाना भेसळीचा आहे. कधीतरी खडिसाखरेत पादेलोण निघते आणि बर्फाची लादी लौकर विरघळते. त्यामुळे होतात असे प्रमाद आपल्या हातून. चालायचंच. त्यात माझा काही दोष नाही. > > आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, हरिश्चंद्र ताराराणी डोम्बाघरी भरती पाणी...
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 04/04/2008 - 07:13

In reply to अवांतर, अवांतर, अवांतर by सृष्टीलावण्या

Permalink

पादलोण

कधीतरी खडिसाखरेत पादेलोण निघते विसोबा हे खडीसाखर, आणि जनरल डायर हे पादलोण, असे तर म्हणायचे नाही ना तुम्हाला सॢलाताई ? - (बर्र्फाची लादी) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 04/03/2008 - 11:48

Permalink

मस्त चित्रे

फारच आवडली प्रकाशचित्रे! (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on गुरुवार, 04/03/2008 - 12:04

Permalink

सुंदर चित्रे..

फार सुंदर चित्रे आहेत,ही पाहून आजच्या दिवसाची सुरुवात अगदी छान टवटवीत झाली.:-) आणि अगदी सुयोग्य, समर्पक शीर्षक! मस्त.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by विसुनाना on गुरुवार, 04/03/2008 - 12:47

Permalink

सुंदर

वा! काय सुंदर प्रकाशचित्रे आहेत! मनाला प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/03/2008 - 14:28

Permalink

अप्रतिम....

अतिशय सुंदर फोटो आहेत हे रानफुलांचे. अभिनंदन. मला अजून आश्चर्य वाटतं की तुम्ही फोटोग्राफर लोकं फोटोंची टेक्निकल डिटेल्स लपवून का ठेवता? सुंदर फोटोंबद्दन नुसतेच कौतुक मिळविण्यापेक्षा थोडे 'ज्ञानदाना'चे पुण्यही पदरी पडू शकेल. कुठली लेन्स, किती ऍपरचर, किती स्पीड इत्यादी माहिती दिलीत तर जास्त चांगले होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on गुरुवार, 04/03/2008 - 14:37

Permalink

मस्त रे

पण इतकी मोजकीच का? ही बघ मला दिसलेली रानफुले!! Image removed. फरगेट-मी-नॉट असे म्हणे ह्या फुलाचे नाव. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on गुरुवार, 04/03/2008 - 14:54

In reply to मस्त रे by सहज

Permalink

हाण, हाण तिच्यायला ...

बघितलं ह्याला म्हणतात प्रतिसाद [ वि.सू . = यात कोणाला चिमटा काढायचा हेतू नाही.] मस्त . सहज आणि कोलबेर, दोघांनी दिल खूष कर दिया ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 04/03/2008 - 23:28

In reply to हाण, हाण तिच्यायला ... by छोटा डॉन

Permalink

+१ !

सहज पंत ! तुमची ही बाजू सुद्धा आवडली ! सुरेख चित्रे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on गुरुवार, 04/03/2008 - 14:54

Permalink

झकास!!!!!!!!!

वरूणशेठ आणि सहजशेठ आपल्या दोघांची छाया-चित्रणकला आवडली. झकास !!!!!! मला अजून आश्चर्य वाटतं की तुम्ही फोटोग्राफर लोकं फोटोंची टेक्निकल डिटेल्स लपवून का ठेवता? सुंदर फोटोंबद्दन नुसतेच कौतुक मिळविण्यापेक्षा थोडे 'ज्ञानदाना'चे पुण्यही पदरी पडू शकेल. कुठली लेन्स, किती ऍपरचर, किती स्पीड इत्यादी माहिती दिलीत तर जास्त चांगले होईल. ह्या बाबतीत पेठकर साहेबांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 04/03/2008 - 17:58

Permalink

सुंदर चित्रे!

कोलबेर आणि सहज, दोघांनीही लावलेली चित्रे मस्तच आहेत. कोलबेरशेठ, आता "फक्त गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यांची चित्रे "दाखवण्याबाबतच्या तुमच्यावरील आरोपातून तुमची मुक्तता!!!:)) बाकी #१ चित्रातलं फूल माझं #१ दुश्मन आहे. ते डॅन्डेलियन आहे ना! ते एकदा बॅकयार्डमध्ये आलं की काही दिवसांत सगळ्या लॉनची वाट लावतं!!! दिसायला गोंडस दिसतं म्हणून जाऊ नका...
  • Log in or register to post comments

Submitted by मनस्वी on गुरुवार, 04/03/2008 - 18:04

Permalink

खूपच छान

रानफुले खरंच किती आकर्षक असतात. निसर्गाशी जास्त जवळची वाटतात. बघून डोळे मस्त गार होतात. कोलबेर आणि सहज - सहीच आहेत फोटो. आणखीन असतील तर टाका.
  • Log in or register to post comments

Submitted by व्यंकट on गुरुवार, 04/03/2008 - 18:38

Permalink

शेवटच

मस्त आहे. व्यंकट
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on गुरुवार, 04/03/2008 - 20:08

Permalink

धन्यवाद मंडळी!!

पेठकर काका आणि प्रमोदकाका, हि घ्या ह्या चित्रांची रेसेपी ; चित्र १ लेन्स - कॅनन १८-५५ @ ५५ मी.मी. ऍपर्चर : ५.६ शटर स्पीड : १/१२५ चित्र २ लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ २६० मी.मी. ऍपर्चर : ५.६ शटर स्पीड : १/१०० चित्र ३ लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ ३०० मी.मी. ऍपर्चर : ५.६ शटर स्पीड : १/८०० चित्र ४ लेन्स - टॅमरॉन ७५-३०० टेलेफोटो @ ३०० मी.मी. ऍपर्चर : ५.६ शटर स्पीड : १/३०० सर्व चित्रांसाठी आय एस ओ = २०० आणि अल्ट्रा व्हायोलेट फिल्टर. अधिक टिपा : शक्यतो पावसाची एखादी सर येउन गेलेली असताना आणि थोडेसे ढगाळ वातावरण असताना फुलांची चित्रे काढावीत. फुले टवटवीत दिसतात आणि रंग खुलुन येतात. थेट सुर्यप्रकाश (डायरेक्ट सनलाईट) एखाद्या पातळश्या (फार गडद नको) ढगाआडून फुलावर पडत असेल तर आपोआप नैसर्गिक डिफ्युज्ड लाईट तयार होतो जो अश्या चित्रांसठी सर्वोत्तम. प्रोत्सहना बद्दल सर्वांचे आभार! -(वरूण वैद्य) कोलबेर ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on गुरुवार, 04/03/2008 - 23:06

In reply to धन्यवाद मंडळी!! by कोलबेर

Permalink

धन्यवाद....

धन्यवाद श्री. कोलबेर...... चित्र क्रमांक ३ साठी एवढा हाय शटर स्पीड काय उद्देशाने? आय्. एस्. ओ. १०० ठेवून किंवा एपरचर थोडे बंद करून चालले नसते का? जसे, ८ किंवा ११?
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Fri, 04/04/2008 - 00:26

In reply to धन्यवाद.... by प्रभाकर पेठकर

Permalink

खरं आहे

खरं आहे तुमचं म्हणणं.. पण मला ट्रायपॉड उपलब्ध नसल्याने जितका वेगवान शटर स्पीड शक्य असेल तेवढा हवाच होता. आय. एस. ओ. मी सहसा २०० वरच ठेवतो (इनडोअर प्रकाशचित्रां व्यतीरिक्त) लख्ख प्रकाशात १०० ठेवायला काही हरकत नाही पण कधी कधी ते विसरले जाते आणि प्रकाश जरासा कमी असेल तर चित्रावर नॉइज येऊ शकतो .. म्हणून (माझ्या विसरभोळे पणा मुळे) मी शक्यतो तो २०० वर सेट करुन ठेवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Fri, 04/04/2008 - 13:47

In reply to खरं आहे by कोलबेर

Permalink

धन्यवाद....

धन्यवाद श्री. कोलबेर. आपल्या छायाचित्रणातील पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा....! आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्हाला नक्कीच उपयोग करून घेता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Sat, 04/05/2008 - 01:48

In reply to धन्यवाद.... by प्रभाकर पेठकर

Permalink

+१

आपण दिलेल्या ज्ञानाचा आम्हाला नक्कीच उपयोग करून घेता येईल. असेच.. फोटो आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/04/2008 - 00:35

In reply to धन्यवाद मंडळी!! by कोलबेर

Permalink

:)

अरे प्रमोदकाकांना आणि पेठकरकाकांना उत्तर दिलेस, परंतु मला हव्या असलेल्या राजापुरी पंच्याचं आणि कळकट व भोकं पडलेल्या वाळत घातलेल्या गंजिफ्रॉकच्या ऑर्डरचं काय झालं? अशी काही चित्रं मिळतील का? :) घाबरू नकोस, ती चित्रं पाहून मी काही लगेच कुठलं ऍब्स्ट्रॅक रागचित्र रंगवणार नाहीये! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Fri, 04/04/2008 - 00:47

In reply to :) by विसोबा खेचर

Permalink

तात्या, ऑर्

तात्या, ऑर्डर नोंदवुन घेतलीय.. पुढच्या भारत भेटीत नक्की काढतो :) आणि पैशाचं नंतर बघू वगैरे चालणार नाय बरंका.. समर्थ भोजनालयात मस्त पार्टी द्यावी लागेल! :))
  • Log in or register to post comments

Submitted by ध्रुव on Fri, 04/04/2008 - 10:32

In reply to धन्यवाद मंडळी!! by कोलबेर

Permalink

exif माहिती देता येइल का?

तुम्ही मन्युअल सेटींग वापरता की ऍपर्चर/शटर सेटींग? exif माहिती मिळेल का? -- ध्रुव
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 04/03/2008 - 23:21

Permalink

सुंदर चित्रे !

डोळे निवले , कोल्बेर्राव ! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 04/04/2008 - 00:38

Permalink

शब्दच नाहीत..

कोलबेरपंत आणि सहजराव, आपण इतकी सुंदर चित्रे टिपली आहेत.. काय सांगू? कोलबेर पंत, मी आपल्या या चित्रांमधील १-२ चित्रे माझ्या कडे कॉपी करून घेतली तर चालतील का? आपली काही हरकत नाही ना? - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/04/2008 - 00:43

In reply to शब्दच नाहीत.. by प्राजु

Permalink

:)

मी आपल्या या चित्रांमधील १-२ चित्रे माझ्या कडे कॉपी करून घेतली तर चालतील का? आपली काही हरकत नाही ना? अगं पण त्याला कुठे काय कळणार आहे? हळूच राईट क्लिक करून सेव्ह करून टाक! हां, आता सेव्ह करताना कुठलाही मोठा आवाज वगैरे होणार नाही याची काळजी घे. नायतर वरूणला ऐकू जायचं! :)
  • Log in or register to post comments

Submitted by कोलबेर on Fri, 04/04/2008 - 00:44

In reply to शब्दच नाहीत.. by प्राजु

Permalink

धन्यवाद

धन्यवाद प्राजुताई! अहो १-२ काय सगळी घेतलीत कॉपी करुन तरी माझी काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Fri, 04/04/2008 - 02:22

Permalink

सुंदर चित्रे

सुंदर चित्रे. (अवांतर : फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच. म्हणजे फर्माइशी वाळत घातलेल्या लंगोट्याच!)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/04/2008 - 08:27

In reply to सुंदर चित्रे by धनंजय

Permalink

हा हा हा! :)

अवांतर : फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच. म्हणजे फर्माइशी वाळत घातलेल्या लंगोट्याच!) माझ्या मते हे या शतकातलं सर्वात जबरदस्त वाक्य ठरावं! :)) धन्याशेठ, तुझ्यापुढे साष्टांग नमस्कार रे बाबा!!! आपला, (लंगोटी लावून ठाण्याच्या खाडीत मच्छी पकडणारा!) तात्या कोळी.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Fri, 04/04/2008 - 02:45

Permalink

अप्रतिम

सुरेख फोटोज.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Fri, 04/04/2008 - 05:13

Permalink

श्रुंगाराच्या गुलाबी छटेत

फोटो मस्त आहेत.जिवंतच वाटतात. जरा शोधा.मनस्वीच फुलपाखरू इथेच कुठतरी सापडेल. फुले म्हणजे अंगावरील रंगीबेरंगी अंतर्वस्त्रे हळूहळू काढणारे स्त्रीकेसर आणि पुंकेसरच. सुंदर उपमा.दोघेही मिलनोत्सुक! श्रुंगाराच्या गुलाबी छटेत आकंठ बुडालेले.तरीही संयमीत!
  • Log in or register to post comments

Submitted by सर्किट (verified= न पडताळणी केलेला) on Fri, 04/04/2008 - 08:30

In reply to श्रुंगाराच्या गुलाबी छटेत by मीनल

Permalink

बरे कळले..

तुला बरे कळले... चीन मध्ये अशा फुलपाखरांचे सगळे केसर काढून टाकतात ना ? उगाच हम दो फुलपाखरू, हमारा एक. ह्याल बाधा यायला नको ना ? - (मनस्वी फुलपाखरू) सर्किट
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/04/2008 - 11:25

Permalink

छान

पहिले चित्र वाळलेल्या पानाच्या पार्श्वभुमीवर काय वेगळे सांगुन जात असावे बरे ??
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 04/05/2008 - 09:05

Permalink

बहर

वसंतागमन होताच मिपावर उत्तमोत्तम प्रकाशचित्रांचा बहर आलेला आहे. सुर्योदयानंतर ही नितांतसुंदर फुले पाहून दिल खूश हो गया.. चित्र#१ फारच आवडले कोलबेरराव आणि सहजराव दोघांचेही उत्तम प्रकाशचित्रांपद्द्ल अभिनंदन आणि इथे दिल्याबद्द्ल धन्यु!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com