एकदम वाचले. मिळमिळीत भेंडीभोपळ्यांत रस्सा भुरकल्यासारखे वाटले. सेल्युलर जेलमध्ये भल्याभल्यांच्या डोळ्यांत पाणी येते असे ऐकून होतो, ते आता पटले. त्या पाण्यासाठी तरी आता तेथे जायला हवे.
'आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही,
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही.
दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली'
हे आठवले की नाही?
बाकी 'अंदमानला जातो आहेस, तर लक्षद्वीपला जाणार की नाही?' असले प्रश्न विचारणार्यांचा काय किंवा भल्यापहाटे मनसोक्त मेकप करुन बडीशेप चघळत उत्तेजनार्थ समाजवादी बोलणार्यांचा काय, सुळसुळाटच आहे. या 'बाजीचा-ए-अत्फाल' मधून श्रीखंडाची गोळी देणार्या आजींचाच काय तो आधार वाटतो.
प्रवासवर्णन हे टूरिस्ट गाईडसारखे नसावे. फक्त माहिती आणि छायाचित्रे यांचे भरीत म्हणजे प्रवासवर्णन अशा सुमारसद्दीत या दोन लेखांचे वेगळेपण चटकन डोळ्यांत 'भरते'.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
अंदमान तू आसुसून उपभोगला आहेस, तिथल्या निसर्गाशी रममाण होऊन अनुभवला आहेस. काय टाळायचं आणि काय पहायचं ह्याचा विवेक अशा ठिकाणी जागा असणं हे उत्तम माणूसपण जागं असल्याची खूण आहे. जियो!!
चतुरंग
श्री ऋषिकेश, मागच्या भागाप्रमाणेच हाही भाग वाचनीय झाला आहे. श्री राव यांनी म्हटल्याप्रमाणे हे भरीत नाही तर चिकटलेल्या क्षणांचे प्रकटण आहे.
जारवा लोक अजुनही नरभक्षक आहेत का? विकिपानावर तसा उल्लेख आढळला नाही. पर्यटकांना जसे जारवा लोकांना पाहता येते तसेच जारवांनाही पर्यटकांना पाहता येत असावे. त्यांना या पर्यटकांचा हेवा वाटत असेल का? माझ्याकडे वारंवार कुतूहलाने पाहणार्या लोकांचा मला राग येतो. त्यांना तसाच राग (ही एक मानवी प्रेरणा आहे, असे गृहीत धरून ) येत असेल का? अनेक प्रश्न उभे राहीले. पण मला त्यांच्या माणूसपणाचाच (दुर्लक्ष करत असल्यासारखे दाखवणे, हसणे) धागा (भारतीयत्वाचा नाही) जास्त महत्त्वाचा आणि त्यांना माझ्यापासून अधिक जवळ आणणारा वाटला.
.............................
मला सदोष वस्तु मिळाल्यास मी (उत्पादकास दोष न देता) समाजाच्या नैतिक अधोगतीकडे पाहून शांत बसतो. ----एक जालीय मत
सर्व वाचकांचे प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार.
श्री. सन्जोप राव,
दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली,
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली
काय योगायोग आहे, पहिल्या भागातील प्रवासवर्णन लिहिताना तुम्ही वर लिहिलेल्या ओळीच मनात होत्या. अर्थात हे सगळं वर्णन लिहिताना.. प्रत्यक्ष तिथे जेलमधे मात्र खरं सांगायचं तर काहिच मनात नव्हतं.. कोणताही विचार मनात येण्याच्या पलिकडे असणारी ती जागा आहे.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
चांगले वर्णन आणि (पांढर्या ठशातले पांढर्या ठशातच सोडूनही) विचारप्रवर्तक लेखन. दोन काकवांचा वाद विनोदबुद्धीने टिपला असून गंभीरही आहे.
साधारण अशीच चलबिचल अगदी पुणे जिल्ह्यातल्या मावळातील ठाकर जमातीबद्दल माझ्या मनात होत असे. राज्य सरकारने आरोग्य सेवा, आश्रमशाळा वगैरे प्रकल्प राबवले आहेत, त्यांच्यापैकी कुठला भाग हा नागरिकांशी समान वर्तणूक मानावा, आणि कुठला भाग जमातीचा विनाश मानावा? अगदी सरकारी नोकरीत ते कार्य करतानाही मन कुठल्याही निष्कर्षपाशी स्थिर होत नसे.
पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
प्रतिक्रिया
वाचतोय....
ब्येष्ट वर्णन
ऋष्या....
मस्त!
मस्त!!
जबरी !!!
सुंदर
छान..
सही रे
दोन्ही भाग
अप्रतिम लेखन ऋष्या!
धमाल!
प्रवासवर्णन नव्हे तर प्रवासबिंबे
सुंदर
धन्यवाद
उत्तम
दोन्ही भाग
विचारप्रवर्तक