हल्ली मनात कोणी वस्तीस येत नाही
मीही चुकून तेथे कोणास नेत नाही
ऐन्यात शोधतो मी सारे जुने पुरावे
निसटून काळ गेला हातात येत नाही
बाजार वेदनेचा आहे भरात आला
जखमा जुन्या तरी मी विक्रीस नेत नाही
मी श्वास घेत आहे की भास होत आहे ?
काळीज धडकल्याचा आवाज येत नाही
आश्वासने जरी ते देऊन काल गेले
परतून भेटण्याला कोणीच येत नाही
माफी मिळून आता कोणास फायदा हा
गळफासमुक्त येथे कुठलेच शेत नाही
आपापले कलेवर सजवून आज ठेवा
सरकार मोजणीला हे रोज येत नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12106
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त!
दारूण सत्य !!
परिणामकारक शब्द !
यतिभंगात विरोध असतो ना?
In reply to परिणामकारक शब्द ! by मुक्तसुनीत
ह्म्म
In reply to परिणामकारक शब्द ! by मुक्तसुनीत
वा..
जबरदस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच
In reply to जबरदस्त by नंदन
क्लास!
अप्रतीम....
म्हणजे काय?
In reply to अप्रतीम.... by इनोबा म्हणे
स्वारी बरं का!
In reply to म्हणजे काय? by व्यंकट
लै भारी रे..
आउटस्ट्यान्डिन्ग गझल | सूचना
किंचित असहमत
In reply to आउटस्ट्यान्डिन्ग गझल | सूचना by बेसनलाडू
हृदयातही कशाचा आवाज येत नाही
In reply to किंचित असहमत by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
तरीही नाही
In reply to हृदयातही कशाचा आवाज येत नाही by बेसनलाडू
धडकणे धडधड वाढणे वगैरे
In reply to तरीही नाही by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्त गझल
वा!
गझल हा
खि खि खि
In reply to गझल हा by मीनल
:)
In reply to खि खि खि by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छान.....
क्या बात है !!!
असेच
In reply to क्या बात है !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाय!!!
असेच
In reply to हाय!!! by धमाल मुलगा
वा!
खास
तात्या..
:))
In reply to तात्या.. by गिरीराज
अहो सरपंच तात्या,...
In reply to :)) by विसोबा खेचर
धन्यवाद!!
गजल?
अप्रतिम....
राव..