✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दलपतसिंग येता गावा

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Tue, 01/26/2010 - 19:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8958 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

मस्तच!

बंडू बावळट
Tue, 01/26/2010 - 19:50 नवीन
मस्तच! :) बंड्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Tue, 01/26/2010 - 19:54 नवीन
धन्यवाद पकाकाका !! अजुन असे पुण्यात आगामी काही असेल तर सांगा मालक.
  • Log in or register to post comments

राजकुमार

अजय भागवत
Tue, 01/26/2010 - 19:56 नवीन
राजकुमार तांगडे आणि संभाजी तांगडे ह्यांच्या धाडसाचे, चिकाटीचे कौतुक व्हायला हवेच. तुम्ही त्यांची ओळख घडवून आणल्यामुळे ते माहिती तर झाले!- धन्यवाद. नाटकाबद्दल उत्सुकता ताणली गेली आहे. ह्यानिमित्ताने मालेगावच्या चित्रपट सृष्तीची आठवण झाली. त्यांच्याबद्दलही जेव्हा डिस्कव्हरीवर डॉक्युमेंटरी फिल्म पाहिल्यानंतर कळले होते. स्थानिक माध्यमे अशा प्रयत्नांना आपापल्या माध्यमातून प्रसिद्धी का देत नाहीत ते मात्र कळत नाही.
  • Log in or register to post comments

छान आढावा!

प्रमोद देव
Tue, 01/26/2010 - 20:36 नवीन
वेगळ्याच पण ज्वलंत प्रश्नावरील प्रायोगिक नाटकाचा आपण अतिशय सुंदर आढावा घेऊन तो विषय आमच्यापर्यंत पोचवलात त्याबद्दल घाटपांडेसाहेब आपणास मन:पूर्वक धन्यवाद. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments

अरे, सांगत

बिपिन कार्यकर्ते
Tue, 01/26/2010 - 20:40 नवीन
अरे, सांगत जा रे.... असो. नाटकाची ओळख आवडली. अतुल पेठेंबरोबरची भेटही आठवणीत राहिल अशीच. योग कधी येतो ते बघायचे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सही

सहज
Tue, 01/26/2010 - 21:06 नवीन
तांगडे द्वयी,पेठे, साठे यांच्या चांगल्या विषयावरच्या नाट्यप्रयोगाची ओळख आवडली.
  • Log in or register to post comments

माझे मत

श्रावण मोडक
Tue, 01/26/2010 - 23:02 नवीन
प्रकाशराव, आपली भेट हुकली म्हणायची मग. मी होतो की... नाटकाविषयी माझी मते थोडी वेगळी आहेत तुमच्यापेक्षा. अभिनय (हे सारे कलाकार हौशी आहेत हे ध्यानी घेता) उत्तमच. विशेषतः अलकाच्या भूमिकेतील मुलीने अनेकदा (आजूबाजूला पहात असलेल्या) काही प्रख्यात स्त्री कार्यकर्त्यांची छाप जाणवून दिली (म्हणजे दिग्दर्शकाचेही त्यांच्याविषयीचे निरिक्षण बारीक असावे :) ). गाणी/पदं चांगली. अर्थपूर्ण. मुख्यतः त्यांना दिलेला साज पोवाडा वगैरेचा असल्याने अगदी प्रभावी. संगीतही तसेच. पाऊल आपटतच होतो मी. पण... नाटकातील भाषा... अस्सल गावरान मटणात गूळ घातला की जे होईल ते अनेक ठिकाणी होत होतं. शहरातून अशा भागांत जाणारी कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता समजून घेण्यातही कमी पडले की काय मकरंद साठे? मला आठवतं, एकजूट हा शब्द ज्यांच्या अनुभवात नसतो तिथं तो वापरून उपयोग नसतो. तिथं ती, एक काटकी सहज मोडता येते आणि दहा एकत्र असतील तर मोडता येत नसतात ही, युक्ती कामी येते. अशा पद्धतीने तिथल्या पर्यावरणाशी कार्यकर्ते समरूप होत जातात. त्याऐवजी इथं ज्या पद्धतीनं हक्क, अधिकार यांची भाषा होते ती मटणात गूळ ठरते. ग्रामीण भागातील लोकांना आपण खूप काही शिकवत असतो हा आविर्भावही दिसतो. गावाकडच्या माणसाला सरकारी कामात कोण पैसे खातंय हे कळत नसतं असा एक समज आहे. तो खोटा असतो. ग्रामीण माणसाचं शहाणपण असं असतं की, तो त्याला हे ज्ञान आहे हे दाखवत नसतो, कारण त्याला कायमचं तिथं रहायचं असतं. समोरच्याची खात्री होईपर्यंत तो त्याचे पत्ते उघडत नसतो. हे व्यवहारज्ञान त्याच्याकडं असतं. त्याचं भान या स्क्रिप्टमध्ये दिसलं नाही. अलका शिकवते आणि ती मंडळी शिकत जातात. हे सारं कोणाच्या तोंडून ऐकायचं तर ज्यानं पोलिसांमध्ये ऑर्डर्ली असताना आपल्या प्रमुखाविरुद्ध धरणं आंदोलन केलं आहे आणि त्यापोटी नोकरी गमावली आहे, त्याच्याकडून. इतकी सोपी नसते ही प्रक्रिया. नाटकांत अनेकदा अनेक प्रसंग लाऊड केले गेले. तुम्ही वर दिलेल्या दुसर्‍या छायाचित्रातील प्रसंग आठवा. कितीही सरंजामी असला तरी तो इतका हुशार असतो की, समोर आलेल्याचा थंड डोक्याने काटा काढणं त्याला ठाऊक असतं. ग्रामीण भागातील असा सरंजाम बाहेरून, तेही शहरातून आलेल्या कार्यकर्त्यांशी (इथं तर ही अलका आयएएस, माजी जिल्हाधिकारी आहे) या प्रसंगाप्रमाणे वागतात यावर माझा अनुभवान्ती विश्वास नाही. त्यांच्या वागण्यात एक सॉ़फिस्टिकेशन असतं. ते त्या पहिल्या भेटीतून भलताच मेसेज कधीही जाऊ देत नाहीत. कारण तिथं इतर कटकटी असतात. तसाच प्रकार ते जिल्हाधिकारी अलकाच्या घरी येतात तेव्हाचा. हे जिल्हाधिकारी एखाद्या हेड कॉन्स्टेबलनं वागावं तसं वागतात. ट्रंक किती आहेत किंवा माणसं किती आहेत याची चौकशी ते ज्या पद्धतीनं करतात ते पाहिलं तर हसू येतं. असं होत नसतं. जिल्हाधिकाऱ्याकडे असली माहिती काढण्याचे इतर सोर्सेस असतात. प्रांताशी होत असलेल्या चर्चेवेळीही तोच प्रकार. त्याचा सूर पाहिला तर गावगुंड वाटतो तो. त्याच चर्चेवेळी प्रांत सांगतो की 'कलेक्टर ऑर्डर काढेल' आणि त्याचे म्हणणे ऐकून मंडळी उठतात? अलका स्वतः कलेक्टर होती. गायरानाची ऑर्डर, कलेक्टरचा रोल, इतर खाती... कळत नाही!!! हे सगळं या विश्वाविषयीच्या अल्पसमजातून आलेलं आहे असं कसं म्हणायचं? साठे, पेठे चळवळींशी संबंधित आहेत. नाटकाची कथा तितक्या पकडीची नाही, जितकी पकड अशा चळवळीत प्रत्यक्षात असते. अरूण रॉय यांनी राजस्थानात जे केलं, त्याविषयी एक एकरेखीय प्रतिमा नाटक निर्माण करून देतं. माहितीच्या अधिकाराची लढाई त्यापलीकडं आहे. ती न घेताही गावापुरतं बोलायचं होतं तरीही त्यात पेच आहेत. ते येत नाहीत. योगिनी आत्ता जे करते आहे त्यातील किंवा अरूण रॉय यांचा तो काटेदार संघर्ष नाटकाची एकूण लांबी ध्यानी घेता समाविष्ट करता आला नसता असे थोडेच आहे. म्हणजेच आहे या जीवात हे नाटक आणखी आटोपशीरही झाले असते. अचानक आणलेला सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट व माहितीचा अधिकार हा संदर्भही फसवा. तेच सतीश शेट्टी संदर्भात. हे असे काही आणून प्रभाव वाढतो? मला शंका आहे. कच्चे दुवे खूप राहिले असे. त्यातच नाटकासाठी निवडलेला फॉर्मही गोची करतो की काय असे वाटत राहिले. ना धड पथनाट्य, ना धड स्टेजचं नाटक असं काही तरी शेवटपर्यंत वाटत राहिलं. एकूण बरीचशी कसरत. आठेक जण गातात तेव्हा माईकच्या ते फार जवळ येण्याची गरज नसते. ते आले आणि एकूण कल्लोळ झाल्यासारखे झाले. मला तर अनेकदा या कलाकारांना माईकची गरज नाही असेही (अत्यंत पॉझिटिव्हली) वाटत होते. अलका किंवा ती दुसरी मुलगी, शाहीर, ऑर्डर्ली झालेला, सरंजामदार यांचे आवाज पुरेसे बोलकेच होते. पुन्हा एकदा, कलाकारांना मात्र दाद! अवांतर: अरूण रॉय हीच व्यक्तिरेखा न घेता अलका ही व्यक्तिरेखा का घेतली असावी? पुन्हा बाकी संदर्भ तेच. आयएएस, माजी जिल्हाधिकारी, दिल्लीतील मैत्रीसंबंध वगैरे!
  • Log in or register to post comments

प्रायोगिक

प्रकाश घाटपांडे
Wed, 01/27/2010 - 09:22 नवीन
हे एक प्रायोगिक नाट्य आहे. हायब्रिड फॊर्म हा जाणीवपुर्वक घेतला असावा. ग्रामीण व शहरी प्रेक्षकांचा लघुत्त्तम साधारण विभाजक/विभाज्य घेतल्यास तोच व्यवहार्य ठरतो. सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नात ते बोजड झाले असते. तरीही तुम्ही म्हणता तसे
योगिनी आत्ता जे करते आहे त्यातील किंवा अरूण रॉय यांचा तो काटेदार संघर्ष नाटकाची एकूण लांबी ध्यानी घेता समाविष्ट करता आला नसता असे थोडेच आहे. म्हणजेच आहे या जीवात हे नाटक आणखी आटोपशीरही झाले असते.
हे मात्र खरे. मॅच्युअर्ड प्रेक्षक जेव्हा प्रायोगिक नाटकांकडे पाहतो त्यावेळी त्या मर्यादा प्रायोगिकतेच्या असतात. एक वेगळा प्रयोग या दृष्टीने पाहिल्यास नाटक समाधान देते. ( अर्थात हे व्यक्तीसापेक्ष आहे)
पोलिसांमध्ये ऑर्डर्ली असताना आपल्या प्रमुखाविरुद्ध धरणं आंदोलन केलं आहे आणि त्यापोटी नोकरी गमावली आहे, त्याच्याकडून. इतकी सोपी नसते ही प्रक्रिया.
हे वास्तव च आहे. पण यातुन ऑर्डलीच्या मनातील विद्रोह व्यक्त होतो. भले तो आंदोलन करणार नाही पण घुसमट नक्की होते. बाईसाहेब काम सांगतात त्यावेळी नवीन पिढितील पोलिस शिपाई विद्रोह व्यक्त करतो अशा वेळी " गांडीला दात आलेत का? म्हाईतीये लई ब्यालिष्टर लागुन गेले." असे म्हणुन ऑर्डर्ली बदलला जातो. निमूटपणे काम करणार्‍याला सहकारी लोकांकडुन "ए पाठचोळ्या..." म्हणुन उपहास देखील सहन करावा लागतो. एस आर पीत हे जास्त घडत. महाराष्ट्रापेक्षा तुलनेने मागास राज्यात हे अधिक घडत असणार. सहसा हरकाम्या म्हणुनच काम करण्याची ज्याची लायकी आहे अशा लोकांनाच ऑर्डर्ली म्हणुन नेमतात. नाटकात एनजीओ विषयी प्रतिमा डागाळु नये याची काळजी घेतली दिसते. ताजे उल्लेख हे व्हर्चुअली इंटरॅक्टीव्ह करण्याचा प्रयत्न असावा . हल्लि सिरिअल मधे पण असे उल्लेख असतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

एका

प्रभो
Tue, 01/26/2010 - 23:14 नवीन
एका चांगल्या नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्स पकाकाका.. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी
  • Log in or register to post comments

नाटकाची

भडकमकर मास्तर
Wed, 01/27/2010 - 00:45 नवीन
नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद...
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Wed, 01/27/2010 - 04:46 नवीन
हेच म्हणतो... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

असेच म्हणतो

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 01/27/2010 - 07:44 नवीन
श्री मास्तर यांच्याप्रमाणेच म्हणतो. श्री घाटपांडे, नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. श्री पेठे मी नाशिकला होतो तेव्हा नाशकात नाटकासंदर्भात विविध अभिनव प्रयोग 'प्रयोग परिवार' या संस्थेमधुन करत असत. स्थानिक कलाकरांबरोबर त्यांनी केलेली काही नाटके पाहिलेली आहेत. त्यांच्या प्रयोगांना अधिकाधिक यश मिळो ही सदिच्छा. श्री मोडक यांचा समिक्षणात्मक प्रतिसादही परिचयाप्रमाणेच उत्तम. .................................... I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. --- Oscar Wilde.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

असेच

स्वाती दिनेश
Wed, 01/27/2010 - 12:16 नवीन
नाटकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... मास्तरांसारखेच म्हणते, स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

कावं

पाषाणभेद
Wed, 01/27/2010 - 08:28 नवीन
कावं सायेब, आप्ल्या आन्नसायबावरच हाय ना ह्ये नाटकं? उगा राजस्तानी बाप्या दावला म्हंजी आमाला कळना व्हय? ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
  • Log in or register to post comments

नाटकाची

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/27/2010 - 17:42 नवीन
नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल आभारी...! नाटय़प्रशिक्षण व निर्मितीत इंद्रजित खांबे, राजेंद्र बापट, कणकवलीचे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान यांनी खर्चाचा काही भार उचलला आहे. आभार मानलेच पाहिजे वरील मान्यवरांचे. नाटकाची कथा माहितीच्या अधिकाराची असेल तर त्याची मांडणी कशी झाली आहे, हा मात्र माझ्या उत्सूकतेचा विषय आहे. कारण, मजदुर किसान शक्ती संघटना, परिवर्तन,एनसीपीआरआय,शासन,न्यायव्यवस्था यांच्या भुमिकां त्याचबरोबर जागतिक बँकेच्या दबावामुळे माहितीच्या अधिकाराच्या कायद्याला बळकटी मिळाली हे सर्वश्रुत आहे. आणि असा हा लढा 'मंचावर'कसा आला आहे, त्याची उत्सूकता आणि काहीएक संदेश 'दलपतसिंग येता गावा' मधून पाहता यावा अशी अपेक्षा मात्र आहे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एका

दिनेश५७
गुरुवार, 01/28/2010 - 09:43 नवीन
एका चांगल्या प्रयत्नाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मालेगावच्या चित्रसृष्टीची- मॉलिवूड-ची ओळख इथे पाहा : http://ajaybuwa.blogspot.com/2008/05/blog-post.html
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा