Skip to main content

रगडा पॅटिस

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 26/01/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी काहीतरी चांगलं बनवलं होतं तर म्हटलं मिपाकरांसाठी पाकृ देउयात तसं काय हो आंतरजालावर एक शब्द टाकायची देरी, हजारो पाकृ तरी हजर होणार... मागे एकदा सासूबाइ आल्या होत्या तेव्हा त्यांना भारी नवल वाटे, म्हणे "माझी सून फार हूश्शार आहे बरं कां...त्या इंटरनेटवर पाकृ शोधते नी लगेच बनवते" ...असं सांगत होत्या भारतात सगळ्यांना.. :D :)) मला काय!!! मी आपला मोठेपण घेते हिंडत होते या भारत भेटीत... हेहेहे... चाट नावाचा प्रकार आपल्या बाबांच्या वयाच्या लोकांना वगळता प्रत्येकाच्याच आवडीचा...बाबांना तर काय, जेवण लागतंच बुवा...घरी चाट बनवलं की परत काहीतरी बनवावंच लागे...बर्‍याचदा तर खिचडीच असे...मी तर विचार करायची म्हणजे एवढं चटपटीत खाल्ल्यावर एवढी रद्दड साधी खिचडी (फोडणीची ही नाही बरं कां...) बनवण्यामागचं प्रयोजन काय असावं? बहूतेक त्यामागे वास्तवाची जाणीव करून देण्याचं लॉजिक असावं...अस्सं की आता हाणलंयस ना चमचमीत मग खिचडीही खावी लागते कधीतरी आयुष्यात...हेहेहे...पण उमजतंय कोणाला एवढं सगळं...आम्ही भावंड आपलं खाण्यात मग्न असू...आता जरा मेन प्वाइंटकडे वळूयात...रगडा पॅटिसबद्दल म्हणायचं तर असा तर मला फार कधी स्पेश्शली आवडला नाही...मी तर अगदी मोजक्याच भेळवाल्यांकडचा रगडा पॅटिस घ्यायची बाकी पाणीपूरी, भेळपूरी, शेवपूरी, दहीपूरीचाच नंबर असे...इकडे अमेरीकेत तर जास्तकरुन पंजाबी छोले-टिक्कीच मिळते पण फार-फारच मसालेदार असते, मला तरी एवढी मसालेदार चाट आवडत नाही...म्हणून विचार केला की आपणच रगडा पॅटिस घरीच बनवूयात...तसं बघायला गेलं तर रगडा पॅटिस मधे रगडा, पॅटिस आणि चटण्या असे भाग पडतात... चटण्यापण ३ प्रकारच्या असतात...एक असते लाल मिरची+लसूण ची तिख्खट चटणी, दुसरी हिरवी पूदीना-कोथंबीरीची आंबट-तिखट चटणी आणि तिसरी चिंच-गूळाची आंबट-गोड चटणी. मलातर या चटण्यापण आपल्या स्वभावांप्रमाणेच वाटतात... अगदी राकट-रागीट, जो खुदकी शर्तो पर जीता है तो माणूस जास्त करून चिंच-गूळाची आंबट-गोड चटणी अगदीच कमी घेइल किंवा ज्यादा तिखा घेइल...मुली मुख्यत्वेकरून कमी तिखट किंवा मिडियम तिखा घेतील, सगळ्याच घेतील असं नाही बरं कां...आणि अजूनही मवाळ स्वभावाचे लोक कम तिखा घेतील, या कॅटेगरीमध्ये लहान मुलंच येत असावीत बहुतेक..... आणि सगळं कंपलसरी असंच असेल असं काही नाही...ज्याची त्याची मर्जी बुवा... तर ही लाल चटणी बनवायची कशी... बचकभर लाल मिरच्या भिजवून ठेवायच्या एखाद तास तरी आणि अर्धी बचकभर लसूण नी चवीपुरतं मीठ...हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून अगदी बारिक वाटून घ्यावं...जर बारिक वाटता नाही आलं तर गाळून घ्या...मी थोडंसं काळं मीठ पण टाकलं होतं...पण चटणी अगदी लालचुट्टूक दिसली पाहीजे... World Famous हिरवी चटणी तर अगदीच सोप्पी आहे... परत बचकभर पुदीना+ पुदीन्यापेक्षा थोडी जास्त कोथंबीर+तिखटपणानुसार मध्यम तिखट मिरच्या ५-६ हिरव्या मिरच्या तरी लागतात+चवीपुरते (साधं मीठ+काळे मीठ)+एखाद चमचा लिंबू रस+ एक छोटा चमचा जीरे पावडर... चिंच-गूळाची चटणीपण सगळ्यांना माहीतच असेल तशी पण तरीही... एक लिंबाएवढी चिंच + तेवढाच गूळ + खजूरही घालतात पण माझ्याकडे नव्हते...गूळही नसेल तर साखरही चालेल किंवा गूळ-साखर कॉम्बो ही करता येतं... मी चिंच आणि गूळ वाटीभर पाण्यात तासभर भिजत घातला होता मग सगळं गरगट टाकलं मिक्सर मधे नी फिरवलं १० मिनीटांसाठी मग गाळून घेतलं...त्यात छोटा चमचा तिखट, तेव्हढीच जीरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून उकळायला ठेवलं...दोन एक उकळ्या आल्या की ठेवून द्यावं बाजूला...चव घेत घेत गोडाचं प्रमाण वाढवावं... रगडा तसा अगदी सोप्पा आहे...दोन वाट्या भिजवलेले पिवळे वाटाणे ४-५ वाट्या पाणी घालून ३-४ शिट्ट्या मारून घ्याव्या... यातच २ मध्यम बटाटे सोलून टाकावे...हे गरगट थोडं जास्तच शिजवावं...मग त्यात हळद, चवीपुरतं मीठ, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा लाल तिखट घालून एक उकळी आणावी...आणि एक विसलीच की याला आपल्या पावभाजीच्या चेपण्याने किंवा कालथ्यानी जरा रगडावं...झाला रगडा तय्यार... आता पॅटिस बनवूयात... ५-६ बटाटे प्रेशर कूक करून घ्यावेत...बटाटे सोलून..फोर्कने किंवा हाताने कुस्करून घ्यावेत त्यात ३-४ कुस्करलेले ब्रेड्-स्लाइस घालावे...ब्रेडक्रम्सपण चालतील...आता त्यात मीठ, तिखट, हळद, गरम मसाला घालून तेलाच्या हाताने चांगलं घट्ट मळून घ्यावं..हव्या त्या आकारात (गोल, हार्ट शेप पॅटिस) बनवून घ्या...हे ही डिपेंड करतं...जर बायको-प्रेयसीसाठी बनवत असाल तर त्या गणपासारखं हार्ट शेप मधे बनवा...गणपाने तर प्रॉन्सपासूनही हार्ट बनवलं होतं हो...नाहीतर बनवा आपलं गोल..चौकोनी, त्रिकोणी...एखादा नकाशाही बनवू शकता..तुमचं देशप्रेम दाखवायला, नेमका प्रजासत्ताक दिन येतोच आहे...जरा जास्त झालं नाही... :D एका फ्राय पॅन वर २ चमचे तेल घालून ही पॅटिस शॅलोफ्राय करून घ्या... फायनल टच मसाला : २-३ चमचे चाट मसाला+ १ चमचा तिखट + १ चमचा काळं मीठ एकत्र करून ठेवावं..हा मसाला पनीर पकोडावर पण छान लागतो... बस्स आता फक्त वरून घ्यायला बारिक चिरलेला कांदा, बरिक शेव, कापलेली कैरी आणि लिंबू... आता रगडा पॅटिसचं सगळी जिन्नसं तय्यार आहेत... एका प्लेटमध्ये २ पॅटिस घेऊन त्यांना फोर्कने मोडा.. आता त्यावर दोन पळ्या रगडा घ्या त्यावर हवी तशी हिरवी चटणी, लाल चटणी आणि चिंचेची चटणी घ्यावी... आता चिरलेला कांदा-कैरी, बारिक शेव आणि चाट मसाला मिक्शर घेऊन मस्त मिक्स करावं किंवा तसंच मिक्स न करता खावं... एवढ्या साहीत्यात ४ ते ६ लोक मज्जेत खाऊ शकतात...आणि उरलं तर काय हो दुसर्‍या खेपेस चालेलच की... :) सो गाइज टेक युअर टाइम अ‍ॅन्ड एन्जॉय.... दिपाली :)

वाचने 12768
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

पाटलीण बै, अप्रतिम फटु... वर्णनाची स्टाईल पण एकदम खुमासदार... जोरदार पुनरागमन झालेलं दिसतंय.. :) स्वगतः तिकडून इकडे पॅटीस शिप करायचे झाले तर डझनच्या भावात स्वस्तात पडेल नै?

जल्ला...सकाली सकाली हे काय असं हापिसात बसुन पाहिलं ना की लयं म्हणजी लयं तर्रास्स्स..व्हतो. बस्स आता फक्त वरून घ्यायला बारिक चिरलेला कांदा, बरिक शेव, कापलेली कैरी आणि लिंबू... बस्स... बस्स... बस्स... सहन होत नाही आता.... ;) फोटो = क्लास १ :) (चाट प्रेमी) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

संपलं!!! खिचडीच खात असताना असले पदार्थ!!! अत्याचार आहे.. दिपाली, वर्णन खास आहे अगदी पाकृ च. फोटो तर.. मार डाला! - प्राजक्ता http://www.praaju.com/

रगडा पॅटिस आणि वर्णनाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत. >>"माझी सून फार हूश्शार आहे बरं कां...त्या इंटरनेटवर पाकृ शोधते नी लगेच बनवते" हा हा हा,, पाकृच्या निमित्तानं का होईना सासू सुनेचे कौतुक करते, हे काय थोडं आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:D दिपाली :)

IKEAत जातेस का खरेदिला :> चुचु

दिपालीतै आपलेही खाते उडवायला सांगण्यात यावे काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

अ प र इ त इ म ! ! ! खरंच. लै आवडता पदार्थ आहे हा. फोटो वगैरे बघून अजून खवळतं पोट. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

परा...अजून कोणाचं खातं उडवलं आहे? :S बिका: अ प र इ त इ म म्हन्जे काय हो?? :/ दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

त्या महा हलकट आणी महा नालायक गणपाचे खाते उडवयाला सांगितले आहेच, तसेच तुमचेही उडवायला सांगतो. एकदाचे हे डोळ्यावरचे अत्याचार तरी थांबतील आमच्या !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by दिपाली पाटिल

जल्ला, कल्ला नांय? खंरां? बिपिन कार्यकर्ते

रेसिपीच्या वर्णनामुळे रगड्याला मस्त चव आली... फोटो पण काय मस्त आला आहे.....लगेच स्वयंपाघरात जाऊन रगडा पॅटीस करावे वाटते....पण भिजलेले वाटाणे नाहीत ना??? :(

In reply to by स्वाती राजेश

स्वातीताई... वाटाणे न भिजवतासुध्दा प्रेशर कूक करता येतात फक्त ६-७ शिट्ट्या माराव्या लागतात...चवीत काहीही फरक पडत नाही. दिपाली :)

हायल्लाआआआ !! क्या फोटू है ... दिलखुश .. रगडा पॅटिस खायला आम्ही सदैव तयार असतो :) - डबडा णॉटिस

अगगगगा.....खपलो रे... बास..या विकांती बनवणारच आता. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

एकदम गाडीवर मिळते तसे दिसते आहे. लिहीलंयही पॅटिस करताना गप्पा मारल्यासारखे.

गप्पा मारता-मारता रगडा-पॅटिस बनवून पार!

अगदी परवाच, रविवारी बनवले होते रगडा पेटिस आणि आलेल्या पाहुण्यानापण खूप आवडले ... पटापट गट्टम झाले सर्व :) पण तुम्ही 'कृती' ज्या खुमासदारपणे लिहिली आहेत ते मात्र एकदम लाजवाब !!!

सही आहे एकदम. बघुनच भुक लागली.

बॅक विथ अ बँग. लै भारी फोटो आणि क्रुति. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

फोटो बघून राहवले नाही आणि त्या जोशात पाककृतीही वाचून काढली..क्लास !!

रगडले असते पण आमच्या कडे सफेद वाटाणे मिळत नाहित :( रगड्यात बाकीच्या कडधान्यांना वाटाण्याची सर नाही.

दिपाली, मला कधी बोलवतेस हे असे पदार्थ केल्यावर ह्याची वाट बघतेय... :) झकास!

कधीही ये...एवढ्या जवळ राहतो आपण पण वर्ष होत आलं तरीही भेटलो नाही. :D दिपाली :)

दिपाली, गप्पा मारत केलेले रगडा-पॅटिस एकदम झकास दिसतयं.

दिपाली मस्तच आपण पॅटिससाठी ब्रेड्-स्लाइस एवजी पोहे पण घेवू शकतो.

माझ्या नजरेतून हा धागा कसा काय निसटला?;) फोटो पाकृ मस्त मस्त मस्त! तू नेहमीप्रमाणेच छान पदार्थ (व घातपात) केलायस. रेवती