
बर्याच दिवसांनी काहीतरी चांगलं बनवलं होतं तर म्हटलं मिपाकरांसाठी पाकृ देउयात तसं काय हो आंतरजालावर एक शब्द टाकायची देरी, हजारो पाकृ तरी हजर होणार...
मागे एकदा सासूबाइ आल्या होत्या तेव्हा त्यांना भारी नवल वाटे, म्हणे "माझी सून फार हूश्शार आहे बरं कां...त्या इंटरनेटवर पाकृ शोधते नी लगेच बनवते" ...असं सांगत होत्या भारतात सगळ्यांना.. :D :))
मला काय!!! मी आपला मोठेपण घेते हिंडत होते या भारत भेटीत... हेहेहे...
चाट नावाचा प्रकार आपल्या बाबांच्या वयाच्या लोकांना वगळता प्रत्येकाच्याच आवडीचा...बाबांना तर काय, जेवण लागतंच बुवा...घरी चाट बनवलं की परत काहीतरी बनवावंच लागे...बर्याचदा तर खिचडीच असे...मी तर विचार करायची म्हणजे एवढं चटपटीत खाल्ल्यावर एवढी रद्दड साधी खिचडी (फोडणीची ही नाही बरं कां...) बनवण्यामागचं प्रयोजन काय असावं? बहूतेक त्यामागे वास्तवाची जाणीव करून देण्याचं लॉजिक असावं...अस्सं की आता हाणलंयस ना चमचमीत मग खिचडीही खावी लागते कधीतरी आयुष्यात...हेहेहे...पण उमजतंय कोणाला एवढं सगळं...आम्ही भावंड आपलं खाण्यात मग्न असू...आता जरा मेन प्वाइंटकडे वळूयात...रगडा पॅटिसबद्दल म्हणायचं तर असा तर मला फार कधी स्पेश्शली आवडला नाही...मी तर अगदी मोजक्याच भेळवाल्यांकडचा रगडा पॅटिस घ्यायची बाकी पाणीपूरी, भेळपूरी, शेवपूरी, दहीपूरीचाच नंबर असे...इकडे अमेरीकेत तर जास्तकरुन पंजाबी छोले-टिक्कीच मिळते पण फार-फारच मसालेदार असते, मला तरी एवढी मसालेदार चाट आवडत नाही...म्हणून विचार केला की आपणच रगडा पॅटिस घरीच बनवूयात...तसं बघायला गेलं तर रगडा पॅटिस मधे रगडा, पॅटिस आणि चटण्या असे भाग पडतात...
चटण्यापण ३ प्रकारच्या असतात...एक असते लाल मिरची+लसूण ची तिख्खट चटणी, दुसरी हिरवी पूदीना-कोथंबीरीची आंबट-तिखट चटणी आणि तिसरी चिंच-गूळाची आंबट-गोड चटणी. मलातर या चटण्यापण आपल्या स्वभावांप्रमाणेच वाटतात...
अगदी राकट-रागीट, जो खुदकी शर्तो पर जीता है तो माणूस जास्त करून चिंच-गूळाची आंबट-गोड चटणी अगदीच कमी घेइल किंवा ज्यादा तिखा घेइल...मुली मुख्यत्वेकरून कमी तिखट किंवा मिडियम तिखा घेतील, सगळ्याच घेतील असं नाही बरं कां...आणि अजूनही मवाळ स्वभावाचे लोक कम तिखा घेतील, या कॅटेगरीमध्ये लहान मुलंच येत असावीत बहुतेक..... आणि सगळं कंपलसरी असंच असेल असं काही नाही...ज्याची त्याची मर्जी बुवा...

तर ही लाल चटणी बनवायची कशी...
बचकभर लाल मिरच्या भिजवून ठेवायच्या एखाद तास तरी आणि अर्धी बचकभर लसूण नी चवीपुरतं मीठ...हे सगळं मिक्सरमध्ये पाणी घालून अगदी बारिक वाटून घ्यावं...जर बारिक वाटता नाही आलं तर गाळून घ्या...मी थोडंसं काळं मीठ पण टाकलं होतं...पण चटणी अगदी लालचुट्टूक दिसली पाहीजे...
World Famous हिरवी चटणी तर अगदीच सोप्पी आहे...
परत बचकभर पुदीना+ पुदीन्यापेक्षा थोडी जास्त कोथंबीर+तिखटपणानुसार मध्यम तिखट मिरच्या ५-६ हिरव्या मिरच्या तरी लागतात+चवीपुरते (साधं मीठ+काळे मीठ)+एखाद चमचा लिंबू रस+ एक छोटा चमचा जीरे पावडर...
चिंच-गूळाची चटणीपण सगळ्यांना माहीतच असेल तशी पण तरीही...
एक लिंबाएवढी चिंच + तेवढाच गूळ + खजूरही घालतात पण माझ्याकडे नव्हते...गूळही नसेल तर साखरही चालेल किंवा गूळ-साखर कॉम्बो ही करता येतं...
मी चिंच आणि गूळ वाटीभर पाण्यात तासभर भिजत घातला होता मग सगळं गरगट टाकलं मिक्सर मधे नी फिरवलं १० मिनीटांसाठी मग गाळून घेतलं...त्यात छोटा चमचा तिखट, तेव्हढीच जीरे पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून उकळायला ठेवलं...दोन एक उकळ्या आल्या की ठेवून द्यावं बाजूला...चव घेत घेत गोडाचं प्रमाण वाढवावं...
रगडा तसा अगदी सोप्पा आहे...दोन वाट्या भिजवलेले पिवळे वाटाणे ४-५ वाट्या पाणी घालून ३-४ शिट्ट्या मारून घ्याव्या... यातच २ मध्यम बटाटे सोलून टाकावे...हे गरगट थोडं जास्तच शिजवावं...मग त्यात हळद, चवीपुरतं मीठ, १ छोटा चमचा गरम मसाला, १/२ छोटा चमचा लाल तिखट घालून एक उकळी आणावी...आणि एक विसलीच की याला आपल्या पावभाजीच्या चेपण्याने किंवा कालथ्यानी जरा रगडावं...झाला रगडा तय्यार...
आता पॅटिस बनवूयात...
५-६ बटाटे प्रेशर कूक करून घ्यावेत...बटाटे सोलून..फोर्कने किंवा हाताने कुस्करून घ्यावेत
त्यात ३-४ कुस्करलेले ब्रेड्-स्लाइस घालावे...ब्रेडक्रम्सपण चालतील...आता त्यात मीठ, तिखट, हळद, गरम मसाला घालून तेलाच्या हाताने चांगलं घट्ट मळून घ्यावं..हव्या त्या आकारात (गोल, हार्ट शेप पॅटिस) बनवून घ्या...हे ही डिपेंड करतं...जर बायको-प्रेयसीसाठी बनवत असाल तर त्या गणपासारखं हार्ट शेप मधे बनवा...गणपाने तर प्रॉन्सपासूनही हार्ट बनवलं होतं हो...नाहीतर बनवा आपलं गोल..चौकोनी, त्रिकोणी...एखादा नकाशाही बनवू शकता..तुमचं देशप्रेम दाखवायला, नेमका प्रजासत्ताक दिन येतोच आहे...जरा जास्त झालं नाही... :D
एका फ्राय पॅन वर २ चमचे तेल घालून ही पॅटिस शॅलोफ्राय करून घ्या...
फायनल टच मसाला : २-३ चमचे चाट मसाला+ १ चमचा तिखट + १ चमचा काळं मीठ एकत्र करून ठेवावं..हा मसाला पनीर पकोडावर पण छान लागतो...
बस्स आता फक्त वरून घ्यायला बारिक चिरलेला कांदा, बरिक शेव, कापलेली कैरी आणि लिंबू...
आता रगडा पॅटिसचं सगळी जिन्नसं तय्यार आहेत...
एका प्लेटमध्ये २ पॅटिस घेऊन त्यांना फोर्कने मोडा..
आता त्यावर दोन पळ्या रगडा घ्या
त्यावर हवी तशी हिरवी चटणी, लाल चटणी आणि चिंचेची चटणी घ्यावी...
आता चिरलेला कांदा-कैरी, बारिक शेव आणि चाट मसाला मिक्शर घेऊन मस्त मिक्स करावं किंवा तसंच मिक्स न करता खावं...
एवढ्या साहीत्यात ४ ते ६ लोक मज्जेत खाऊ शकतात...आणि उरलं तर काय हो दुसर्या खेपेस चालेलच की... :)
सो गाइज टेक युअर टाइम अॅन्ड एन्जॉय....
दिपाली :)
प्रतिक्रिया
पाटलीण बै,
जल्ला...सका
संपलं!!! खिच
खल्लास! -अन
फ्रिमाँटला लवकरच एक फेरी टाकावी काय ? .......
जबरा...!
हेहेहे
In reply to जबरा...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अत्त्युत्
IKEAत जातेस
दिपालीतै
अ प र इ त इ म
परा...अजून
In reply to अ प र इ त इ म by बिपिन कार्यकर्ते
दिपालीतै
In reply to परा...अजून by दिपाली पाटिल
जल्ला,
In reply to परा...अजून by दिपाली पाटिल
चविष्ट!!!
स्वातीताई..
In reply to चविष्ट!!! by स्वाती राजेश
हायल्लाआआ
अगगगगा.....खप
छान!
छान!
वाह !
सही आहे
ह्म्म 'रगडा' आता आम्हाला सकाळी सकाळी!!
हॅहॅहॅ ...
In reply to ह्म्म 'रगडा' आता आम्हाला सकाळी सकाळी!! by चतुरंग
बॅक
फोटो बघून
रगडले असते
दिपाली,
कधीही
दिपाली,
दिपाली मस्
माझ्या