Skip to main content

असे सखे तू रुसू नको ना.....

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 23/01/2010 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
असे सखे तू रुसू नको ना , मोती डोळां सांडू नको ना , फुला फुला रे माझ्यासाठी, असे उगा तू रुसू नको ना .. |१| असे कोणते दु:ख तुला गे , कुणी बोलले काय तुला गे, कटू बोल ते स्मरू नको ना, असे सखे तू रुसू नको ना.. |२| चंद्र कोर बघ अर्धी झाली, कळी उमलता तशी थांबली, अशी पापणी मिटू नको ना, असे सखे तू रुसू नको ना..|३| हसशी जर तू जग हे हासे, तयासाठी तर हास जरासे, मला दूर तू करू नको ना, असे सखे तू रुसू नको ना..|४| -- सागर लहरी १७.१.२०१०
लेखनविषय:

वाचने 2817
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

कविता आवडली. मीनल.

व्वा! छान आहे. अशी आर्जवे केल्यावर कशाला रूसेल ती सखी!! :) - प्राजक्ता http://www.praaju.com/

मस्त च रे..... एकदम तरल कविता.... आवडली....

हसशी जर तू जग हे हासे, तयासाठी तर हास जरासे, मला दूर तू करू नको ना, असे सखे तू रुसू नको ना..| मस्तच... मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

इतके प्रेमानी कोणी समजवणार असेल तर सखी सारखी रुसेल... :-)

वा सागरलहरी. मस्त आनंद दिला तुम्ही. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक) (वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)