Skip to main content

कोडगं सूख.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 22/01/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
कोडगं सूख..... अंदाज पावलांचा माझ्या मला न आला हातात हात माझा ,घेता तुला न आला ! सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला ! केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला! तू चुंबतेस आता निष्प्राण हात माझे सत्कार असा ओठांचा , करता तुला न आला! मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ ! हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला !
लेखनविषय:

वाचने 2470
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

सॉलिट्ट्ट्ट्ट....गझल. :) मदनबाण..... At the touch of love everyone becomes a poet. Plato

मी कोडगा किती पण , तरिही सुखावलो बघ ! हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! जबरदस्त!!! अतिशय प्रभावी. - प्राजक्ता http://www.praaju.com/

कविता फार प्रभावी....अन् भावना अगदी नेमकेपणानें मांडल्या आहेत....छान !!संजूबाबा

मस्तच आहे कविता. अजुन येउद्यात वाट पहतो आहे. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

कविता आवडली. तरी (आपलेपणाच्या अगांतुकपणामुळे-) बदल सुचवावे वाटतात.. केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला !

In reply to by विदेश

केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो केसांत मोकळ्या मी का हरविले स्वतःला हे नाही पटलं , वरील (पहिल्या) ओळीतील गेयता कमी होते. हुंदका दाटुनी येता , आवरता तुला न आला ! दाटून हुंदका येता, आवरता तुला न आला ! हे मात्र अगदी चपखल बसते आहे , धन्यवाद ! माझ्याकडील प्रतीत हा बदल करत आहे. या आपलेपणाबध्द्ल (हा अगंतुकपणा आहे असे खरंच नाही वाटले मला !) आपला ऋणी आहे ! उदय सप्रे

सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला ! मस्तच !!!!!!!!!!!!! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सर्वस्व उधळले अन् मी जाळले स्वतःला तो प्रेम'चांदवा' पण , बघता तुला न आला ! केसांत मोकळ्या मी हरवून स्वतःला गेलो चेहेरा कधीच माझा , धरता तुला न आला! अहाहा ! मस्त ओळी. -दिलीप बिरुटे

छान!

उत्तम गझल .. आवडली !! - आंद्या सप्रे'म

कविता उत्तम पण गझल म्हणवून घेण्यासाठी दोन बोटे कमीच (यतिभंग आणि गझलेच्या बाराखडीतील चुका) फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.