आताच माणुसकीला काळिमा लावणार्या या दोन तामिळी मंत्र्याच्या या घृणास्पद वर्तनाविषयी वाचलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून चंदनचोर वीरप्पनला ठार मारणार्या सब इन्स्पेक्टर आर वेत्रवेल्ली याला सात स्मगलर्स नी भर रस्त्यात हल्ला करून त्याचे दोन्ही पाय तोडलेले असतांना, पाठोपाठ आपल्या लवाजम्यासहित घटनास्थळी पोहोचलेल्या तामीळनाडूचे आरोग्य मंत्री एम आर के पनीरसेल्वम आणि युवक आणि क्रीडा मंत्री मोइद्दीन खान या दोघांनी कसलीही मदत न केल्याने वेत्रवेली अति रक्तस्त्रावाने इस्पितळाच्या वाटेवर मरण पावला. या सर्व घटनेत हे मंत्रीद्वय गाडीतून उतरलेही नाहीत, इतकंच नव्हे तर त्यांनी आपली गाडी वेत्रवल्ली ला इस्पितळात नेण्यासाठी देण्यासही नकार दिला!
या भ्याड मंत्र्यांचा जितका निषेध करावा तितका कमीच, त्यांना सार्वजनिकरीत्या अपमानित केले पाहिजे.
आधिक वृत्तासाठी इथे पहा.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
1850
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
अपमानित?
असेच
In reply to अपमानित? by देवदत्त
निषेध !!
बहुगुणी आजच