पुढे लिहीत राहीनच - पण ही मालिका ह्यापैकीच काही दैवतांचं नामस्मरण होतं म्हणा हवं तर ! आवडली असेल अशी अपेक्षा करतो.
आवडली म्हणजे काय? आवडलीच!
क्रिकेटवर अजूनही भरपूर वाचायला आवडेल.
>>>आवडली असेल अशी अपेक्षा करतो.
नाही आवडली अजुन, आम्हाला आवडे पर्यंत लिहित रहा ;-)
काय राव तुम्ही, निदान खोटी आशा तरी दाखवा, लेखाच्या शेवटी कधी न आवडणारा "क्रमशः" या वेळी आवडेल.
लेखाबद्दल तर बोट ठेवायला कुठे जागा नाही, समालोचक, पंच यांच्याबद्द्ल वेगवेगळे लेख झाले असते (अजुनही करु शकता). काही काही तुलना तर एकदम खतरी दिल्या आहेत, क्रिकेटच्या एखाद्या चांगल्या ईनींग सारखी तुमची लेखमाला झाली आहे, त्यात अजुन भर टाकत रहा.
--टुकुल
वॉल्श म्हणजे थरो जंटलमन होता - फास्ट बोलर्सच्या जातीवर धब्बाच जणू! ;)
अँब्रोज म्हणजे वळलं तर सूत नाहीतर भूत कॅटेगरीतला. हा यू ट्यूबवरचा दुवा पहा. स्टीव वॉनं ऑस्ट्राऽयलिअन सवयीप्रमाणं अँब्रोजला काहीतरी बोलून उचकवला आणी त्यानंतर जे काही घडलंय ते फक्त बघत रहायचं! बुळकी लागल्यासारखे एकामागून एक 'फलंदाज' येऊन जात होते. प्रत्येक विकेटनंतर अॅंब्रोज त्वेषानं हवेत पंचेस मारुन आपला आनंद साजरा करत होता! आणि संपूर्ण संघाचं ते झिम्मा खेळल्यासारखं दोन्ही हात उंचावून टाळ्या देणं केवळ लाजवाब! त्यारात्री स्टीव वॉला झोप आली नसणार! :(
कॉमेंटेटर्स मध्ये तुम्ही सुशील दोशीला कसे विसरलात? त्याच्या आवाजात एकप्रकारचा आकर्षकपणा होता, नादमयता होती, हिंदीवर विलक्षण प्रभुत्व होतं "मारना चाहते थे कवर्स में लेकिन गेंद गयी पॉइंट की ओर, एक रन लेने की कोशिश बल्लेबाजकी...लेकिन वापस भेज दिया है नॉन्स्ट्राईकरने, और ये अझहरुद्दीनने एकही अॅक्शनमें गेंद को फील्ड किये हुए थ्रो किया है सीधे विकेट पे ..औरऽऽ ये रनौट!!!" अजूनही कानात शब्द वाजतात.
अजून लिहीत रहा हो!
(ऑस्ट्राऽयलियन)चतुरंग
>>अँब्रोज म्हणजे वळलं तर सूत नाहीतर भूत कॅटेगरीतला<<
- अगदी परफेक्ट वर्णन. एका वाक्यात अँब्रोज !
>>कॉमेंटेटर्स मध्ये तुम्ही सुशील दोशीला कसे विसरलात?<<
आयला खरंच की.... एकतर रेडियो समालोचन फारसं ऐकायला मिळालं नाही (रादर ऐकलं नाही). पण जे काही ऐकलं ते रवि चतुर्वेदी आणि सुशील दोशीचंच ! पण समहाऊ रवी चतुर्वेदी आणि आकाश लाल ही जोडी डोक्यात फिट्ट बसली होती. शिवाय मराठीतले चंद्रशेखर संत आणि बाळ पंडित होतेच !
लिहित रहा... ही नेहमीची विनंती नाही? हा 'फतवा' समजशील?
हर्षा आहे, रवीही आहे. आणि सनीही आहे. समालोचनासाठी.
वेंकीविषयी लिही... असं खूप तुझ्या लेखणीत वाचायचं आहे.
तू म्हणजे लेका क्रिकेट जगतो आहेस.
जीते रहो !
वॉल्श मला सर्वांत पहिल्यांदा आवडला तो म्हणजे त्याच्या आणि होल्डिंगच्या बॉलिंग अॅक्शनमधील साधर्म्यामुळे ! नंतर मग मात्र त्याच्या अंगच्या गुणांमुळे जास्तच आवडायला लागला.
(त्यानंतर बर्याच वर्षांनी पुन्हा असं झालं फक्त वॉल्श आणि होल्डिंगच्या नावांच्या जागी सेहवाग आणि तेंडल्या ही नावं टाकायची !)
>> तू म्हणजे लेका क्रिकेट जगतो आहेस.<<
आयच्यान ! ! क्रिकेट (आणि एकंदरच सांघिक खेळ) खेळल्या / पाहिल्याचा प्रोफेशनल आयुष्यात कसा आणि किती फायदा झालाय ते सांगताही नाही येणार ! कधीतरी ह्या संबंधावर लिहीण्याचा प्रयत्न करीन ! लै मोठं प्रकरण आहे ! तू पण 'आपल्यातलाच' आहेस ह्याची खात्री आहे ;)
जबरदस्त लिखाण. सगळी मालिका आवडतच होती. हा लेख कळस चढवावा तसा झालाय. मस्तच.
आपण सकाळी पेपर उघडताना मागल्या पानापासून सुरू करणारी लोकं.
हे सगळयात ज्यास्त भावलं.
लिहीत रहा.
- ओंकार
मॉर्गन्
इतक्या अनेक ( आणि जुन्या) छान छान आठवणी तुम्ही जागवल्या की पूर्ण लेख वाचत असतांना सारख डोळ्यात पाणी येत होते. तो रेडीओला कान लावून तासंन तास ऊभा असलेला, ४२ वर ऑल ऑउट झाल्यावर रड्णारा, सरदेसाईची ड्बल सेंच्युरी होते आहे म्ह्णुन शाळेला दांडी मारणारा... 'मी' तुम्ही मलाच भेटवून दीलात. धन्यवाद!
सिरीअसली सांगतो. कणेकर, संझगीरी आदि मंडळीं पेक्षा तूम्ही नक्कीच सरस लिहीता. ( आय.आय. एम चे पाणी !)
तेंव्हा लिहीत राहा... जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा लिहा हवे तर.
मोहन
मॉर्गनसाहेब,मस्त लिहिताय. तुमच्यामुळे माझ्याही आठवणी चाळवल्या गेल्या.
माझी क्रिकेटच्या समालोचनाशी ओळख झाली तेव्हा फक्त आकाशवाणी होती. त्यावेळी विजय मर्चंट,लाला अमरनाथ, अनंत सेटलवाड,पीअरर्सन सुरिता,राजु भारतन्,देवराज पुरी(नरोत्तम पुरीचे वडील असावेत) वगैरे मंडळी इंग्रजीत आणि जसदेव सिंग हे एकमेव समालोचक हिंदीत होते. मराठीत बाळ पंडीत.विवि करमरकर आणि डॉ.सुरेशचंद्र नाडकर्णी ही त्रयी होती.
माझ्या आधीच्या पिढीला बॉबी तल्यारखान ह्यांचे समालोचन आवडत असे...मात्र त्यांच्या खरखरीत आवाजामुळे मला ते कधीच आवडले नाहीत.
विजय मर्चंट हे धावते समालोचन कधीच करत नसत. अगदी खेळ रंगात आलेला असला तरी ते क्रिकेटचा इतिहास,एखादी मनोरंजक घटना,वर्तमान खेळाडुचे वैषिष्ठ्य,त्याच्या लकबी,त्याच्या अंधश्रद्धा वगैरेबद्दल अतिशय मजेशीर माहिती देत असत. मधेच कधी तरी स्कोरही सांगत. ;)
अनंत सेटलवाड हे फक्त धावतं समालोचन....अगदी धावत्याआणि ओघवत्या शैलीत करत. चेंडूच्या बरोबरीने तेही सीमापार जात. :)
लाला अमरनाथांच्या टिपण्या अतिशय मार्मिक असत मात्र त्यांनीही धावते वर्णन कधी केले नाही...ते आपली तज्ञाची भूमिका बजावत.
पीअर्सन सुरिता ह्यांचा आवाज गोड होता पण उच्चार तोंडातल्या तोंडात...की मिशीतल्या मिशीत म्हणा हवे तर...त्यामुळे शब्दन शब्द समजत नसे. तरीही समालोचन धावतं असायचं.
जसदेव सिंगांबद्दल काय सांगू? जो माणूस हॉकीच्या चेंडूबरोबर धावू शकतो...समालोचन करतांना हो...तो क्रिकेट समालोचनही तितकेच रोचक करायचा.
बाळ पंडीत ह्यांनी मराठीत समालोचन करण्याची प्रथा पाडली असे म्हटल्यास वावगे होऊ नये. नुसतीच प्रथा नाही पाडली,तर ते लोकप्रियही केले. क्रिकेटमध्ये मराठी शब्दही त्यांनी आणले. उदा. यष्टी,यष्टीरक्षक,गोलंदाज,फलंदाज वगैरे.
विविक म्हणजे तर क्रिकेटचा चालता बोलता विश्वकोशच म्हणा. आपल्या शांत आणि एकसुरी आवाजात ते धावते वर्णनही अतिशय छान पद्धतीने करत.
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी मराठीतही समालोचन करतांना ते इंग्लीश समालोचनाच्या पद्धतीने करत. त्यांचे मराठी उच्चार, शद्बांवर जोर देण्याची पद्धत पाहिली की लक्षात यायचं की हे मराठीतून इंग्रजी बोलत असावेत. :)
इंग्रजी आणि हिंदी समालोचकांसाठी त्या काळी फक्त एकच स्कोअरर होते...ते म्हणजे आनंदजी डोसा. हा माणूस म्हणजे क्रिकेटच्या माहितीचा संगणक होता असे म्हणू शकतो. क्षणार्धात जुन्यात जुनी माहितीही तो देऊ शकत असे.
मराठीत हे काम बी.बी. मामा करत असत.
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
देवकाका... मला वि वि करमरकर हेच नाव आठवत नव्हतं. सोमवारी संध्याकाळी "क्रीडांगण" चं सूत्रसंचालन करणारे करमरकर आणि संत ह्यांचे चेहेरे मला स्पष्ट आठवले !
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !
शिवाय प्रत्येक समालोचकाची खासियत, शैली ह्यांच्या बद्दलचं तुमचं विश्लेषण खूपच छान. प्रत्येक कॅरेक्टर डोळ्यासमोर उभं राहिलं ! स्कोरर्स ची नावं पण विसरला नाहीत !
पुढे लिहीत राहीनच - (आधीची वाक्यं नम्रपणे मागे घेतली आहेत)
आता कसं मॉर्गन राव...
ह्या खेळाबिगर जगणं मुश्किल आहे !
करेक्ट्ट्ट... ;)
बाकी टोलेबाजी मस्तच झाली आहे... :)
(नेहमीच क्लीन बोल्ड होणारा...) ;)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
अहाहा! काय लिहीलय.. पहाटे अडीच तीन ला उठून मॅच पहायल्या पायपीट करत मित्राच्या शेजार्यांकडे जायचे दिवस आठवले.. मॅच च्या दुसर्या दिवशी प्रत्येक वर्तनमानपत्राचे शेवटचे पान वाचायचो ते ही आठवले.. षटकार वाचायचो तेव्हा नंबर लावून.. क्रिकेट हेच विश्व, सगळं पुन्हा आठवलं.. लेख परिपूर्ण झालाय.. आणि देवकाकांनी म्हटल्याप्रमाणे मुंबई, पुण्यात किंवा नागपूरला मॅच असली की मराठी कॉमेंट्री ची धमाल असायची.. करमरकर, संत.. कानाला रेडीओ आणि रेडीओला कान चिकटलेले..
आणि हो बदलेल्या क्रीकेटचे आणि आलेल्या व्यावसायिकतेचे वर्णन एकदम चोकक्कस केलेय.. आवडलं..
सांझगिरीना पाठवा ह्या लेखमालेची एक कॉपी :) आणि असच खूप छान लिहीत राहायला शुभेच्छा..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
अजून लिहित राहा.....!
>>आपण सकाळी पेपर उघडताना मागल्या पानापासून सुरू करणारी लोकं.
खरंय...! म्याच पाहिल्यावर आणि विशेषतः जिंकल्यावर मागचं पान कधी वाचेन आणि कधी नाही असे व्हायचे. हरल्यावर मात्र ते पान वाचायचं जीवावर यायचं, तरिही कशामुळे हरलो. वगैरे उत्कंठा तीच असायची.
बाकी लेखात कितीतरी आवडत्या गोष्टी असल्याने काय-काय आवडले ते सांगायला लागलो तर आपलाच लेख दुसर्यांदा लिहिल्या जाईल. खूप चांगल्या आठवणी आणि खूप आनंद देणारं लेखन. अजून लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
मस्तच...
मस्त
>>>आवडली
मस्त मस्त!!
अँब्रोज
लिहित रहा....
हा भागही आवडला
धन्यवाद
क्लास..
लिहीत राहा!
म हा न ! ! !
नका बंद करु ही लेखमाला ......
समालोचक!
वा वा
नेहमीप्रम
पुढे लिहीत
खूप्प आवडलं..
केवळ सुरेख.........!