Skip to main content

हार्दिक निमंत्रण !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 17/12/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा परिवार , नमस्कार ! वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात. याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे. हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. . आपली उपस्थिती प्रार्थनीय आपला, चंद्रशेखर केशव गोखले.
लेखनविषय:

वाचने 10434
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन आणि शुभेच्छा! तुमच्याकडून आधीप्रमाणेच सुंदर आणि आशयघन कविता वाचायला मिळू देत. अदिती

अभिनंदन आणि शुभेच्छा! अजूनही कविता येथे येत राहूंदेत.... :-) विकास -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

अभिनंदन आणि शुभेच्छा! अजूनही कविता येथे येत राहूंदेत विकास सारखेच म्हणते, स्वाती

साध्या माणसाचे अभिनंदन. अजुन जास्त पुस्तके/ कवितासंग्रह प्रकाशित होवो या सुभेच्छा. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अरे वा! महाराष्ट्राला आणखी एक केशवसुत लाभलेले दिसतात. अभिनंदन आणि शुभेच्छा..!

जमल्यास हजर राहण्याचा नक्की प्रयत्न करेन. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

चंद्रशेखर केशव गोखले ह्या मिपाकराचा 'साधा माणूस' हा कवितासंग्रह आज प्रसिद्ध संगीतकार श्री. यशवंत देव ह्यांच्या हस्ते प्रकाशित झाला. ह्या समारंभाला मी आणि रामदास उपस्थित होतो. चंद्रशेखर गोखले आपले मनोगत व्यक्त करताना. ह्या कवितासंग्रहाला कविवर्य शंकर वैद्य ह्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत . ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

अभिनंदन आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा. सकाळ मध्ये पुढील बातमी वाचली - कवी चंद्रशेखर केशव गोखले यांच्या "साधा माणूस' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देव यांच्या हस्ते गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात झाले. त्याप्रसंगी कविता, गाणी, संगीत विषयावर देव यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. कोकण मराठी साहित्य परिषद गिरगाव शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चंद्रशेखर गोखले यांची कविता हा त्यांचा उद्‌गार असून कवीला जे अनुभव आले, ते त्यांनी प्रांजळपणे मांडले आहेत असे कौतुकही देव यांनी केले. गोखलेंच्या कवितेबद्दल बोलताना कवी अशोक लोटणकर म्हणाले, मूळचा नट आणि उत्कृष्ट निवेदक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोखलेंमधील कलावंत अलगदपणे कवितेच्या प्रांतात आला. आपल्याला आलेली अनुभूती, विसंगती आणि समाजातील दांभिकतेवर गोखले यांनी प्रहार केले आहेत. कवितेततून त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला असून अतिशय तरल असा कवी असल्याचे लोटणकर यांनी सांगितले. http://72.78.249.125/esakal/20100116/5169555546189007962.htm जय महाराष्ट्र , जय मराठी !