Skip to main content

वाढदिवस -२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/12/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा छायाताईंचा वाढदिवस आणि ढवळ्यापवळ्या चे 'वाढ'-दाढ दिवस हे रोजचेच बघणे ,बघण्यात वेळ गेला मागून हर मुलीच्या पळण्यात वेळ गेला कटल्या किती तरी पण ,पटल्या किती तरी ही पटल्या चुकून त्यांना जपण्यात वेळ गेला जमवून धाडसाने संवाद साधताना गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला नुसताच वाढला तू एरंड वाढल्यागत "केश्या" तुला अरे हे कळण्यात वेळ गेला
लेखनविषय:

वाचने 2390
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) निशब्द ! ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला हे एकदम खास. एकूण विडंबन मस्तच!

In reply to by प्रमोद देव

पण बाकी विडंबन मस्त! हे काही कळले नाही; पण बाकी प्रतिक्रिया मस्त! -चुकभुल देव घेव

>जमवून धाडसाने संवाद साधताना गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला हे बाकी सट्याक *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला म्हणजे तुमचीही आता 'मामा बनून भाचे मी खेळवीन म्हणतो' ची वेळ झाली म्हणायची! ;) (एरंड)चतुरंग

उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला हीहीही. भारीच. बाकी कधीतरी आपणही 'पवळ्या' म्हणून का होइना प्ररणादायी ;) ठरलो असल्याची भावना सुखावून गेली.;) रेवती

तुह्या नावातुन कान्हा टपकुन राहिला ना बे, आनि त्वा असी भाषा करताव, मंग मायला आमी कह्याकडे बगावं? भावना बाकी छान पोचल्या, कृष्णाचे परमभक्त... आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..