✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खरी कमाई....

भ
भानस यांनी
Wed, 12/16/2009 - 02:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4924 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

भाग्यवान !!!

अडाणि
Wed, 12/16/2009 - 03:01 नवीन
भग्यवान आहात... तुमचा हेवा वाटतो एवढेच म्हणेन... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

अडाणि

रेवती
Wed, 12/16/2009 - 04:34 नवीन
अडाणि यांच्याशी सहमत! अगदी भाग्यवान आहात तेवढ्याच सहृदय व कृतज्ञही......सगळ्यांची आठवण येते आहे म्हणजे त्या व्यक्तीही भाग्यवान आहेत असंच म्हणायला हवं. नाहीतर आजकाल कोण कुणाला मदत करून गेलं किंवा नाही याचंही भान नसतं. साधी कृतज्ञताही व्यक्त करताना दिसत नाहीत लोक! असं वाटतं की कोरड्या थ्यॅंक्यू व सॉरी यांना खरोखरच काही अर्थ उरलाय का? रेवती
  • Log in or register to post comments

छान लिहिलं

प्राजु
Wed, 12/16/2009 - 06:02 नवीन
छान लिहिलं आहेस. अशा माणसांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक अतिशय चांगली पद्धत आहे ही. हे लिहूनच व्यक्त होईल. न जाणो ही माणसे जगाच्या पाठीवर कुठे असतील. त्यांच्यापैकी एखाद्याने जरी हा लेख वाचला तरी बरं होईल असं वाटतं. - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

अनुभव कथन

मदनबाण
Wed, 12/16/2009 - 07:18 नवीन
अनुभव कथन आवडले... माणुसकी असणारी माणसं हल्ली दुर्लभ झाली आहेत... मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia
  • Log in or register to post comments

मस्त अनुभव

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 12/16/2009 - 09:58 नवीन
मस्त अनुभव कथन करणारा लेख खुप आवडला ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

उत्तम लेखन

प्रकाश घाटपांडे
Wed, 12/16/2009 - 10:11 नवीन
आपला माणसांकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. संवादातुन आपुलकी दृढ करण्याचा प्रयत्न चांगला वाटावा असाच आहे. आपल्याला विक्षिप्त माणसे देखील भेटली असतीलच ना त्यावरही लिहा एकदा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

+१

सहज
Wed, 12/16/2009 - 10:26 नवीन
हेच म्हणतो. आपण छान लिहता व तुम्हाला भेटलेल्या विक्षीप्त माणसांबद्दलही लिहा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

असेच काहीसे

अक्षय पुर्णपात्रे
Wed, 12/16/2009 - 10:54 नवीन
आपण छान लिहता व तुम्हाला भेटलेल्या विक्षीप्त विकृत माणसां/स्त्रियांबद्दलही (विशेषतः वयस्क व (निवृत्त (अनुभवांनी समृद्ध होऊन अथवा एकूणातच थकल्यामूळे (हा परिपक्वतेचा भविष्याआधीच (immaturely) गारद होण्याचा किंवा अपरिपक्वतेतून वर्तमानाच्या अपरिपक्व आकलनाचा परिपाक असू शकेल) )) लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सुरेख

पर्नल नेने मराठे
Wed, 12/16/2009 - 10:32 नवीन
सुरेख लिहिले आहेत..... चुचु
  • Log in or register to post comments

नेहमीप्रम

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 12/16/2009 - 13:06 नवीन
नेहमीप्रमाणेच उ त्त म लिहीले आहेस.
  • Log in or register to post comments

सुरेख

दशानन
Wed, 12/16/2009 - 13:23 नवीन
सुरेख लिहले आहे. जिवनाच्या वाट्यावर किती तरी अशी अनामिक नाती जुळून जातात व आपल्या ह्दयाचा कुठला तरी कोपरा व्यापून राहातात. अश्याच काही हरवलेल्या नात्यांची मला तुमचा लेख वाचून आठवण झाली. ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
Wed, 12/16/2009 - 15:03 नवीन
सुरेख लिहले आहेस.
  • Log in or register to post comments

सुरेख

स्वाती२
Wed, 12/16/2009 - 17:08 नवीन
सुरेख लिहिलयं.
  • Log in or register to post comments

प्रसंग

मीनल
Wed, 12/16/2009 - 19:17 नवीन
प्रत्येक प्रसंग डोळयासमोर उभे केलेस.शेवटी पाणी आले डोळ्यात! माझ म्हणण्यापेक्षा माझा विश्वास आहे की अशी चांगली ( अनकंडिशनली लव्हिंग)माणस भेटण आपल सदभाग्य. आपल्याकडून काही ही नको असताना आपल्यासाठी काही करणारे आई वडिलांव्यतिरिक्त फारच थोडे असतात. तूही त्यांच कधी तरी या जन्मी /मागल्या जन्मी केल असशील त्याची ते परत फेड करत असतील जाणते /अजाणे पणी. अस एकल आहे की आपल सर्व काही या जन्मी चुकत कराव लागते. ते चांगल असो अथवा वाईट. मीनल.
  • Log in or register to post comments

मीनल ताइंशी १००% सहमत

jaypal
Wed, 12/16/2009 - 21:22 नवीन
खरी कमाई खुप आवडली. (सहसा, आपण जस वागु तसा आप्ल्याला ईतरांकडुन अनुभव येतो.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

खर तर

chipatakhdumdum
Wed, 12/16/2009 - 21:25 नवीन
खर तर आपल्या आसपासची माणस खरच चांगली असतात, (एखादा अपवाद वगळला तर), आपण उगीचच त्यांच्या सामान्य वागण्याचे त्यांचा स्वार्थ असेल असा अर्थ लावतो. तुम्ही नशिबवान आहात. साध्या माणसांचे साधे सरळ सोपे अर्थ लावता. साहाजिकच तुमच्या प्रतिक्रिया सुध्दा सरळ सोप्या प्रेमाच्या होतात. दुर्योधनाला,चांगला माणूस शोधायला, आणि धर्माला, वाईट माणूस शोधायला, सांगितल.. , दोघेही हरले.
  • Log in or register to post comments

भाग्यवान आहात!

चतुरंग
Wed, 12/16/2009 - 22:19 नवीन
खरे तर आपण सगळेच तसे भाग्यवान असतो पण आपण तसे आहोत हे बर्‍याचदा उशिरा समजते किंवा कधीकधी आपण ते विसरुन जातो! तुमचे अनुभव माझ्या मनातल्या माणसांना उजाळा देऊन गेले. चौथीत होतो. सूर्यवंशी सर आमच्या वर्गावर होते. पावसाळ्याचे दिवस, बेदम पाऊस सुरु होता. मधली सुट्टी झाली, मी दप्तरात हात घातला आणि समजले की डबा घरीच विसरलाय. कडकडून भूक लागलेली, इतकी की हातपाय थरथरायला लागले, डोळ्यात पाणी आले. आसपासच्या दोस्तांचे डबे शेअर केले तरी त्या वयात पुरत नाही. सरांच्या लक्षात आले. चल म्हणाले. मुसळधार पावसात त्यांच्या छत्रीतून शेजारी चितळे रोडवर 'जगदीश भुवन' मध्ये नेले. दोन प्लेट बटाटेवडे आणि स्पेशल चहा ऑर्डर केला. आग्रह करकरून पोटभर वडे खायला लावले आणि वर चहा पाजला! त्या दिवशी ते गरमागरम बटाटेवडे मला जसे लागले तसे पुन्हा कधीही मी खाल्लेले नाहीत. सूर्यवंशी सरांना चौथीनंतर मी कधी बघितलं नाही पण आजही पाऊस आणि बटाटेवडे असं काँबिनेशन झालं की हटकून त्यांची आठवण येते आणि ते जिथे असतील तिथे सुखात असोत अशी प्रार्थना करतं मन! चतुरंग
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

भानस
गुरुवार, 12/17/2009 - 01:47 नवीन
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.:) मीनल अशी माणसे सहवासात येत असतात गं. दोन गच्च भरलेल्या पिशव्या घेऊन बसमध्ये चढल्यावर कोणीतरी उठून जागा देणे किंवा हातातली पिशवी घेणे ( मग त्यावेळी जर कोणी म्हणाले की नुसती पिशवीच काय घेतोस्/घेतेस, मला बसायला मात्र दिले नाही .... हे असे वाटले की त्या व्यक्तिने दाखवलेला चांगुलपणा फुकट गेला. तुम्हीं त्याला क्रेडीट दिले नाहीच पण स्वत:चे हलके झालेले ओझेही पाहिले नाहीत.) ह्या रोजच्या घटनेत त्या व्यक्तिला आपल्याकडून काय हवे असणार.:) चतुरंग म्हणतात तसेच मीही म्हणते आपण सगळेच तसे भाग्यवान असतो फक्त अनेकदा साध्या साध्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत - लक्षात येत नाहीत. आणि या रोजच घडत असतात. कदाचित आपण आपल्या ( त्या त्या वेळी असणार्‍या ) मोठ्या प्रॉब्लेम्समध्ये इतके व्यग्र असतो किंवा काहीवेळा आपण माणसांना गृहित धरतो. chipatakhdumdum म्हणतात तसे बरेचदा समोरचा माझ्याशी का बरे चांगला वागतोय? त्याचा काय हेतू/स्वार्थ असेल यात.... हा संशय मनात धरून आपण अगदी क्षुल्लक गोष्टींचाही ताप करून् घेतो. कशाला ते? स्वतःला संधी द्यायला काय हरकत आहे? प्रकाश घाटपांडे, आहेत आहेत काही विक्षिप्त अनुभवही आहेतच.( असणारच ना:) )त्या त्या वेळी रागही आलाय... दु:खही झाले, अगदी हताश व्हायलाही झाले. कधी कधी हसून पुरेवाटही झाली. लिहीन कधीतरी. अक्षय पुर्णपात्रे, विकृत माणसे मला तरी भेटली नाहीत. हा...सामाजिक विकृतीबद्दल मी बोलत नाहीये.तिचा ताप असतोच. :( बाकी विक्षिप्त माणसे-अडेलतट्टू माणसे नक्कीच भेटलीत.:)
  • Log in or register to post comments

छान

पाषाणभेद
गुरुवार, 12/17/2009 - 05:12 नवीन
छान लेख. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
  • Log in or register to post comments

खुप छान

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/17/2009 - 10:24 नवीन
खुप छान लिहीले आहेत, डोळ्यात पाणी उभे राहीले वाचताना. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना की तुम्हाला कायम अशीच चांगली माणसे भेटोत. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

खुप छान!

भिंगरि
गुरुवार, 12/17/2009 - 12:42 नवीन
आता रात्रि झोपण्यापुर्वि वाचतेय हा लेख उद्याचा दिवस एकदम मस्त जाणार. तुमच्या सारखाच जगण्यावर आणि माणसांवर प्रेम करण्याचा छंद जडो हि त्या जगन्नियंत्याकडे प्रार्थना. ता. क. मी तुमचे लिखाण नेहमि वाचते, खुप छान लिहिता तुम्हि, नेहमि प्रतिक्रिया नाहि दिल्यागेलि (कारण दरवेळेला तेच तेच कस लिहायच ह प्रश्न पडतो) तरि मी तुमचि पंखि आहे.
  • Log in or register to post comments

भाग्यवान

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 12/17/2009 - 15:50 नवीन
भाग्यवान आहात ... binarybandya™
  • Log in or register to post comments

उत्तम

विमुक्त
गुरुवार, 12/17/2009 - 16:25 नवीन
उत्तम लिहिलं आहे...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा