Skip to main content

कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे,

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे, वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, मुरलीची तान , ऐकू येता जाई भान, सुटे कामधाम, घेते तुझ्याकडे धाव रे , तुझ्या वेणु नादामधे जीव धुंद होतो रे कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, रोज खेळू रास, हाच लागे ध्यास, तुझे नाम होई श्वास, उरे हाच एक छंद रे, तुझ्या पायी सोडिले मी, उभे घरदार रे , कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, नुरे द्वैताचे भान, होते सारी एकतान, लागे कृष्ण ध्यान, कृष्णमयी होते रे , सारीकडे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण बघते रे, कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, सागर लहरी - १५/११/२००९
लेखनविषय:

वाचने 1345
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कविता आवडली. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

खुप आवडली कविता. विशेषतः "रोज खेळू रास, हाच लागे ध्यास, तुझे नाम होई श्वास, उरे हाच एक छंद रे," सुंदरच

कौतुका बद्दल आभारी आहे.