सुधीरराव तुमचे दोन्हीही किस्से मस्तच आहेत.
आता माझा एक किस्सा सांगतो.
आमचा एक मद्रासी साहेब(मसा) नेहमी बोलताना "आय से" हे पालूपद लावत असे. उदा. कम आय से! गो आय से! वगैरे.
आमचा एक सहकारी टन्ना आडनावाचा गुजराथी होता. शिवराळ तोंडाचा आणि एक नंबरचा कामचोर माणूस होता.
ह्या टन्नावर मसा दात ठेवून होता. नेहमी त्याला त्याच्या खास आवाजात "ट्यन्नाऽऽऽऽऽ" असे म्हणून टोकायचा आणि टन्ना मग त्याला त्याच्या पाठी भरपूर शिव्या घालायचा. असे अहिनकुलाचे नाते होते त्या दोघांचे.
एकदा एका वर्षी एक एप्रिलला मी टन्नाची गंमत करायचे ठरवले. आधी इतर सहकार्यांशी संगनमत करून मी कार्यालयातल्या एका खोलीतून टन्नाला इंटरकॉमवर "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से" असे जोरात सांगून पुढे काय होतेय हे पाहायला मित्रांच्यात सामील झालो.
टन्ना कावरा बावरा होऊन उठला. उठता उठता म्हणाला, "क्या ये मसा पागल है क्या? साला मेरेको बुलाता है! अभी क्या लफडा होनेवाला मालूम नही! लेकिन क्या करे? वक्त आनेपे गधेके सामनेभी झुकना पडता है!" आणि गेला साहेबाकडे.
पाच मिनिटातच पडलेल्या चेहर्याने आणि अक्षरश: धुसफुसत आला . मी साळसूदपणे विचारले, "टन्ना! क्या हुवा?"
"वो साला सुवरका बच्चा मुझे बोलता है की मैने कब बुलाया? इसने नही तो क्या इसके बापने बुलाया? साला लगता है पागल कुत्तेने काटा होगा गधेको!"
इतके बोलून आपल्या जागेवर जाण्यासाठी त्याची पाठ वळली आणि मी ओरडलो, "ट्यन्नाऽऽऽऽऽ कम आय से!"
टन्नाने घाबरून मागे पाहिले तेव्हा आम्ही सगळे खळखळून हसत होतो....
हे पाहिले मात्र , आपली फजिती ह्याच लोकांनी केलेय हे त्याच्या लक्षात आले. आणि मग टन्नाने अशा काही शिव्या दिल्यात की काही विचारू नका. आम्ही त्या ऐकून अजूनच चेकाळलो.
प्रतिक्रिया
मस्त!
:)
मस्तच
सर्व .........
आवडले..