Skip to main content

बुधवारची कविता : (खवट)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 10/12/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो. आमची प्रेरणा ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता सोबत होते तिची नि माझी पेग काही जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता चुकून जुळती कधीमधी मते आपली आठवही त्याचा न उरावा.. पिता पिता वाढे प्रसिद्धी प्रतिसादे, सहमत म्हणती चालकांचीही पोच मिळावी .. पिता पिता क्षुब्ध प्रतिसाद ना मला कळले क्षणभर बुधवारीची कविता उतर .. पिता पिता -सदर कविता एका गाण्यार्‍या मित्राला समर्पित
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3113
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

यावे... यावे... मित्र परिचयाचा वाटतोय!!!

>>त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. या वेळेस दिलगीरी अ‍ॅक्सेप्टेड. पुढच्या वेळेस खपवुन घेतले जाणार नाही. आधी सवय लवुन दिलित.. आता डोस (आणि उतारे) वेळच्या वेळी मिळाले नाहीत तर त्याचा आमच्या प्रकृतीवर परिणाम होतो ;) -माझी खादाडी.

नादलेस कविता --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

नाय रे जमलं ह्या वेळी...पाणी अंमळ जास्त झालंय! :( पुपेशु. चतुरंग

In reply to by चतुरंग

बुधवारी टाईम नसल्याने आधीच पाडून, पाणी घालून ठेवलं. त्यामुळं अंमळ तेवलं आहे. त्यामुळे *ले अंमळ सुटल्याने बेढब दिसणार्‍याप्रमाणे झाले आहे हे आम्हास मान्य आहे. असो, बदलीन.. :) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

बुधवारीच कविता का टाकली बरे? बुधवारचं काय महत्त्व आहे? असो. विडंबन ठीकठाक.

In reply to by आकडा

बुधवाराचं महत्व अगाध आहे महाराजा, विचारता काय नुसते, अंमलबजावणी करा एकदा मग समजेल. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता आलो भानावर ऐकता ; पिता .. पिता.. घरी चला लवकर ; चवताळली ..माता माता

वाढे प्रसिद्धी प्रतिसादे, सहमत म्हणती चालकांचीही पोच मिळावी .. पिता पिता
-- क्या बात है! एकूणात कविता आणि प्रतिसाद ख आणि व आणि ट :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


पुपे भिकारचोट आहे. त्याच्या इमोसनल अत्याचारामुळे अनेक वृद्ध बालके त्रस्त झाली असल्याचे आमचा जीमेलवरचा वार्ताहर कळवतो. असो. जास्त माहिती अवांतर ठरेल. आणि हो, कविता छानच आहे हे लिहायचे विसरलोच होतो.. असो, सुधरीन. --अवलिया

In reply to by अवलिया

सहमत आहे. अतिशय खवट व कुचकट विडंबन अप्रतिमच. मी आपणाला सांगु इच्चितो की आम्ही येथे आम्ची बुद्धी दाखवायला वा आम्ही जगावेगळे दाखवायला तसे लिहिलेले नाही पण मला नेहमीचे अवैचारिक ,विदंबन असे लेख आवडत नाहीत महत्वाचे म्हणजे आम्हाला आमच्या असंख्य मित्रांसारखे पहिल्यादीवशी दुसर्याचे लेख वगिअरे बघावासा वाटत नाही त्या संदर्भात हे लिहिले होते असो बदलीन ©º°¨¨°º© परायक खाचलग ©º°¨¨°º© आमचे राज्य

ह्हा ह्हा ह्हा !! मस्त रे फेशव्या ... बाकी खवट नावाला जागलीये कविता. असो बाकरीन .. --(आद्य हिजडा) :B :B :B खवटवडी :B :B :B

peshve PITA PITA kavita tumhi farch chan lihili aahe ho. aavdli amhaa pita pita

पेशवे विडंबन आवडलं. (मुद्दामच प्रतिसाद दिला, म्हणजे आमच्या उतार्‍यालाही एक जादा प्रतिसाद मिळेल.) ;-) अदिती

कवितेस 'पास वो आने लगे जरा जरा' या गाण्याची चाल व्यवस्थित बसते (अंगासरशी). आम्हीसुद्धा (आदरार्थी एकवचनी) बुधवार करतो आणि बुधवार केल्यावर गाण्यातल्यासारखे नाचतो. नाचताना मात्र आम्ही दोघे नाचत आहोत असे वाटत असते. असो. तर कविता आवडली.

बदलीन!