नवीनच माहिती समजली ...
धन्यवाद ..
मला एक प्रश्न नेहमी पडतो की साइन बोर्ड वगैरे नसताना वैमानिक विमान कसे चालवतात ? त्यांना "रस्ता" कसा सापडतो ?अक्षांश्/रेखांश इ. चा उपयोग करून का ?
महत्वाचे म्हणजे, एखाद्या रडारच्या क्षेत्रात एकावेळी शेकडो विमानं ऊडत असतांना येणारा संदेश व पाठवायचा संदेश अचूक विमानाकडेच जायला हवा हे ही संगणक सांभाळतो. व त्याचसाठी अशा प्रगत संदेश देवाण-घेवाणीचा वापर आवश्यक ठरतो.
श्री भागवत, चांगली माहिती. एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि वैमानिक यांच्यात काटेकोर संवाद असणे गरजेचे आहे. माल्कम ग्लॅडवेल यांच्या 'आउटलायर' या पुस्तकात यासंदर्भात एक प्रकरण आहे. काही देशातील (पुस्तकात कोरिया आणि कोलंबिया याबाबत चर्चा आहे.) एयरलाइन्समध्ये काही काळ अपघाताचे प्रमाण जास्त का आढळते, याची सांस्कृतिक कारणे या प्रकरणात स्पष्ट केली आहेत. वैमानिकांतील (पायलट व को-पायलट) आपापसातील संवाद हा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी होणार्या संवादावर परिणाम करतो. न्युयॉर्क शहरातील एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स हे तुलनेने थोडेसे उद्धट वाटतात (मोठ्या प्रमाणावरील विमानांची येजा वगैरेंमुळे थोडीफार दांडगाई दाखवतात) व त्यामुळे काही पायलट्स बुजून जाऊन घडणार्या चुका यांचे अतिशय वाचनीय वर्णन या पुस्तकात आहे. आउटलायरचा मूख्य विषय मात्र समाजात काही लोक सामान्यांपेक्षा वेगळे का आढळतात याविषयी असून अत्यंत वाचनीय आहे. (परीक्षण)
अक्षय, ग्लॅडवेलचा मी निस्सीम भक्त आहे. हे पुस्तक मात्र खूप वेळा घ्यावेसे वाटले पण हातातील इतर पुस्तके वाचल्याशिवाय एकही नवे पुस्तक घ्यायचे नाही असा कमकुवत निश्चय केला होता; तो आज मोडावा लागणार. वाचेन!
युनायटेड एअरलाईन ने प्रवास करताना चनेल ९ वर ATC चे संभाषण ऐकता येते.
Atlanta ATC च्या Live feed साठी ATCMonitor.com ही वेबसाईट बघा. संभाषण ऐकून गम्मत वाटेल.
युनायटेड एअरलाईन ने प्रवास करताना चनेल ९ वर ATC चे संभाषण ऐकता येते.
Atlanta ATC च्या Live feed साठी ATCMonitor.com ही वेबसाईट बघा. संभाषण ऐकून गम्मत वाटेल.
तीनेक वर्षांपुर्वी ते स्पेक वाचल्यामुळे जरा त्रोटक माहिती लक्षात होती. काल लेख लिहायला घेतला तेव्हा फार पटपट आठवत नव्हते. व जे आठवत होते ते "कॉन्फिडेन्शियल" किंवा दुसरे खूपच तांत्रिक होते म्हणून त्यातल्यात्यात लेखासाठी माहिती जी योग्य वाटली ती लिहिली.
कालपासून जयपाल, आदिती, टूकुल, चतुरंग, अभिज्ञ ह्यांच्या प्रतिसादामुळे डोळ्यातील कुसळ दिसले. लेख लिहिल्यापासून धूळ बसलेली माहिती, विस्मरणात गेलेली नव्हती तर सर्च इंजनला पटकन सापडत नव्हती हे लक्षात आले. त्या नव्या माहितीतून आणखी एक-दोन लेख (माऊस दोनदा स्क्रोल करावा लागेल एव्हढ्या उंचीचे) होतील ते यथावकाश लिहिन. आभारी आहे.
उदय, दुवा खूप मस्त आहे! :-)
अजुन येउ दे!
>संगणक नव्हते तेव्हा हे काम कसे चालायचे
यावरुन असेच अवांतर आठवले, जगातील पहिले टेलेफोन बुक / डिरेक्टरी १८७८ मधे न्यु हेवन डिस्ट्रीक्ट टेलेफोन कंपनीने काढली. एक पानी होती व ५० नावे होती (व त्याकाळी ऑपरेटर सर्व फोन जुळवून देत असल्याने) कोणाचे फोन नंबर त्यात नव्हते. टेलेफोन नंबर नसलेली टेलेफोन डिरेक्टरी :-) तरीच फार जुने इंग्लीश सिनेमे बघताना कधी संवाद ऐकला असेल, कोणीतरी फोन उचलतो व म्हणतो "ऑपरेटर कनेक्ट मी टू ..."
माहिती आहे. हे वाचताना दोन ओळीतच डोळ्यासमोर ' Ground Control ' हा Kiefer Sutherland चा लिडींग रोल असलेला वैमानिक व ग्राऊंड कंट्रोल टॉवर यांच्यातील अंत्यत महत्वाच्या देवाणघेवाणीवर आधारलेला चित्रपट आला. नो रडार. नो कॉन्टॅक्ट. नो कंट्रोल.( आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट ) लेख चांगला आहे. अर्थात विषयाचा आवाका प्रचंड असल्याने अजून लिहावे.:)
मला डिसकव्हरीवर या विषयावरची माहीती आठवली.
ATC चे लोकं, प्रत्येक विमानासाठी एक फिजीकल खेळण्यातले विमान एका टेबलावर अजूनही (संगणकीय) काळात वापरतात व तेच विश्चासार्ह आहे असे त्यांचे मत आहे.
वर विचारल्याप्रमाणे संगणक नव्हते तेव्हा हे काम कसे चालायचे हे पहाणे उत्सूकतेचे ठरेल.
अवांतर: धमाल मध्ये ATC चा सिन धमाल झाला आहे. माझा मुलगा ते पाहून गडबडा लोळतो.
त्या ऑफीसरचे नाव काय?
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी
भागवत-जी,
सुंदर लेख. वाचतांना कांहीं जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
पहिली होती दिल्लीपासून अगदी जवळ झालेली कझाकस्तान व सौदी अरेबियांच्या जंबोंची टक्कर. कदाचित् प्राणहानीनुसार जगातला सर्वात भीषण अपघात. केवळ इंग्रजी भाषेच्या गोंधळामुळे झाला होता असेही आठवते.
Airport या Arthur Haily लिखित पुस्तकातही याची खूप छान माहिती वाचायला मिळते. जेंव्हां एकादे विमान अडचणीत असते त्यावेळी या ATC operators ना मनाचा तोल बिघडवू न देता, न चिडता वैमानिकांना कसे मार्गदर्शन करायचे, असंबद्ध प्रश्न कसे टाळायचे याचे प्रशिक्षण दिलेले असते असाही उल्लेख आहे व अशी दृष्ये मी कांहीं चित्रपटात पाहिलीही आहेत.
इथे 'वॉशिंग्टन डीसी'च्या IAD या विमानतळाला जायच्या रस्त्यावर एक या विषयावरचे वस्तुसंग्रहालय/प्रदर्शनही आहे जे आमच्या मुलाने आम्हाला दाखविले होते. तेही फारच छान आहे. श्री मुक्तसुनीत व श्री धनंजय यांनी कदाचित् पाहिलेही असेल.
भागवतसाहेब, लेखाचे असे आगळे विषय निवडण्याची तुमची हातोटी कौतुकास पात्र आहे.
जय हो!
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
प्रतिक्रिया
काय राव ?
हेच
धन्यवाद ...
दिवस-रात्र
Airplanes seen from space
Airplanes seen from space satellite - Watch more Funny Videos
महत्वाचे
चांगली माहिती
ग्लॅडवेल
मनोरंजक
अगदी हेच
हेच म्हणतो.
एअर ट्रॅफिक कंट्रोल
एअर ट्रॅफिक कंट्रोल
हो पण
तीनेक
चांगला लेख
चांगली..
एका
आवडला !
मला
वेगळा विषय..
एक वेगळ्या
जाणकार लोक माहिती द्या
संग्राम,
धन्यवाद
जुन्या आठवणी