Skip to main content

आज अचानक लाथ पडे ...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 31/03/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना आज अचानक गाठ पडे... आज अचानक लाथ पडे नयन वळविता सहज कुठेतरि दिसले अंतरपट उघडे असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे अयत्या वेळी अयत्या मेळी घडले हे भलतेच गडे दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे
लेखनविषय:

वाचने 8499
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे तद माताय! केश्या तु म्हणजे 'हम नही सुधरेंगे' आहेस.... हा हा हा!!!! १ नंबर झालयं विडंबन!!!! (केशाचा पंखा) टिंग्या ;)

असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
:)
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे
:))
निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे
:)))
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे
हा हा हा हा :))))))))))))))))) लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशा, अंतरपटाचा ह्या सोझ्ज्वळ स्थळावर इतका स्पष्ट उल्लेख ! संपलास तू आता ! बाकी, विडंबन झक्कास ! - सर्किट

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे :))))))) भारी विडंबन

अहो 'केशवसुमार' म्हणताम्हणता एकदम 'केशवदेमार' झालंय की विडंबन!;)) आवडलं पण! (अवांतर - तसं देवादिकांचं गाणं नाहीये ना म्हणून प्रतिक्रीया तरी देता आली, नाहीतर लगेच बोंबाबोंब सुरुच झाली असती टेहळणी करुन सिलेक्टिव्ह प्रतिक्रीया देणार्‍यांची!:) चतुरंग

ह्यावरून आठवले, प्रसंग असा: खूप घाईची लागली आहे.. पण पायजाम्याच्या नाडीची गाठ काही केल्या सुटत नाही... "आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी, भलतीचकडे"... - (घाईत) सर्किट

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे या ओळी आवडल्या... :)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

विडंबन सहीच रे केशवा! :) अजूनही येऊ द्या.. तात्या.

विडंबन अजिबात आवडले नाही. अगदी इन्स्टन्ट प्रतिक्रिया 'बकवास' अशी होती. विषय वगैरे बाजूला ठवा; पण शब्दयोजनाही ओढूनताणून, एखादाच शब्द इकडेतिकडे करून/बदलून जुळवाजुळव केल्यासारखी झालीये. तुमच्या आधीच्या विडंबनांमध्ये शब्दयोजनेतला चपखलपणा तरी प्रशंसनीय असे. येथे त्याचा अभाव दिसला. असो. चांगल्या विडंबनासाठी शुभेच्छा. प्रा. म. रा. न. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेसनशेठ, आपल्याला आमची सगळीच विडंबने आवडावीत असे नाही. पण कमीत कमी शब्द बदलून / इकडेतिकडे करून विडंबन करण्याची मजा काही औरच असते.. असो.. सपष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (बकवास)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

तुमची सगळीच विडंबने आम्हांला आवडली नाही, तरी धोरणी प्रतिसादांच्या किंवा राजकारणी अंधानुयायी नि चाहत्यांच्या गराड्यात आम्हांला आपली जी विडंबने सर्वार्थाने, मनापासून आवडतात, तेथे आवर्जून पहिला (झालंच तर दुसरा-तिसरा) स्तुतीपर प्रतिसाद टंकतो, त्या विडंबनातले काय विशेषकरून फार आवडले हे लिहितो, हे कदाचित आपल्या नजरेस आले नसावे. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मात्र खरे बेसनशेठ... पण हे आमच्या नजरेस आले नाही असे नाही.. म्हणूनच म्हणालो 'सगळीच विडंबने आवडतील ( म्हणजे काही विडंबने आवडलेली आहेत हे अधोरेखीत होते असे वाटले) असे नाही' असो.. (सपष्टिकरण देणार) केशवसुमार अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)

In reply to by केशवसुमार

अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;) 'त्या' संपादित प्रतिसादाचे कारणच न उरल्याने संपादन केले :) (स्पष्टीकारक)बेसनलाडू

चला, एप्रिलफूल स॑पवून मुल्ला वापस मस्जीद लौटा!!!!! बर॑ वाटल॑ केसुशेठ :-))) आपला, - मस्त'मौला' ध मा ल.

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !! (आभारी) केशवसुमार

@आज अचानक लाथ पडे =))))) 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे =))))) दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे =))))) वारलो..वारलो...रे!!!!!!! =)) केवळ आणि केवळ महान आहे हे!! =))

>>अयत्या
हे वाचून एक अत्रुप्त कवी आठवले.