धन्यवाद चित्रे सर .. सेहवाग आपला लै लै आवडता खेळाडू आहे.
त्याची बॅटिंग पहाणे थ्रीलींग असतं ! द्रविड "लक्षुमन" हे खेळाडू तांत्रिक मांत्रिक खेळाडू दिवसभर आटवतात हे खरं असलं तरी जरा दोन तासांनी पुन्हा येऊन बसलं की ह्यांच्या बॅटिंगमधे काही मिस् केलं असं वाटत नाही :)
लाराचं ४०० धावांचं रेकॉर्ड तोडणारा सेहवाग हा एकमेव खेळाडू मला वाटतो :) तशी अपेक्षा अजित आगरकर कडून पण होती .. पण तो आता इंटरनॅशनल खेळत नाहीये =))
- टारेंद्र सहावाघ
ह्या जोडगोळीला सलामीला येऊन दिवसभर बॅटिंग(!) करताना पाहिले आहेस का टार्या? नसेल तर जरूर पहा ;)
द्रविड आणि लक्ष्मण म्हणजे 'रन मशीन्स' वाटायला लागतील :)
----------
>> लाराचं ४०० धावांचं रेकॉर्ड तोडणारा सेहवाग हा एकमेव खेळाडू मला वाटतो
एग्जॅक्टली :)
द्रविड आणि लक्ष्मण म्हणजे 'रन मशीन्स' वाटायला लागतील
ही गोष्ट मी नाकारत नाहीच्चे !! हे दोन्ही खेळाडू महान आहेत. वाष्ष्ट्रेलियाच्या नाकात काड्या घालून इरिटेट करतात त्यांना :)
मी फक्त इतकंच म्हणालो की २ तास जर बाहेर जाऊन आलो आणि ह्यांनी जर भरपुर रन्स काढल्या तरी फार मिस् केल्यासारखं वाटत नाही, जे सेहवाग च्या बाबतीत वाटतं :)
- लक्षुमन
>> २ तास जर बाहेर जाऊन आलो आणि ह्यांनी जर भरपुर रन्स काढल्या तरी फार मिस् केल्यासारखं वाटत नाही, जे सेहवाग च्या बाबतीत वाटतं
२ तासात तर सेहवाग पूर्ण सामना संपवू शकतो :)
सेगवाग काय भरोशाचा फलंदाज नाही. आडमफट्टा खेळणारा वाटतो. :)
अर्थात खेळतो तेव्हा त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असते. यात शंकाच नाही.
'चली तो चांद तक' असे ते प्रकरण आहे.:)
-दिलीप बिरुटे
कुठलाही खेळ, मग अगदी पत्ते असोत की कुस्ती, युक्तीने खेळायचा असतो. ‘चक दे इंडिया’ आठवा ! जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या अक्कलहुशारीवर कुरघोडी करावी लागते ! द.अफ्रिकेचे खेळाडू म्हणजे पक्के व्यावसायिक पण काल वीरूने ‘चक दे..’तला धडा जणू तोंडपाठ म्हणून दाखवला !!!
मला आपले उगाचच श्रीलंकेशी मॅच चालू आहे असे वाटत होते! ;)
एकेका खेळाडूचा नैसर्गिक बाज असतो त्यात तो खेळला तरच खेळल्यासारखा वाटतो. विवियन रीचर्डसला उगीच चेंडू तटवून खेळताना पाहिलं तर कसं मिळमिळीत वाटेल ना? त्यानं म्हणजे च्युईंगम चावत, बेफिकीरपणे लेगला दृष्टी टाकत, बॉलरकडे "हं टाक रे काय टाकायचंय ते!" असं तुच्छ नजरेनं म्हणून चेंडूला फोडून काढणं हेच योग्य दिसतं!
सेहवागची कालची ट्रिपल हुकली त्याचं मला वाईट वाटलं पण त्यापेक्षा त्याची ती इनिंगच अजिबात बघायला मिळाली नाही ह्याचं जास्त वाईट वाटलं! कसोटी क्रिकेट हे निर्विवाद महत्त्वाचे आहेच. खरा अभिनय जसा रंगभूमीवरुन येतो असं म्हणतात तसं खरं क्रिकेट हे कसोटीतूनच निर्माण होतं बाकी सारे सोप ऑपेरा! ;)
चतुरंग
>> सेहवागची कालची ट्रिपल हुकली त्याचं मला वाईट वाटलं पण त्यापेक्षा त्याची ती इनिंगच अजिबात बघायला मिळाली नाही ह्याचं जास्त वाईट वाटलं!
मी तर आपली दृष्ट लागायला नको म्हणून इंटरनेटवर लाईव्ह कव्हरेजची लिंक मिळाली असूनही दुसर्या दिवशी बराच वेळ स्कोअर बघणंही टाळलं पण तरीही ट्रिपल हुकलीच :(
सेहवाग म्हणालाय की पुन्हा संधी येईल की ... त्यात काय !
लढ बाप्पू !
पुन्हा संधी येईल की ... त्यात काय !
अगदी खरंय...
१९५ वर मेल्बर्नमध्ये लाँगऑन डी प मिडविकेट पट्ट्यात कॅचऔट झाल्यावरही तो असंच बोलला होता. १९५ वर पुन्हा असा बॉल मिळाला तर नक्की मारीन...
वाघाची एक काउंटी क्रिकेटची आठवण वॉर्नने सांगितली आहे. वाघ फलंदाजी करतोय. कोणीतरी पाकिस्तानी रिव्हर्स स्विंगरच्या हातात चेंडू आहे. वाघ त्याच्या साथीदाराला सांगतो, अरे माझ्याकडे या रिव्हर्स स्विंगरला तोंड देण्याचा एक प्लॅन आहे. बरे बुवा. पुढचाच चेंडू स्टेडिअममध्ये ठोकला जातो. साहजिकच नवीन चेंडू आणावा लागतो. रिव्हर्स स्विंगरचा प्रश्न सुटला :)
लई भारी लेख भौ ! बीरूभाय आपल्याल्या आवडतो तो त्याच्या अॅटिट्यूडसाठीच ! अन माणसाचं टेंपरामेंटही भारी आहे. तो असा आहे म्हणूनच तो आहे !!!
पण एक लक्षात आलं का? तेव्हा ऑल हॅरिसला तो शांतपणे खेळला. पण आत्ताच्या कसोटीत त्याचा आत्मविश्वास इतका जबरदस्त होता की त्यानी हेराथ न साक्षात मुरलीला निगेटिव्ह लाईनवर सेटल होऊच दिलं नाही. इनसाईड आऊट शॉट्स असा खेळलाय की ज्याचं नाव ते ! ! ! रिव्हर्स तर लाजवाबच !
तेव्हा तयार रहा.... अजून एक ३०० येऊ घातली आहे ! :)
बाकी लेख झकासच !
प्रतिक्रिया
क्लास ..
छान
धन्यवाद
तशी
जेफ बॉयकॉट आणि क्रिस टॅवरे
द्रविड आणि
हे एकदम बरोबर
सेगवाग काय
'चली तो
हम्म
काय चेष्टा करता का राव?
अरे हो की!!!
छान लिहिलं आहेस रे संदीप!
अगदी अगदी
संधी
छान.
हे हे -
येक नंबर