✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३

ट
टारझन यांनी
गुरुवार, 12/03/2009 - 01:19  ·  लेख
लेख

Book traversal links for माझ्या प्रेमाचे तीन पोपट -३

  • ‹ माझ्या प्रेमाचे तीन पोपट -२
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32501 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

ट्याग बंद

घाटावरचे भट
गुरुवार, 12/03/2009 - 01:35 नवीन
ट्याग बंद केला. पोपट ३ पण भारी...
  • Log in or register to post comments

कॉलेज...

प्रभो
गुरुवार, 12/03/2009 - 01:39 नवीन
कॉलेज... काय दिवस होते ते आपल्या कॉलेजचे टार्‍या......मला तर गानू मॅडमची आठवण आली... एवढी सुंदर मॅडम आणी सिविल शिकवायची..मला आठवतय कॉम्प ला असून थर्ड ईयर पर्यंत आम्ही सिविल चे लेक्चर करायचो ते....उगाच पाणी प्यायला तिसर्‍या मजल्याच्या एका टोकाच्या कॉम्प लॅब पासून दुसर्‍या टोकाच्या तळमजल्यावरील सिविल लॅबला जायचो...लै भारी क्रश होता तो.. आणी दुसरा क्रश होता तुझ्या वर्गातील एम पी वर.... :) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

येस्स मॅन...

टारझन
गुरुवार, 12/03/2009 - 01:48 नवीन
येस्स मॅन... गाणू मॅडम ला कोण विसरेन ? च्यायला ... एम-१ च्या पेपर ला रिकामा होतो .. आणि सुपरव्हिजन ला गाणू मॅम .. पुर्ण तीन तास निरिक्षण चालू होतं .. :) फार म्हणजे फार म्हणजे फार ..... जाऊ दे .. इट्स फार फार अवे नाऊ !! आमचं लेक्चर तो शहापुरे घ्यायचा ... कोण बसायचं नाही त्याच्या लेक्चरला ... एक दिवशी त्याच्या ऐवजी गाणूमॅम लेक्चरला .. तर साला .. आमच्याच काय .. बाकी डिव्हिजनची पोरं पण लेक्चरला ... बसायला जागा नाही !! बाकी ती पी.एम. एकदमंच बाळ होतं रे .. काय तुझे पण क्रश एकेक.. काय क्रश करायचा विचार होता काय बे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

आमच्या अकरावीला इंग्लिशला

चतुरंग
गुरुवार, 12/03/2009 - 04:51 नवीन
एक जबराट मॅडम होत्या! त्या देखण्या नव्हत्या पण फारच आकर्षक होत्या. त्यांच्या पर्सनॅलिटीत एक वेगळीच जादू होती आणि त्यावेळच्या त्या अर्धवट वयात ते सगळंच भारी वाटायचं! मुलं आपल्यावर लाईन मारतात हे त्यांनाही चांगलंच ठाऊक होतं. त्याही नटण्याथटण्यात अजिबात कमी करायच्या नाहीत आणि आम्हीही इंग्लिशचं एकही लेक्चर कधी चुकवायचो नाही! सारख्या शंका विचारुन तास संपणार कसा नाही ह्याचा प्रयत्न असे! ;) (इंग्लिशची आवड असलेला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

टार्‍या....

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 12/03/2009 - 12:23 नवीन
टार्‍या.... काय रे हे तुझ्या वाट्याचे भोग? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

डार्वीन

श्रावण मोडक
गुरुवार, 12/03/2009 - 01:52 नवीन
उत्क्रांतीवादावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी या लेखमालेचे वाचन करावे! काय, टारू बरोबर का?
  • Log in or register to post comments

वा छान

पाषाणभेद
गुरुवार, 12/03/2009 - 02:35 नवीन
वा छान लेखन. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

कॉलेजचे दिवस

संदीप चित्रे
गुरुवार, 12/03/2009 - 04:10 नवीन
इथून तिथून थोडेफार सारखेच :) 'दि मोअर यू राईट पर्सनल; दि मोअर इट बिकम्स युनिवर्सल' हेच खरं ('व.पु' झिंदाबाद !!)
  • Log in or register to post comments

+ १ अगदी अगदी हेच म्हणतो!!

चतुरंग
गुरुवार, 12/03/2009 - 04:46 नवीन
आमचे हॉस्टेलचे दिवस आठवायला भाग पाडलेस रे बाबा!! एकेक लफडी आणि ती निस्तरताना झालेल्या गोच्या!! ;) (जूना अने जाणीता)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

एकेक लफडी

शेखर
गुरुवार, 12/03/2009 - 07:36 नवीन
एकेक लफडी आणि ती निस्तरताना झालेल्या गोच्या!! येऊ द्या ना एखादी फक्कडसी लेख मालिका त्या लफड्यांवर आणी गोच्यांवर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१ - लई भारी

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 12/03/2009 - 11:11 नवीन
कॉलेज डेज ची आठवण करून दिलीस रे बाबा. त्यातून आम्ही तर म्याक्निकलची पोरं... मग काय विचारता? जगातला फालतुपणा केलाय... मित्रांची आणि पोरींना ठेवलेली नावं सुद्धा किती सारखी आहेत ! तुझ्या तिन्ही लेखांमधला हा सर्वांत जास्त आवडला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

आवरा ह्याला...

हर्षद आनंदी
गुरुवार, 12/03/2009 - 06:33 नवीन
GUI एवढा खास नसला तरी Backend/Database तगडा आहे यार. एकदम ऑरॅकलंच! =)) =)) =)) कोणी वजनदार पोरगी दिसली की, "ए बघ रे .. तुझी मेनफ्रेम आली". =)) =)) =)) =)) कोणी गावभवानी पोरगी, जी कोणत्याही कार्ट्याबरोबर फिरताना दिसे तीला USB नाव ठेवण्यात यायचं. "अर्रे वो तो USB है.. Plug & Play. उसके पिछे मत भाग .. कोई फायदा नही" =)) =)) =)) =)) =)) =)) टार्‍या सुसाट सुटलाय.. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
  • Log in or register to post comments

हा कसला

रेवती
गुरुवार, 12/03/2009 - 06:59 नवीन
हा कसला तिसरा भाग? हे तर सगळं पक्षी संग्रहालयच समोर आणून ठेवल्यागत वाटतय! पण आता एवढा मोठ्ठा भाग लिहिलायस तर 'चांगला झालाय' असं तरी म्हणते.:) रेवती
  • Log in or register to post comments

लै

श्रीयुत संतोष जोशी
गुरुवार, 12/03/2009 - 07:19 नवीन
लै भारी हो टारुशेठ. हे असं ब-याच जणांच्या आयुष्यात घडतं.काही जण त्याची आठवण काढत आयुष्यभर कुढत बसतात पण झालं ते झालं असं म्हणून ते शेअर करायचं हेच खरं जिंदादिल असण्याचं लक्षण. एकदम सही. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

धमाल

सहज
गुरुवार, 12/03/2009 - 07:33 नवीन
नेहमीसारखाच टारझनस्पेशल लेख. आता लवकर समझो हो ही गया होउन जाउ दे!
  • Log in or register to post comments

बहुतेक

चित्रा
गुरुवार, 12/03/2009 - 08:22 नवीन
बहुतेक सर्व चुकीच्या मुली निवडण्यात तुमचा हातखंडा होता असे दिसते आहे. :) राघू आणि ही रिचा का कोण तिच्या बाबतीत पोपट झाल्यामुळे खरे तर सुटका झाली असे वाटायला हवे. असो. लेख नेहमीप्रमाणेच पारदर्शक.
  • Log in or register to post comments

ही प्रेमा कोण?

प्रमोद देव
गुरुवार, 12/03/2009 - 08:37 नवीन
"माझ्या प्रेमाचे तीन पोपट".... तीनही लेख बारकाईने वाचले....पण शेवटपर्यंत ती टारुशेटची 'प्रेमा' कोण आणि तिचे ते 'तीन पोपट' ह्याचा अजिबात उल्लेख दिसला नाही. :D त्याबद्दल टारुशेठचा....आपलं पोपटरावांचा जाहीर निषेध. बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्‍यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय. :? सवयी कधीच सुटत नाहीत. काही लोकांच्या बाबतीत... दिसली कविता की कर विडंबन आणि आमच्या बाबतीत......लावा चाल. ;)
  • Log in or register to post comments

मस्त लेख

महेश हतोळकर
गुरुवार, 12/03/2009 - 09:17 नवीन
मस्त लेखमाला. आवडली. बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्‍यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय. मला पण. टार्‍या आजून ओरिजीनल येऊदे. (नक्कला असतील तरी चालतील).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

टार्‍या

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 12/03/2009 - 09:05 नवीन
टार्‍या धमाल (मुलगा नव्हे)लेख. छाण वाटले. आमचा पोपट झालेला नसला तरी पोरी बघण्याचे दिवस आठवून गेले. आमचे कॉलेज 'गुजराथी केळवणी संघ'(चायला काय पण नाव होतं) यांचे कॉलेज होतं. त्यामुळे ओघानेच गुजराथी मुलींचा (आम्ही पेढे म्हणायचो) भरणा अधिक. आमच्या वेळेला कॉलेजात 'गुजराथी पटाव गरिबी हटाव' असे घोषवाक्य होते. या सर्वांची आठवण झाली. असेच छान लिहीत रहा. आणि हो हे सांगायचंच राहीलं. रेंजर स्विंग वर आमचाही फारच जीव. आमची बीएसए एसएलार फोटॉन हिच्यावरही फार जीव होता. तिला गिअर लावून पळवली की कर्वेरोडवर रिक्षालाही मागे टाके. पण तिने आमच्या वाढत्या वजनामुळे जीव टाकला व फ्रेम मोडून आमच्या प्रेमाचा अंत झाला. त्यानंतर ही 'रेंजर स्वींग' माझ्या आयुष्यात आली ती कायमची. ती अजूनही माझ्या धाकट्या चुलत भावाकडे आहे आणि त्याला ती अजूनही साथ देते. या आठवणींमुळे मी अंमळ हळवा झालो. असो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

तिला गिअर

विंजिनेर
गुरुवार, 12/03/2009 - 09:14 नवीन
तिला गिअर लावून पळवली की कर्वेरोडवर रिक्षालाही मागे टाके. .
अरेरे.. पेशवे पूर्वी हत्तीवरून फिरायचे, अबलख घोड्यावरून अटकेपार स्वारीवर जायचे. हल्ली सायकल वापरावी लागते म्हणजे फारच वाईट. पूर्वीचं पुणं राहिलं नाहि.. पूर्वीचं पूणं राहिलं नाही :( ह.च. घ्या.. (अर्धा शहाणा)विंजिनेर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

टार्‍या

विजुभाऊ
गुरुवार, 12/03/2009 - 09:29 नवीन
टार्‍या मस्त लिवलयस रे. भालचम्द्र नेमाड्यांच्या "कोसला" ची आठवण झाली. लोकांना नवीन नावे देण्यात तू त्या काळापासून प्रगत आहेस. हे नव्याने कळाले. झ्याक लिहितो आस तू :) टारुश्री चा फॅण..... काजूभाऊ चहा Image removed.
  • Log in or register to post comments

टारोबा... ति

निखिल देशपांडे
गुरुवार, 12/03/2009 - 10:03 नवीन
टारोबा... तिसरा भाग पण चांगलाच जमला आहे हो... एकदम कॉलेजच्या वातावरणात घेउन गेलात.. आमचे आणी आमच्या मुळे झालेले मित्रांचे पोपट डोळ्यासमोर आले. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

हम्म!!

पिवळा डांबिस
गुरुवार, 12/03/2009 - 10:42 नवीन
लेखनशैली छान आहे... तीनही भाग चांगले लिहिले आहेत.... पण लेका टार्‍या, तिच्यायला, हे तुझ्या प्रेमाचे पोपट की तुझ्या वासूगिरीचे पोपट रे? च्यामारी, दिसली पोरगी की पाघळला, दिसली पोरगी की पाघळला.... उगीच नाही त्या पोरींनी तुला शेंड्या लावल्या.... पोरींना असल्या लोकांचा वास दहा मैलावरूनही येतो.... ये एकदा माझ्याकडे, तुला 'सकळ शहाणा' करून सोडतो!!!!! :)
  • Log in or register to post comments

प्लिज बेअर विथ मी!

प्रदीप
गुरुवार, 12/03/2009 - 11:02 नवीन
बेअर विथ मी? अहो, फार छान लिहीलंय तुम्ही, अगदी दिलखुलास. तिन्ही भाग आवडले, त्यातील जोश, निरागसता, आणि सर्व टर्मिनॉलॉजीसकट.
  • Log in or register to post comments

मान गये बॉस!

ज्ञानेश...
गुरुवार, 12/03/2009 - 11:08 नवीन
मोडक म्हणतात त्याप्रमाणे- 'इव्होलुशन' आहे खरे! टार्‍या, अंमळ नॉस्टाल्जिक केलेस हो! झक्कास लेख. मला व्यक्तिशः पहिला 'पोपट' (खरं तर तो पोपट नाहीच..) जास्त आवडला. बाकीचे दोन क्रश वाटले. असो. एकंदर पिंपरीच्या 'ग्रीन' कॅम्पस मधे आपण एकाच वेळी होतो तर! B)
  • Log in or register to post comments

टार्‍या!!!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/03/2009 - 11:39 नवीन
स्ट्यांडिंग ओव्हेशन !!!! हे ओव्हेशन, तुझ्या उद्योगांबद्दल नव्हे रे... ते तर बहुतेक सगळेच करतात. पण तू साधं सरळ आणि ओघवतं लिहिलं आहेस. अर्थात, हे माहित आहेच, पण हे प्रांजळ आत्मकथन ते परत एकदा अधोरेखित करून गेले. अवांतर: बाकीचे उद्योग कमी करा. (अजिबात बंद नका करू (दॅट्स व्हॉट मेक्स यु टार्‍या)... पण कमी करा.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

श्री टारोबाजी

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 12/03/2009 - 11:52 नवीन
आता संपादककाकांनीच गो अहेड दिल्यावर काय चिंता? सुरु करा धुडगुस! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

नंदन
गुरुवार, 12/03/2009 - 13:46 नवीन
बिकाकाकांशी सहमत आहे. आमचेही स्ट्यांडिंग ओव्हेशन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तिन्ही

सुमीत भातखंडे
गुरुवार, 12/03/2009 - 12:03 नवीन
तिन्ही पोपट भारी
  • Log in or register to post comments

मस्त..!

sneharani
गुरुवार, 12/03/2009 - 12:11 नवीन
हा भाग देखील छान झालाय. बाकी कॉलेजला असताना तुझं इंग्लिश अगदी सुपर होतं वाटतं.
  • Log in or register to post comments

वा!!!

समंजस
गुरुवार, 12/03/2009 - 12:11 नवीन
झक्कास होते तिन्ही पोपट
  • Log in or register to post comments

मस्त्च.

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 12/03/2009 - 12:52 नवीन
मस्त्च.
  • Log in or register to post comments

जुन्या दिवसांच्या आठवणी जाग्या केल्या...

प्रसन्न केसकर
गुरुवार, 12/03/2009 - 13:27 नवीन
टार्‍या. तीन दिवस छान नॉस्टॅल्जिक मूड मधे गेले. धन्यु. माझ्याकडुन तुला एक पार्टी लागु झाली रे. केव्हा हवीये ते फक्त बोल.
  • Log in or register to post comments

छान

अवलिया
गुरुवार, 12/03/2009 - 13:41 नवीन
छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments

भन्नाट वरी

गणपा
गुरुवार, 12/03/2009 - 14:14 नवीन
भन्नाट वरील सर्वांशी सहमत. असच ओरिजीणल मटेरीयल येउदे ;) -माझी खादाडी.
  • Log in or register to post comments

टारुमल जंगलानी...

jaypal
गुरुवार, 12/03/2009 - 14:46 नवीन
आपले सगळे Image removed. आवडले Image removed. 101% A1 पण खरं सांगतो Image removed. झालेला पाहुन वाईट ही वाटले. लेखन शैली आवडली.
  • Log in or register to post comments

हात्त तुझी मेल्या!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/03/2009 - 15:43 नवीन
आधी आपली भेट झाली असती तर तुला हे सोसावंच लागलं नसतं रे! येक से येक फॉर्म्युले दिले असते ;) -(रिटायर्ड कर्नल) ध. बाकी, तुझ्या लेखाबद्दल काय बोलु? चल तुला एक आख्खी जिवंत कोंबडी सप्रेम भेट :) खा कशी खायची तशी! क्क्काय?
  • Log in or register to post comments

मस्त लेखन!

स्वाती२
गुरुवार, 12/03/2009 - 18:24 नवीन
मस्त लेखन! आमच्या होस्टेलला या रिचाचा नमुना होता. एंगेजमेंट काय लग्नाची तारीखही ठरली होती. त्या बापड्याला काही पत्ता नव्हता. जर्नल्स लिहिण्यापासून सगळी हमाली करायचा वर हॉटेलिंगचा खर्च वेगळा.
  • Log in or register to post comments

सगळे

क्रान्ति
गुरुवार, 12/03/2009 - 19:11 नवीन
पोपट [पक्षी लेख ] आवडले रे टारू. समोर बसून किस्से सांगावे इतके सहज लिहिलेस. असाच लिहित रहा. :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

+१

मीनल
गुरुवार, 12/03/2009 - 20:09 नवीन
बाकी हा मुलगा इतकं 'छाण' लिहू शकतोय.....तर मग उगाच दुसर्‍यांच्या नकला कशाला करतो हा प्रश्न पडलाय. मला ही असच वाटतय. ही लेखमाला आवडली. प्रामाणिक लेखन आवडल.खूपदा हसू ही आल. तूला तूझी `ती` जेव्हा मिळेल तेव्हा ही लेखमाला जरूर वाचायला दे . तीला `ऑल क्लिअर नाऊ` ह्याची खात्री ही होईल आणि `चवथा` होण्याच टळेल. तूला शुभेच्छा. मीनल.
  • Log in or register to post comments

तूला तूझी

टारझन
गुरुवार, 12/03/2009 - 20:51 नवीन
तूला तूझी `ती` जेव्हा मिळेल तेव्हा ही लेखमाला जरूर वाचायला दे .
हॅहॅहॅ .. भेटलीये हो कधीचीच :) पण मी हे भाग लिहायला घेतल्यावर "तिच्या"वर सोडून "त्यांच्यावर" लिहीतोय म्हणून लै इमोसनल अत्याचार सहन करावा लागला आहे :) हॅहॅहॅ .. बाकी आम्ही पुप्याच्या कॉलेजातलं "गुजराथी पटाव .. गरीबी हटाव" हे तत्व अगदीच पाळलंय :) असो ! व्यनि तुन बर्‍याच जणांनी एकंच प्रश्न केला .. हे सगळं खरं आहे की पुड्या सोडल्या आहेस ? तर त्या सर्वांना एकच उत्तर .. "मी लिहीलेलं माझे मित्र वाचत असतात हा ही लेख त्यांनी वाचलाय ह्यात शंका नाही. आणि मी अजुन इमॅजिनरी लिहायला शिकलो नाहीये. " सर्व रसिक लोकांचे आभार मानतो. क्रम आणि पात्र तीच असली तरी प्रत्येकाचं सेमंच असतं ! ह्या निमीत्ताने एखाद्या रात्री लेख वाचून पब्लिक हळूच गोड हसत स्वप्नरंजन करत इतिहासात हरवलं असेल ह्यातच लेखकाचे यश आणि खुशी आहे. लिहायला सुरूवात केली तेंव्हा पब्लिकला ते एवढं रुचेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं , पण आम्ही स्वांतसुखाय का काय ते .. तसलं लिहीत होतो. लिहीता लिहीता खंडच पडले :) तरीही ते आपण पुर्ण शेवटापर्यंत वाचलेत ( :) ) मोग्यांबो खुश हुवा. तीसर्‍या पोपटाच्यावेळेस आमचा "क्राईम मास्टर गोगो" झाला होता. "हाथ को आया मुह ना लगा" म्हणून. 'ण' चा 'न' आणि 'न' चा 'ण' करण्याचा इतिहास फार जुणा आहे, ते होतं ते मधल्या बोटाचं हाड अंमळ मोठं झाल्यामुळेच . - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

हॅहॅहॅ ..

सुहास
Fri, 12/04/2009 - 23:56 नवीन
हॅहॅहॅ .. भेटलीये हो कधीचीच अभिनंदन हो टारझनराव..! बाकी लेख सॉल्लिडच आहेत.. क्रम आणि पात्र तीच असली तरी प्रत्येकाचं सेमंच असतं ! ह्या निमीत्ताने एखाद्या रात्री लेख वाचून पब्लिक हळूच गोड हसत स्वप्नरंजन करत इतिहासात हरवलं असेल ह्यातच लेखकाचे यश आणि खुशी आहे. अगदी बरोबर..! असेच लिहीत जा..! --सुहास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टार्‍या,

भोचक
गुरुवार, 12/03/2009 - 21:30 नवीन
टार्‍या, तिनही भाग छान जमलेत. अस्सल अनुभव नि तुझी लेखनशैली यामुळे मजा आली. विडंबनाच्या पलीकडे जाऊन कधीतरी 'गंभीरपणे' असे लिखाण कर. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

टारझन खरच

श्रद्धा.
गुरुवार, 12/03/2009 - 21:43 नवीन
टारझन खरच सुरेख लिहिले आहेस तु....लिहिण्यातील प्रामाणिकपणा जाणवतोय...
  • Log in or register to post comments

लेखन

मीनल
गुरुवार, 12/03/2009 - 23:06 नवीन
१] मुलींवर लाईन टाकणे हा फारसा न बोलला जाणारा विषय. म्हणजे आपापल्या ग्रुपमधे, मित्रांमधे बोलतात. दुस-याच्या बद्दलही बोलतात .पण असे स्वतः बद्दल फार कमी लोक सर्वांसमोर सार्वजनिकपणे बोलतात. ते तू केलेस. २]ते `असभ्य` गणले जाणारे अश्या खुमासदाररितीने लिहिले आहे की ते जराही तसे वाटले नाही. त्या अपरिपक्व वयात ते स्वाभाविकच आहे अस वाचकाला नक्कीच वाटल असाव. ते ज्या परिपक्वतेने लिहिली आहे तेच या तिन्ही भागाच्या यशाचे कारण असावे. ३]त्या वयातील भाषा, विचार,वागणूक आपण सर्वांनी पाहिलेली,अनुभवलेली आहे म्हणूनच हे लेख आवडले असतील. ४]ते वय उलटून गेल्यावर पुन्हा बारिक सारिक लेखनातून ते वय वाचकासमोर आणण तस अवघड आहे. तू तूझ्या लेखनाचा दर्जा खूप उंचावला आहेस. आता तूझ्या पुढिल लेखनाबद्दल अश्याच अपेक्षा वाचकाने करणे ही त्यांची चूक नसेल. तीनदा पोपट होऊनही चवथ्यांदा यशस्वी झालास हे आत्ताच कळले. पण त्यासाठी काय काय आणि कसे कसे केलेस हे वाचायला आवडेल. `प्यार किया नही जाता, हो जाता है `अस कुठेसे ऐकलेल आठवतय आहे. ;) मीनल.
  • Log in or register to post comments

टार्‍या..

मनिष
गुरुवार, 12/03/2009 - 23:45 नवीन
लै भारी. सगळे भाग आवडले...:)
  • Log in or register to post comments

छान!

धनंजय
Fri, 12/04/2009 - 00:02 नवीन
उलट्या क्रमाने पोपटकथा वाचल्या असत्या, तर शेवटी रडायला आले असते. या क्रमाने हसत-हसत तिसरा पोपट उडाला.
  • Log in or register to post comments

पोपटपंची आवडेश!!

अनिल हटेला
Fri, 12/04/2009 - 21:36 नवीन
तीन्ही भाग एकदम वाचले... हा भाग जास्त आवडला.. थोड्या फार फरकाने ,सर्वांच्या आयुष्यात असे पोपट बनण्याचे प्रसंग आलेले असतात..आता परयंत वाटायचं की आस्मादीक एकटेच किल्ला लढवत होते,पन तुझे लेख वाचल्यावर जाणवले की सचिन नंतर सेहेवाग देखील आहेच..:-) असो.... बैलोबा (पोपटराव) चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments

मी आपला

भडकमकर मास्तर
Fri, 12/04/2009 - 23:57 नवीन
मी आपला बॅकग्राऊंड मधे नाचणार्‍यांसारखा मागून नुसता हो नाही करत होतो .. बोलायचं बरंच होतं . पण जमतंच नव्हतं ! बाप्या न मी दोघेही दिवसरात्र "मेरे नैना .. सावन भादो.... "वगैरे टाईपची गाणी ऐकत घालवायचो. उत्तम..
  • Log in or register to post comments

टार्‍या,का

शेखर
Sat, 12/05/2009 - 01:06 नवीन
टार्‍या, काही काळापुर्वी तु एकदा मिपावर एका मुलीच स्केच डकवल होतस, ती च का ही ? कुणाचा ही पोपट होणे हे वाईट आहे. तुझा ३ वेळा झाला हे वाचुन तर फारच वाईट वाटले. पण पहिला क्रश हा तुझ्या मनात कायम असेलच कारण पहिला क्रश कोणीच विसरु शकत नाही. मनातल्या कुपीत कुठे तरी कळ अजुनही उठत असते, तुझ्या ही उठतच असेल कारण त्या शिवाय का सगळे डिटेल्स अजुन ही ताजे आहेत. असो... लेखन शैली बद्दल बोलायचे तर शंबर नंबरी सोने... (५० वी प्रतिक्रिया :) )
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा